Breaking News
Home / मनोरंजन / खरंच काहीजण खूप नशीबवान असतात, सीसीटीव्ही मध्ये कैद झालेला हा व्हिडीओ पाहून तुमचा देखील विश्वास बसणार नाही

खरंच काहीजण खूप नशीबवान असतात, सीसीटीव्ही मध्ये कैद झालेला हा व्हिडीओ पाहून तुमचा देखील विश्वास बसणार नाही

म्हणी, वाक्प्रचार ही कोणत्याही भाषेची आभूषणे असतात. कारण दैनंदिन जीवनात घडणाऱ्या किंवा घडू शकणाऱ्या गोष्टींचा काही शब्दांमध्ये मतितार्थ सांगण्याचं काम म्हणी आणि वाक्प्रचार करत असतात. आपल्याला ही याची प्रचिती वारंवार येत असते. अनेक वेळा स्वतःच्या उदाहरणावरून किंवा इतरांच्या उदाहरणावरून ही प्रचिती येत असते. आता आजचीच गोष्ट घ्या ना. ‘देव तारी त्याला कोण मारी’ ही म्हण आम्हाला एका व्हिडियोच्या साहाय्याने अनुभवायला मिळाली.

हा व्हिडियो तसा जुना वाटतो. तसेच हा रात्रीच्या वेळी एका सीसीटीव्हीत चित्रित झालेला प्रसंग आहे. त्यामुळे धड अस काही दिसत नाही. अर्थात जे काही दिसतं ते ही भयानक म्हणावं आणि अंगावर काटा आणणारं असतं हे नक्की. पण तरीही जीवावर आलेला काळाचा घाला परतवून लावला जातो हे नक्की. त्यामुळे शेवट ठीक तर सगळं ठीक अस म्हणू शकतो. पण अस असलं तरी हा व्हिडियो बघून झाल्यावर ही लक्षात राहतो हे नक्की. होतं काय तर व्हिडियो सुरू होतो तेव्हा आपल्याला एक रस्ता दिसून येतो. चित्रीकरण सीसीटीव्ही मार्फत होतंय हे सुद्धा कळतं. तेवढ्यात स्क्रीनच्या वरच्या बाजूने एक बाईकस्वार येताना दिसतो. आता हा रस्ता कितपत मोठा आहे हे काही कळून येत नाही. पण बऱ्यापैकी ऐसपैस असावा अस वाटतं. याची खात्री ही काही वेळात पटते. पण ती ज्या पद्ध्तीने पटते ते मात्र काळजात धस्स करणारं आहे.

कारण आता पर्यंत रस्त्यावरून येणारा बाईकस्वार एके ठिकाणी अचानकपणे थांबतो. पण अस का होतं? कारण त्याच्या उजव्या बाजूने आडवी अशी एक दुचाकी जाणार असते. तिची आणि आपली टक्कर होऊ नये म्हणून हा बाईकस्वार आपला वेग काहीसा कमी करतो. त्यामुळे ती दुचाकी पुढे निघून जाते पण त्याचवेळी तिच्या मागून येणाऱ्या भल्या मोठ्या मालवाहू ट्रकचा त्याला अंदाज येत नाही. आता अचानकपणे पुढे जावं की पाठी जावं हे ही कळत नाही. काही तरी करावं हे त्याला वाटत असावं पण ते भलं मोठं धुड ही पटकन जवळ येत असतं. अशावेळी माणसं एका जागी थिजून जाण्याची शक्यता असते. पण हा बाईकस्वार मात्र या परिस्थितीत ही हालचाल करत राहतो. प्रसंगावधान दाखवतो. त्यामुळे हा बाजूने येणारा ट्रक एकदाचा येऊन त्याच्या बाईकला धडकतो, पण त्या आधीच्या काही क्षणांत बाईकस्वार आपला उजवा पाय बाईकच्या एका बाजूने काढून डाव्या बाजूला नेण्यात यशस्वी होतो. तसेच ट्रक चालकाने ही या काळात आपला वेग कमी केला असावा.

पण या घडामोडीमुळे तो ट्रक आणि ती बाईक यांची टक्कर व्हायची ती होतेच. तसेच एकमेकांना आडवे असल्याने बाईक त्या ट्रकच्या मधल्या भागात अडकून राहते अस जाणवतं. त्यामुळे एकप्रकारे या बाईकस्वाराला काहीसं संरक्षण या ट्रकच्या चाकाखाली येण्यापासून मिळतं. तसेच थोडा जास्तीचा वेळ ही मिळतो. तसेच त्याने एक पाय आधीच डाव्या बाजूला घेतल्याने तो अडकून ही बसत नाही. उलट जेव्हा ही टक्कर होते तेव्हा तो ट्रकच्या उजव्या बाजूला येण्यात कसाबसा यशस्वी होतो. त्यातही ट्रकची बाईकला जी धडक बसते त्याचीही मदत होते. पण उजव्या बाजूला येतानाही पुन्हा टायरखाली जाण्याची शक्यता असते. पण सुदैवाने तसं काहीही होत नाही. बरं हे सगळं इतक्या पटकन घडतं की नक्की काय होतय हे कळायला काही वेळ लागतो. पण ही झाली आपली अवस्था. त्या बाईकस्वाराचं त्यावेळी काय झालं असेल याची कल्पना ही केलेली बरी ! आपला ग्रंथ आटोपतो की काय असं त्याला वाटलं नसेलच अस म्हणू शकत नाही. पण शेवटी, ‘देव तारी त्याला कोण मारी’ म्हणतात तेच खरं अस वाटून जातं.

त्याचं प्रसंगावधान आणि सोबतीला त्याचं दैवं बलवत्तर यांमुळे तो वाचतो असं वाटतं. असो. वर उल्लेख केल्याप्रमाणे जिथे शेवट ठीक तिथे सगळं ठीक हेच खरं !त्यामुळे इथेही जिवावरचा प्रसंग आला होता तो निभावला गेला असच दिसतं. त्यामुळे याविषयीची अजून चिकित्सा करत नाही. तूर्तास इथेच थांबू. तसेच हा लेख संपवण्यापूर्वी, या लेखात जे काही लिहिलं गेलंय ते या व्हिडियोत दिसणाऱ्या घटनेवरूनच केवळ लिहिलं गेलेलं आहे याची कृपया सुज्ञ वाचकांनी नोंद घ्यावी हे नमूद करावंसं वाटतं. असो.

बरं तर मंडळी हा होता आजचा लेख. आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.