Breaking News
Home / मनोरंजन / क्रिकेटमधून भलेही रिटायर्ड झाला असला तरी ह्या मार्गाने खूप पैसे कमावतो धोनी

क्रिकेटमधून भलेही रिटायर्ड झाला असला तरी ह्या मार्गाने खूप पैसे कमावतो धोनी

भारतीय क्रिकेट संघाचा पूर्व कर्णधार महेंद्रसिंग धोनी ह्याने काही दिवसांपूर्वीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. एकदिवसीय विश्व कप सेमीफायनल मध्ये भारतीय क्रिकेट टीम न्यूझीलंड सोबत हरल्यानंतर धोनी कोणताही सामना खेळला नाही.

त्यानंतर त्याने एकही आंतराष्ट्रीय सामना खेळला नाही. प्रत्येकाला आशा होती कि ‘कॅप्टन कूल’ भारतीय क्रिकेट टीम च्या जर्सी मध्ये पुन्हा एकदा आपल्याला मैदानात पाहायला दिसेल, परंतु असे होऊ शकले नाही. धोनीने अचानक आपल्या निवृत्तीचा निर्णय सोशिअल मीडियावर शेअर केला. त्यानंतर सर्व क्रिकेटरसिकांचे जणू हृदयच तुटले. अनेकांनी धोनीबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या.

महेंद्रसिंग धोनी भारतातून त्या १०० मध्ये आहेत ज्यांनी ‘फोर्ब्स’ इंडियन सेलिब्रिटी १०० च्या यादीत आपले स्थान निर्माण केले आहे आणि तिथे तो ५ व्या स्थानावर आहे. ३८ वर्षाच्या या खेळाडूची संपत्ती २०१८ मध्ये १०१.७७ करोड ते २०१९ मध्ये १३५.९३ करोड इतकी वाढली आहे. तुमच्या माहितीसाठी धोनी ने कित्येक कंपनी मध्ये गुंतवणूक केली आहे आणि कित्येक ब्रँडचा प्रचार हि करतो. या जाणून घेऊया कॅप्टन कूल च्या कमावण्याचे क्रिकेट शिवाय अजून कोणते स्तोत्र आहेत ते.

सेव्हन (SEVEN) :
सात म्हणजेच सेव्हन हा आकडा धोनीचा लकी आकडा मानला जातो. धोनी मैदानात ७ आकडा असलेली जर्सी परिधान करतो. आपला हाच लकी आकडा धोनीने आपल्या बिझनेस मध्ये लक म्हणून वापरायचे ठरवले. सेव्हन हा आकडा धोनी चा एक लीफएसटीले ब्रँड आहे. जो खेळासाठी लागणारे कपडे, आणि चप्पलांची निर्मिती करून मार्केटिंग हि करतात. हे २०१६ च्या फेब्रुवारी महिन्यात सुरु केले होते. धोनी हा सेव्हन चा ब्रँड अम्बॅसॅडर आहे.

स्पोर्ट्स फिट
२०११ मध्ये पूर्ण देशात २०० व्यायामशाळा उघडून महेंद्रसिंग धोनी २०१२ मध्ये कमर्शिअल फिटनेस कंपनी SportsFitPvt Ltd बरोबर फिट-बीज मध्ये समाविष्ट झाले.

धोनी एंटरटेनमेंट
धोनी एंटरटेनमेंट ने आपल्या प्रवासाची सुरुवात ‘रोर ऑफ द लायन’ नावाच्या डॉक्युमेंटरी ने केली. जी सामाजिक मीडिया माध्यम हॉटस्टार वरील सर्वात मोठे प्रकाशन आहे.

चेन्नईयन एफसी
धोनी ला क्रिकेट शिवाय दुसरे खेळ सुद्धा आवडतात. फुटबॉल बद्दल त्याची आवड ‘इंडियन सुपर लीग’ च्या एका टीम चा मालक असल्याच्या रूपात बघू शकता. चेन्नईयन एफसी टीम चेन्नई, तामिळनाडू आधारित आहे.

हॉटेल माही रेजिडेंसी
महेंद्रसिंग धोनीने हॉटेल माही रेजिडेंसी मध्ये सुद्धा गुंतवणूक केली आहे. हि गुंतवणूक कधी आपल्या समोर आली नाही. हॉटेल माही रेजिडेंसी झारखंड मध्ये आहे आणि यात कोणी दुसरा भागीदार नाही.

रांची रेंज
माही ने एका हॉकी फ्रेंचाइजी मध्ये सुद्धा गुंतवणूक केली आहे जी रांची मध्ये आहे. जिला ‘रांची रेंज’ च्या रूपात ओळखले जाते.

ब्रँड एंडोर्समेंट
भारतीयांत ब्रँड चे भारतीय खेळाडू सोबत नेहमी चांगले संबंध राहिले आहेत. खास करून तेव्हा खेळरत्न एम एस धोनी सारख्या विश्वसनीय व्यक्तीचे नाव येते. धोनी ‘बोस’, ‘पेप्सी’, ‘बूस्ट’,’पनेरायी’,’स्निकर्स इंडिया’, ‘व्हिडिओकॉन’, ‘गोइड्ड’, ‘कोलगेट’, ‘रेड बस’, ‘लिवफास्ट’, ‘कार २४’, ‘इंडिगो पेन्ट्स’, ‘मास्टरकार्ड इंडिया’, ‘ओरिएंट’, ‘भारत मॅट्रिमोनी’, ‘नेट मेड्स डॉट कॉम’, ‘साऊंड लॉजिक’ सारख्या प्रसिद्ध ब्रँड चा प्रचार करतो. याशिवाय धोनी आताही ‘कोलगेट’ आणि ‘गो डॅडी’ सारख्या काही मोठ्या ब्रँड बरोबर काम करत आहे.

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.