घरापासून लांब राहायला मिळणार आणि फक्त अभ्यास करावा लागणार नाही म्हणून अनेक माझे मित्र कॉलेजच्या शिक्षणासाठी होस्टेलला राहायला गेलेले मी पाहिले. अगदी जळगाव पासून तर कोकणापर्यंत… चांद्यापासून तर बांद्यापर्यंत.. सगळीकडून लोक शिकायला होस्टेलला येतात. कुणाकुणाला होस्टेलवरून घरी जाण्यासाठी अगदी 2 तास लागत, तर कुणाकुणाला 2 दिवस लागतात. शेवटी होस्टेलची मजाच वेगळीय… जे जे घर सोडून होस्टेलला राहायला गेले, तेव्हापासून होस्टेल हेच त्यांचं दुसरं घर झालं. शाळा-कॉलेज अशी अगदी 8-10 वर्षं हॉस्टेलवर राहणारी लोकं सुद्धा आहेत. मात्र होस्टेलवर राहण्याचा कधीही कंटाळा येत नाही. मजाही तेवढीच येते. फक्त मस्ती करायची पद्धत बदलते. आता तुम्ही म्हणाल… की एवढं सगळं होस्टेल पुराण आज का चालू आहे.
तर विषय असाय की, लग्न झाल्यावर मुली घर सोडून जातात मात्र मुलंही घर सोडून जातात. आणि मुलं घर सोडून गेल्यावर काय काय करावं लागतं? हे जर एखाद्या मुलीच्या तोंडून तुम्हाला ऐकायला मिळाले तर?… अहो आश्चर्यम… सध्या एका मुलीचा एक जबरदस्त भावनिक असणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
या व्हिडीओत तिने ‘मुलं जेव्हा घर सोडून होस्टेलला जातात’, तेव्हा काय होतं, हे सांगितले आहे. जर तुम्ही किंवा तुमचे कुणीही जवळचे होस्टेलला राहिला असाल तर हा व्हिडीओ आणि हा लेख त्यांना नक्कीच शेअर करा. तुझी माझी यारी मग खड्ड्यात गेली दुनियादारी… अरे ही दुनियादारी म्हणजे मोह माया आहे…. न योग है ना त्याग है सब जगह दुनियादारी है… असे कित्येक डायलॉग तुम्ही मित्रांकडून, चित्रपटांमधून, पाहुण्यांकडून ऐकले असतील. प्रत्येक नवीन ठिकाणी आपली आपली एक वेगळी दुनिया असते आणि तिथल्या दोस्तांसोबतची एक वेगळीच दुनियादारी असते. दरवेळी नवीन वर्गात, नवीन शाळेत, कॉलेजमध्ये आणि शिक्षणासाठी बाहेर गेलेल्या मुलांना हळूहळू या दुनियादारीची माहिती होत असते. मात्र तरीही घरचे म्हणत असतात की, लग्न झाल्यावर खरी दुनियादारी कळेल तुला बेट्या… मात्र घराबाहेर होस्टेलला राहिलेल्या मुलांना, मुलींना आधीच दुनियादारी कळलेली असते. खर्च होणारा पैसे, अडचणीत लांब जाणारे तसेच मदत करणारे दोस्त… किरकोळ गोष्टींवरून रुसणारी मैत्रीण… आणि गावाकडून असनाऱ्या अपेक्षांचे ओझं…
अशा एक ना अनेक गोष्टींना तोंड द्यावं लागतं. अर्थात यापलीकडे जाऊनही खूप बारीक-बारीक गोष्टी होस्टेलमध्ये अनुभवायला मिळतात. तर असो होस्टेलचं आयुष्य खूप काही शिकवणार असतं. आयुष्यातला सगळ्यात बेस्ट आणि सगळ्यात वाईट काळ म्हणजे होस्टेलचा… दिवाळीला सगळे मित्र घरी गेल्यावर हॉस्टेलवर राहायला मजा यायची. लक्ष्मीपूजनाच्या रात्री गच्चीवर थांबून फटाक्यांनी भरलेलं आकाश पाहताना वेगळाच आनंद मिळायचा. नंतर सगळ्या मित्रांच्या घरचा फराळ वाटून खाण्यात मजा यायची. दिवाळीच नाही, तर होळीलाही इथं मजा यायची. रविवारी गच्चीवर सामूहिक गोधडी-चादरी धुवायचा कार्यक्रम व्हायचा. त्यातही घातलेला धिंगाणा वेगळाच.
अशा कितीतरी आठवणी हॉस्टेलशी जोडल्या जातात. खरं तर, हॉस्टेल वाइनसारखं असतं, जितकं जुनं होत जाईल तितकी त्याची चव खुलत जाते.
अशाच या होस्टेल जगलेल्या आणि घर सोडून राहिलेल्या मित्रांची ही कहाणी या ताईच्या तोंडून तेही कवितेच्या माध्यमातून… नक्कीच ऐका.
बघा व्हिडीओ :