सध्या ‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेची खूप चर्चा आहे. यातील लतिका आणि अभिमन्यू यांची जोडी आवडावी अशीच आहे. त्यांच्यातले संवाद चांगलेच खुसखुशीत असतात. यातील अभिमन्यूची भूमिका केली आहे समीर परांजपे याने. त्याने याधीही अभिनेता म्हणून काम केलं आहेच. कॉलेज मध्ये असताना पुण्यातील प्रसिद्ध अशा नाट्य स्पर्धांमध्ये समीर भाग घेत असे. गोठ, गर्जा महाराष्ट्र माझा, अग्निहोत्र २, माझे पती सौभाग्यवती या त्याच्या भूमिका असलेल्या नावाजलेल्या मालिका. त्याने २०१४ मध्ये ‘भातुकली’ या सिनेमातहि काम केलं होतं. यात सुनील बर्वे, अजिंक्य देव, शिल्पा तुळसकर, किरण करमरकर, स्मिता तळवलकर अशा दिग्गजांबरोबर काम करण्याचा अनुभव त्याने घेतला होता. समीर ने मालिकांसोबतच नेटफ्लीक्स वरील ‘क्लास ऑफ ८३’ मध्येही काम केले आहे. त्यात त्याने अस्लम खान हि व्यक्तिरेखा साकारली आहे.
अभिनयासोबतच त्याला गायनाचीही आवड आहे. त्याची इंस्टाग्राम अकाउंटची सुरुवात ज्या पोस्ट ने केली ते सुद्धा एक गाणं होतं. तर अशा या गुणी अभिनेत्याला त्याच्या करियरमध्ये अनेक भूमिका मिळाल्या. त्या निभावताना त्याला खऱ्या आयुष्यात भक्कम साथ मिळाली आहे ती त्याच्या पत्नीची. तिचं नाव आहे अनुजा परांजपे. अनुजा या माहिती तंत्रज्ञान क्षेत्राशी निगडीत काम करतात. गेले कित्येक वर्ष ते एकमेकांना ओळखत होते. पुढे या ओळखीचं रुपांतर प्रेमात आणि मग २०१६ साली लग्नात झालं. समीरच्या करियरमध्ये त्याला अनुजा हिची उत्तम साथ लाभली आहे. दोघेही मनमोकळ्या स्वभावाचे आहेत. लॉकडाऊनच्या दरम्यान समीर हा किचन मध्ये कुकिंग करताना त्याच्या सोशल मिडिया वरती दिसला होता.
या जोडीने पोटोबा प्रसन्न या कुकिंग शो मध्येही हजेरी लावली होती. त्यांना कुटुंब आणि मित्रांच्या समवेत वेळ घालवायलाही आवडतं. दोघांनाही एकमेकांच्या गंमती जमती करायला, तसचं एकमेकांना सरप्राईजेस द्यायला आवडतं. तसेच देशात आणि प्रदेशातही विविध ठिकाणांना भेटी द्यायलाही आवडतं. समीर ने त्याच्या करियर मध्ये आत्तापर्यंत रंगमंच, मालिका, सिनेमा आणि वेबसिरीज या माध्यमांतून कामं केली आहेत. पण याच बरोबर त्याला गायलाही आवडतं, तो गातोही उत्तम. त्यामुळे येत्या काळात अभिनयाबरोबरच त्याचं गाणही बहरत जावं आणि सोबत या दोघांचा संसारही या टीम मराठी गप्पा कडून या जोडीला शुभेच्छा !
(Author : Vighnesh Khale)