क्रिकेट या खेळाचे आपण भारतीय किती चाहते आहोत, हे काही वेगळं सांगायला नको. आपल्या आयुष्याचा अविभाज्य असा भाग म्हणजे हा खेळ. बरं केवळ पाहण्यासाठी नव्हे तर मैदानात, गल्लीत, गच्चीवर, कधी ऑनलाईन किंवा अगदी जागा मिळेल तिथे खेळण्यासाठीही हा आपला आवडता खेळ आहे. त्यामुळे अनेक विभागांमध्ये आपण अनेक क्रिकेट स्पर्धा आणि त्याअनुषंगाने अनेक संघ कार्यरत असलेले पाहतो. मग ते अगदी स्थानिक पातळीपासून ते राज्यस्तरीय, राष्ट्रीय आणि अंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा स्पर्धा होत असतात आणि संघ त्यात सहभागी होत असतात. आपल्यातले अनेक जण स्वतः अशा अनेक संघाचे सदस्य असतील. या संघांचं प्रतिनिधित्व करत असताना काही वेळेस असे प्रसंग येतात की ते नेहमीच लक्षात राहतात. पण यातील काही असे दुःख्खद प्रसंग असतात की त्यांची आठवण नकोशी वाटते.
काही दिवसांपूर्वीच घडलेली घटना याचं उदाहरण आहे. पुण्यातील जुन्नर येथील जाधववाडी येथे एक टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा भरवण्यात आली होती. अनेक संघांनी यात सहभाग नोंदवला होता. यातील दोन संघांचा सामना सुरू होता. बॅटिंग करत असलेल्या संघात महेश (बाबू) नलावडे हा नावाजलेला खेळाडू खेळत होता. गोलंदाजाने चेंडू टाकला, स्ट्राईक वरील खेळाडूने तो खेळला पण धाव घेतली नाही. नॉन स्ट्राईक वरील नलावडे यांनी आपल्या सहकाऱ्याला काही सांगितले आणि पंचांशीही ते काहीसं बोलले. तोपर्यंत गोलंदाज पुन्हा गोलंदाजी करण्यासाठी परतत होता. तेवढयात नॉन स्ट्राईकला असणारे महेश हे खाली बसले. काही वेळा थकवा जाणवल्याने खेळाडू असे बसतात. पण हे काही वेगळं होतं. पुढच्या काही क्षणातच हे लक्षात आलं. कोणाच्या ध्यानीमनी नसताना महेश जागीच को’सळले. आजूबाजूला असलेले पंच, महेश यांचा सहकारी फलंदाज आणि प्रतिस्पर्धी संघातील खेळाडू सगळेच धावले. पुढे कळलं की महेश यांना हृ’दयविकाराचा झ’टका आला होता.
दुर्दैव असं की महेश यांचं या झटक्याने नि’धन झालं. या बाबतीतचा व्हिडियो आपण अनेक प्रथितयश चॅनेल्स वरून पाहिला असेल. आमच्या टीमने ही या व्हिडियोजच्या आधारे हा लेख लिहिला आहे. पण केवळ बातमी देणे हा या लेखामागचा उद्देश नाही. या लेखातून महेश यांना श्र’द्धांजली अर्पण करावी, असा आमच्या टीमचा प्रामाणिक हेतू आहे. तसेच क्रिकेट आणि इतर खेळ खेळणाऱ्या आणि आमच्या वाचकांना सुद्धा यानिमित्ताने एक आवाहन. ते म्हणजे आपल्या आवडी निवडी, छंद जपा, पण सोबतच आपल्या तब्येतीला ही जपा. स्वतःची काळजी घ्या. मराठी गप्पाच्या टिमकडून महेश यांना भावपूर्ण श्रद्धांजली. तसेच महेश यांच्या कुटुंबियांना या दुःख्खातून सावरण्याची शक्ती देवाने त्यांना द्यावी हीच इच्छा.
बघा व्हिडीओ :