Breaking News
Home / जरा हटके / ख’रंच प्रत्येक शिक्षकाने अश्याप्रकारे वाढदिवस साजरा केला पाहिजे, एकदा न’क्की पहा हा व्हिडीओ

ख’रंच प्रत्येक शिक्षकाने अश्याप्रकारे वाढदिवस साजरा केला पाहिजे, एकदा न’क्की पहा हा व्हिडीओ

वर्षातून एक दिवस असा येतो ज्या दिवशी आपलं कौतुक व्हावं, आपल्याला भरगोस आशीर्वाद मिळावेत, सोबत गिफ्ट्स ही मिळावेत असं अगदी हक्काने वाटतं. होय हा एक दिवस म्हणजे प्रत्येकाचा वाढदिवस. या दिवशी सगळं काही आनंदात असावं असं आपल्याला वाटतं. त्यासाठी विविध गोष्टी आपण करत असतो आणि आपले प्रियजनही आपल्यासाठी बरंच काही ठरवून ठेवत असतात. या सगळ्यांची म्हणून एक गंमत असते पण प्रत्येकाची तऱ्हा मात्र वेगवेगळी असते. आता या वायरल व्हिडियो मधील शिक्षेकेचंच घ्या ना. ही दक्षिण भारतीय शिक्षिका आपल्याला या व्हिडियोत आपल्या विद्यार्थ्यांसमवेत आपल्याला दिसते. सुरुवातीला तर काय चालू आहे हे काही क्षण कळत नाही. कारण शिक्षिका बसलेली आहे, आजूबाजूला मुलं उभी आहेत आणि समोर रोपटी ठेवली आहेत असं एकंदर चित्र असतं.

पण जेव्हा ही लहान मुलं, त्यांच्या प्रिय शिक्षिकेसाठी हॅप्पी बर्थडे हे गाणं गाऊ लागतात तेव्हा आपल्याला काय चाललं आहे याची जाणीव होते. अंदाजही येतो. त्यांचं हे वाढदिवसाचं गाणं सुरू असताना आणि संपल्यावरही त्या शिक्षिकेच्या चेहऱ्यावरचा आनंद अगदी स्पष्ट दिसत असतो. बरं आता समोर केक तर नसतो, मग कापणार काय. तर काही नाही. त्याऐवजी ही शिक्षिका समोर असलेली सगळी रोपटी आपल्या विद्यार्थ्यांना द्यायला सुरुवात करते. पहिल्यांदा काही मुलं येतात, वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन रोपटी घेऊन जातात. सोबत प्रत्येकाला एक एक चॉकलेट ही दिलेलं असतं. मग एक मुलगी येते. ती सगळ्यांत उत्साही दिसत असते. ती काही तरी बोलते आणि शिक्षिका खुदकन हसते. दाक्षिणात्य भाषेमुळे काही कळत नाही असं आपल्याला वाटत असतानाच ही मुलगी आपले ओठ शिक्षिकेच्या गालावर टेकवते. केवढा तो गोड प्रसंग. मग काय या शिक्षिकेस अभिष्टचिंतन करून गालावर एक गोड गोड पापा देण्याची रिघच लागते. सगळ्या मुली हे करतात.

मध्ये मध्ये मुलं येतात आणि शिक्षिकेचं अभिष्टचिंतन करून हातात रोपटी आणि चॉकलेट घेत निघून जातात. असं करता करता हा व्हिडियो संपतो. या व्हिडियोला बघताना मजा येते. कारण ही लहान मूल मुली या प्रसंगाची मजा घेत असतात. आपल्या वर्गशिक्षिकेच्या वाढदिवसाला मजा करायला मिळते म्हणून ही चिल्ली पिल्ली अगदी खुश असतात. त्यांच्या चिवचिवाटातून हे जाणवत राहतं, अगदी भाषा न कळूनही. आपसूकच आपल्यालाही आनंद वाटतोच. सोबत या शिक्षिकेने रोपटी देऊन वृक्ष जपण्याचा दिलेला महत्वपूर्ण संदेश आपल्याला नजरेआड करता येत नाही. किंबहुना तिच्या या कृतीचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. कारण लहान मुलं म्हणजे मातीचा गोळा, वळवावा तसा वळणार असं मानलं जातं. तेव्हा या संस्कारक्षम वयात या शिक्षिकेमुळे त्यांच्या बालमनावर होणारे उत्तम संस्कार बघून मन भरून येतं. विद्यार्थ्यांना पुस्तकी शिक्षणासोबतच आपल्या कृतीतुन शिक्षण देणारे शिक्षक आपल्या समाजात अजूनही आहेत ही समाधानाची बाब. आपल्या वागण्याने आपल्या विद्यार्थ्यांच्या मनात चांगले संस्कार रोवणाऱ्या या शिक्षिकेस मराठी गप्पाच्या टीमचा मानाचा मुजरा.

आम्ही हा व्हिडीओ तुमच्यासोबत शेअर करत आहोत, एकदा नक्की पाहून घ्या. आपल्याला या शिक्षिकेने केलेल्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल काय वाटतं हे कमेंट्स से’क्शन मध्ये नक्की लिहून कळवा. तसेच हा लेख जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा. वृक्ष लागवडीचा आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आपलाही वाटा आपण उचलूयात. आपल्या सातत्यपूर्ण पाठिंब्यासाठी मनःपूर्वक धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *