हिऱ्यांचे शौक ठेवत असाल तर दिल्लीच्या नॅशनल म्युझियम मध्ये नक्की भेट द्या. येथे ११ वर्षानंतर, १८ फेब्रुवारी पासून ५ मे पर्यंत हैदराबादच्या निजामाच्या शाही खजिन्यातील वस्तूंचे प्रदर्शन आयोजित केले होते. या खजिन्यात जवळजवळ १७३ बेहिशेबी रत्न आणि दागिने प्रदर्शनात दिसले, ज्यात सर्वात किमती डायमंड होते जॅकॉब डायमंड, जो आकाराने कोहिनूर हिऱ्याशिवाय दुप्पट मोठा आहे. जॅकॉब डायमंडने १८ व्या शतका पासून २० व्या शतका पर्यंत प्रवास केला.
काय आहे जॅकॉब डायमंडची किंमत ?
सूत्रांच्या माहितीनुसार, १८५ कॅरेटच्या जॅकॉब डायमंडची आजच्या काळातील किंमत ४०० करोड रुपये आहेत. या किमती हिऱ्याला हैदराबादचे ६ वे निजाम महबूब अली खानने शिमलाचा व्यापारी अलेक्झांडर मालकॉम जॅकॉब यांच्या कडून २३ लाख ला खरेदी केला होता.
१९९५ ला खरेदी केला भारत सरकारने
हैदराबादच्या निजामाच्या ज्वेलरीला भारत सरकारने सन १९९५ मध्ये २१५ करोडला खरेदी केली होती. परंतु खरेदी नंतरही हा संग्रह सुरक्षेसाठी ‘एचईएच निजाम ज्युलरी ट्रस्ट’ आणि ‘एचईएच निजाम सप्लीमेंट ज्युलरी ट्रस्ट’ च्या जवळ आहे. सूत्रांच्या माहिती नुसार याची किंमत ५०,००० करोड पेक्षा जास्त आहे. या प्रदर्शनात 28 शोकेस मध्ये या बेहिशेबी वस्तू प्रदर्शनासाठी ठेवण्यात आल्या होत्या. ह्यात कंबरपट्टा, हार, बक्कल, सरपेच, ब्रेसलेट, बांगड्यांची जोडी, कानातील रिंग, बाजूबंद, बटवा,अंगठ्या, पॉकेट वॉच,बटन आणि कफलींग यासारख्या वस्तू प्रदर्शनात ठेवण्यात आल्या होत्या. गोलकोंडाच्या खाणीतील हिरे, गोलंगियाच्या पन्ना खाणीतील पन्ना, बर्माची रुबी आणि बसरा आणि मन्नारच्या खाडीतील मोती या प्रदर्शनात मांडले होते.
या बेहिशेबी वस्तूंचे पहिले प्रदर्शन साल 2001 मध्ये 29 ऑगस्ट पासून 15 सप्टेंबर पर्यंत लावले होते. तसेच दुसरे प्रदर्शन 2007 मध्ये 30 सप्टेंबर पासून 30 डिसेंबर पर्यंत आयोजित केले होते. आत्ता ह्यावर्षी हे प्रदर्शन 19 फेब्रुवारी पासून 5 मे पर्यंत आयोजित केले होते.