Breaking News
Home / मनोरंजन / ख’रंच असा बं’दोबस्त प्रत्येक लग्नसमारंभात हवा, एकदा न’क्की पहा हा व्हिडीओ

ख’रंच असा बं’दोबस्त प्रत्येक लग्नसमारंभात हवा, एकदा न’क्की पहा हा व्हिडीओ

अन्न हे पूर्णब्रह्म असं आपण मानतो. त्यामुळे आपल्या ताटात पडलेलं प्रत्येक जिन्नस आपण अगदी चवीने खातो. खाण्यावर आपलं प्रेमच असतं म्हणा ना. त्यात आपल्या भारतात तर एवढी विविधता आहे कि जिभेचे चोचले पुरवण्यासाठी खाणंही बऱ्याचशा प्रमाणात होतं. खासकरून समारंभांच्या ठिकाणी. मग त्यात लग्न आलं, काही सार्वजनिक कार्यक्रम आले. पण या चोचले पुरवण्याच्या नादात सहसा आपली एक चु’क होते. आपण आपल्या खाण्याच्या क्षमतेपेक्षा जास्त खाणं ताटात वाढून घेतो. अनेक वेळेस खाण्याच्या आवडीमुळे हे होतं, तर काही वेळा मित्रपरिवार आणि आयोजकांनी केलेल्या आग्रहामुळे. पण सरतेशेवटी काय तर हे सगळं खाणं कचऱ्याच्या डब्यात जातं. पण यावर एक नामी उपाय आमच्या टीमला नुकताच एक वायरल व्हिडियो पाहताना मिळाला. हा व्हिडियो आहे एका समारंभाचा.

हा व्हिडीओ खूप जुना आहे. को’विड पूर्व काळातला हा समारंभ. त्यामूळे त्यात लोकांचा वावर अगदी सहज दिसून येतो. या समारंभाची खासियत अशी की जे जे उपस्थित आपलं उरलेलं खाणं कचऱ्याच्या डब्यात टाकायला जातात तेव्हा तेव्हा त्यांच्या ताटाची पाहणी होते. ही पाहणी करण्यासाठी उभे असतात एक बलदंड महाशय. जे अतिशय नम्रतेने लोकांना आपल्या ताटातलं अन्न संपवून यायला सांगत असतात. सुरुवात होते दोन पोरगेलेसे दिसणाऱ्या तरुणांना पिटाळून लावून. हे मिसरूड फुटलेले नवंतरुण खूप परीने या महाशयांना समजावण्याचा प्रयत्न करतात पण यश मिळत नाही. मग येतात एक वहिनी. त्यांनाही ताटातलं सगळं अन्न संपवण्यासाठी सांगितले जाते. त्याही मुकाट्याने ते मान्य करत निघून जातात. मग येतात एक आजोबा. महाशयांनी केलेल्या विनंतीमुळे त्यांच्यासमोर हे सगळं संपवायचं कसं हा प्रश्न उभा राहिलेला त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसतो. तेवढ्यात एक दादा येतात. आपल्या परीने ते या महाशयांना समजावण्याचा आणि आपलं ताट त्या कचरा पेटीत ढकलण्याचा अयशस्वी प्रयत्न करतात. तेवढ्यात एक मुलगा आणि मगासचे आजोबा आपलं खाणं संपवून आलेले दिसून येतात आणि हा व्हिडियो संपतो.

म्हणायला गेलं तर काहीसा गंमतीदार असा हा व्हिडियो. पण खरं सांगायचं तर नकळतपणे आपल्याला आपल्या चुकीच्या सवयींची जाणीव करून देणारा हा व्हिडियो. कारण अनेक वेळेस समारंभांतून खाण्याची नासाडी केवढी होते त्याची आपण कल्पना करू शकत नाही. म्हणजे एखादे वेळेस खाणं वाढलं गेलं नाही आणि उरलं तर निदान ते कोणा गरीबाच्या तोंडी तर लागू शकेल. पण उष्टं जेवण काय कामाचं. पण दुर्दैवाने अनेक वेळेस हे होतं. मजा करण्याच्या नादात, चमचमीत खाण्याच्या नादात तर काही वेळेस आग्रह न मोडता आल्याने हे होतं. पण यावर आपणच विचार करण्याची आणि स्वतःवर किंचित ताबा मिळवण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे जेवढं जेवू शकतो तेवढंच घेऊ जेणेकरून होणारं नुकसान टळेल. बरं हे इतर कोणासाठी किंवा समाजाच्या भल्यासाठी वगैरे करत बसण्याची आवश्यकता नाही. केवळ स्वतःच्या आनंदासाठी हे केलं तरी पुरे. कारण प्रत्येकाने हे केलं तर आपोआप अन्नाची होणारी नासाडी थांबेल हे नक्की आणि अन्न हे पूर्णब्रह्म आहे या आपल्या मानण्याला कृतीचीही जोड मिळेल.

या लेखातून आपल्या टीमने एक विचार मांडला आहे. त्यातून कोणाविषयी वाईट बोलावं किंवा त्यांना बोल लावावेत हा उद्देश नाही हे लक्षात घ्या. आपल्या वागणुकीत बदल करण्याच्या प्रक्रियेत आमची टीमही तेवढीच सामील आहे हे नक्की. या सोबतच अन्नाची नासाडी थांवण्यासाठी ज्या महाशयांनी ही कृती करण्याचं धाडस दाखवलं त्या महाशयांचे मनापासून धन्यवाद. आपल्यामुळे एक योग्य सवय अंगी बाणवण्याविषयी आम्हाला विचार ही करता आला आणि हा लेखही लिहिता आला. वाचकहो, आपल्याला हा लेख योग्य वाटला असणारचं. तेव्हा नक्की शेअर करा आणि आपण सगळ्यांनीच आपली एक सवय बदलण्याकडे एक पाऊल पुढे टाकूयात. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *