जसजसा काळ बदलत जातो, तसतसे आपल्या जगण्यातही बदल होत जातात. अनेक गोष्टी कालौघात पाठी पडत जातात आणि कालांतराने लुप्त होतात. यास कलाही अपवाद नाहीत. काही कला ज्या काही वर्षांपूर्वी ही औत्सुक्याने पाहिल्या जायच्या, त्यांच्या बद्दल आता म्हणावं तेवढंस आकर्षक उरत नाही. परिणामतः त्यांचा प्रेक्षक कमी होत जातो आणि त्या कलेचे कलाकार मग आर्थिक चणचणीत सापडू शकतात. काही जणांना दुसरा मार्ग शोधणे जमतं पण प्रत्येकाला ते जमतच अस नाही.
याच अगदी प्रातिनिधिक उदाहरण म्हणजे डोंबारी ! पूर्वी डोंबाऱ्याचे खेळ बघणं यासाठी एक उत्सुकता असे. आपल्या लहानपणी तर अगदी धावत जाऊन हे खेळ बघावेसे वाटत. पण काळ एवढ्या झपाट्याने बदलत गेला की त्या झपाट्यात आपला जीवनाचा वेगही वाढला. एकदा वेग वाढला की काही गोष्टी निसटून जाऊ लागतात. डोंबऱ्यांचा खेळ ही तसाच मागे पडू लागला आहे. शहरांमध्ये तर त्यांचं क्वचित दर्शन होतं. पण हे दर्शन झालं तरी त्या डोंबऱ्यांना या खेळांतून कितीसे असे पैसे मिळत असतील याची कल्पना नाही. कारण इथे प्रत्येक जण आपापल्या विवंचनेत डोंबारी बनुनच जगतो आहे आणि आयुष्याच्या दोरीवर हिंदकळतो आहे. पण अस असलं तरी आपल्या आणि प्रत्येक समाजात दानशूर मंडळी ही असतातच. याच दानशूर व्यक्ती मग अशा गरजू व्यक्तींना, कलावंतांना मदत करतात. काहींची मदत कळत नाही तर काहींची मदत सुदैवाने कळते.
सुदैवाने आज अशाच एका दानशूर दादांचा व्हिडियो आज आपल्या टीमच्या पाहण्यात आला. हे दादा कुठचे ते माहीत नाही. पण त्यांनी केलेली मदत आपलं मन जिंकून जाते. होतं काय की हे दादा आणि इतर काही व्यक्ती प्रवास करत असतात. हा प्रवास चालू असताना त्यांना डोंबऱ्यांचा एक समूह दिसतो. एक पोरगा, दोन मुली आणि एक छोटं पोर असे ते सगळे जण असतात. त्यांचे खेळ रस्त्याच्या त्या पलीकडे चालू असतात. दादा रस्त्याच्या या अलीकडे असतात. मग ते त्या चौघांपैकी त्या मुलाला बोलावून घेतात. त्याची विचारपूस करतात. त्यांच्या बोलण्यातून जाणवतं की तो दिवस असतो रक्षा बंधनाचा ! हा सण म्हणजे बहिणीची रक्षा भावाने करण्याचं दिलेलं वचन ! या शुभ दिनी अनेक उत्तमोत्तम गोष्टी आपण करत असतो. अनेक नवीन कार्यांचा शुभारंभ होत असतो. तर या दादांसारखे काही जण, दुर्लक्षित घटकांना मदत ही करतात. बरं ही मदत पैसे आणि खाऊ अशा दोन्ही प्रकारची असते. त्यातही हे दादा पैसे देत असताना जवळपास दोन हजार रुपये यांना देतात हे दिसतं. मनुष्य स्वभावाप्रमाणे आपण त्या नोटा मोजतो म्हणून हा आकडा असावा असा अंदाज लावता येतो. पण अनेक वेळा अस म्हणतात की केवळ पैशांची मदत पुरेशी नसते.
हे दादा त्यांना खाऊ ही देतात. व्हिडियो थोडा जुना असल्याने थोडा ब्लर आहे. त्यामुळे सगळ्यांचे चेहरे व्यवस्थित दिसत नाहीत. पण त्या चौघांच्या चेहऱ्यावरचा आनंद त्या ब्लर व्हिडियोतुन ही टिपता येतो हे नक्की ! हा व्हिडियो बघून आम्हाला या दादांचं कौतुक ही वाटलं आणि त्याचवेळी या डोंबारी कुटुंबासाठी बरं ही वाटलं. निदान त्यांचा तो सण तरी आनंदात साजरा झाला असावा यात शंका नाही. असो.
मंडळी हा होता आजचा लेख ! हा व्हिडियो बघताच क्षणी आवडला. त्याचवेळी ठरलं की याविषयी लिहायला हवं. त्यातूनच आजचा हा लेख प्रत्यक्षात आला आहे. आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!
बघा व्हिडीओ :