Breaking News
Home / मनोरंजन / कोर्टाच्या बाहेरच महिला वकील एकमेकींना भिडल्या, हाणामारीचा व्हिडीओ होतोय वायरल

कोर्टाच्या बाहेरच महिला वकील एकमेकींना भिडल्या, हाणामारीचा व्हिडीओ होतोय वायरल

सोशल मीडियाला व्हायरल व्हिडीओचं व्यासपीठ मानलं जातं. दररोज नवनवीन अतरंगी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ हे मजेशीर तर काही थक्क करणारे असतात. सर्वसामान्यांमध्ये वाद किंवा हाणामारी झाली तर प्रकरण कोर्टामध्ये जातं. मात्र, जर कोर्टातील दोन वकिलांमध्ये हाणामारी झाली तर..? तर काय होऊ शकतं, याचाच प्रत्यय देणारा हा व्हिडीओ जोरात व्हायरल होताना दिसत आहे. सध्या सोशल मीडियाच्या अनेक पेजेस वर या दोन महिला वकिलांच्या सुरु झालेल्या किरकोळ वादापासून तर थेट हाणामारीपर्यंत पोहोचलेला व्हिडीओ तुफान वेगाने लोकांपर्यंत पोहोचतो आहे. यामध्ये दोन महिला वकीलच एकमेकींना तुफान मा’रहाण करताना दिसून येत आहे.

त्याहूनही धक्कादायक बाब म्हणजे या दोन्हीही महिला वकील चक्क युनिफॉर्म अंगावर असताना आणि इथे तिथे नाही तर थेट कोर्ट परिसरातच एकमेकींना मा’रहाण करताहेत. आता कोर्टाची पायरी चढणे, हे शहाण्या माणसाचे काम नाही, हे आतातरी तुमच्या लक्षात आले असेलच. छोट्या-छोट्या गोष्टींवरुन पती-पत्नी, मित्रांमध्ये किंवा शेजाऱ्यांमध्ये भांडणं होतात. काही वेळा हे प्रकरण तिथेच मिटतं. तर काही वेळा हे प्रकरण अगदी कोर्टापर्यंत जातं. कोर्टात वकिल कायद्यानुसार न्याय मिळवून देण्यासाठी लढतात. कधी कधी तर कोर्टात वकीलच असे तावातावाने युक्तिवाद करतात की, थोड्यावेळाने हे एकमेकांचे गचुंडे धरतील, असे वाटू लागते…. पण मंडळीहो आजच्या या व्हायरल व्हिडीओत फक्त गचुंडे नाही तर एकदम लाथा बुक्क्याने वकील महिलांनी हाणामारी केली आहे. ‘कायद्याने बोला’ असे म्हणणारे वकीलच आपापासत भिडले तर. आणि त्यातच ही महिला वकिल असतील तर चर्चा होणारच.

सध्या सोशल मीडियावर कोर्टाच्या परिसरातील एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये कोर्टातील दोन महिला वकील जोरदार हाणामारी करताना दिसत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘दोन महिलामध्ये कुठल्याशा किरकोळ कारणामुळे वाद निर्माण झाला. वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. यामुळे फ्री स्टाईल हाणामारीत कोण-कोणाला मा’रहाण करत होते, हे समजतच नव्हते. दोन महिलांमधील भांडणात काही लोकांनी पडायचा प्रयत्न केला तर त्यांनाच मोकार फ’टके पडले. यात एका वकिलाने दुसऱ्या वकील महिलेला बेदम मा’रहाण केली. सगळ्यात आधी तर तिने केस पकडून मा’रले, खाली पाडले आणि पुन्हा उठल्यावर 3 ते 4 वेळा महिलेच्या कानशीलात लावल्या. दोन महिलांमधील भांडण सोडवण्याऐवजी ते टोकाला गेले आणि लाथाबुक्क्या, हाणामारी झाली.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *