Breaking News
Home / मराठी तडका / खऱ्या आयुष्यात क’से आहेत अण्णा नाईक, पत्नी आहे शेवंता इतकीच सुंदर, बघा अण्णांची जीवनकहाणी

खऱ्या आयुष्यात क’से आहेत अण्णा नाईक, पत्नी आहे शेवंता इतकीच सुंदर, बघा अण्णांची जीवनकहाणी

मराठी कलाकृतींतून अनेक कलाकारांनी सुप्रसिद्ध व्यक्तिरेखा साकार केल्या आहेत. त्यात नायक म्हणून असलेल्या अनेक व्यक्तिरेखा गाजल्या. तेवढ्याच खल व्यक्तिरेखाही गाजल्या. तात्या विंचू, कवठ्या महाकाळ ही त्यातली काही नावाजलेली नावं. या नावाजलेल्या नावांत गेल्या काही वर्षात एका दमदार नावाने आपली स्वतःची अशी जागा बनवली आहे. अण्णा नाईक ही ती व्यक्तिरेखा. भारदस्त डोळे, कणखर वृत्तीची चर्या, बेफिकिर देहबोली आणि यात भर घालणारी खु’नशी मनोवृत्ती म्हणजे अण्णा नाईक. ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतील ही व्यक्तिरेखा म्हणजे घरा घरातील चर्चेचा विषय. या मालिकेच्या तिसऱ्या पर्वाचं प्रमोशन तर या व्यक्तिरेखेच्या जोरावर झालं होतं, असं म्हंटल्यास वावगं ठरू नये. अशी ही खल पण तरीही लोकप्रिय व्यक्तिरेखा निभावली आहे माधव अभ्यंकर यांनी. आज या लेखाच्या निमित्ताने त्यांच्या कारकिर्दीचा आढावा घेण्याचा मराठी गप्पाच्या टीमचा हा प्रयत्न.

अण्णांचे सध्याचे वय आहे ५९ वर्षे. ११ ऑक्टोबर १९६२ रोजी त्यांचा जन्म झाला. माधव अभ्यंकर यांना कलाक्षेत्राविषयी प्रचंड प्रेम आणि आकर्षण अगदी सुरुवातीपासून. त्यांनी शालेय आणि महाविद्यालयिन जीवनात विविध एकांकिकांमधून स्वतःतील अभिनयाची आवड जोपासली होती. पुढे कारकिर्दीत त्यांनी अनेक नाट्यकृतींतून अभिनय केला. लग्न, घाशीराम कोतवाल ही त्यांनी अभिनित केलेली नाटकं. पुढे पुण्यातील एफ.टी. आय. या संस्थेत चालणाऱ्या प्रायोगिक चित्रपट निर्मिती बद्दल त्यांना कल्पना मिळाली. त्यांनी तिथे काम करण्यास सुरुवात केली. पुढे तर त्यांनी इतकं अवाढव्य प्रमाणात तिथे काम केलं, की त्यांना एफ.टी. आय. चा बच्चन म्हणत असत. ही आठवण त्यांनी काही काळापूर्वी आयोजित केलेल्या एका वेब परिसंवादात शेअर केली होती. यासोबतच त्यांनी अनेक व्यावसायिक सिनेमांतूनही अभिनय केलेला आहे. टाइम प्लिज, ध्यानीमनी, बावरे प्रेम हे, पोश्टर गर्ल, जजमेंट, शेंटीमेंटल ही त्यातली काही उदाहरणं. नाटक, सिनेमे यांच्या सोबतच त्यांनी मालिकांतूनही अभिनय केलेला आहेच. त्यातील सगळ्यात जास्त लोकप्रिय ठरलेली व्यक्तिरेखा म्हणजे अर्थातच अण्णा नाईक.

(फोटोत : रात्रीस खेळ चाले मालिकेतील लोकप्रिय जोडी अण्णा शेवंता म्हणजेच अभिनेते माधव अभ्यंकर आणि अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर)

ही लोकप्रियता एवढी की मालिकेच्या दुसऱ्या पर्वादरम्यान, सेटवर अनेक चाहते केवळ अण्णा आणि शेवंता या व्यक्तिरेखांना भेट देण्यास येत असत. याचाच उपयोग माधवजींनी एका स्तुत्य उपक्रमासाठी केला होता. झालं असं की रात्रीस खेळ चाले चं शूटिंग चालू असताना एके दिवशी आपल्या भारतीय जवानांवर एके ठिकाणी ह’ल्ला झाल्याची बातमी आली. लष्कर, पोलीस यांच्या विषयी विशेष प्रेम असणाऱ्या माधवजींना अर्थातच वाईट वाटलं. पण केवळ वाईट वाटून घेत बसण्याऐवजी जवानांच्या साठी काही करता येईल का हे त्यांनी पाहिलं आणि एक उपक्रम सुरू केला. दुसऱ्या दिवशी पासून त्यांच्यासोबत सेल्फी घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तींसोबत ते सेल्फी फॉर सेल्फ रिस्पेक्ट अर्थात सैनिक हो तुमच्या साठी हा उपक्रम राबवत असत. सेल्फी घेणाऱ्या व्यक्तीने त्याच्या इच्छाशक्तीनुसार एका रुपयापेक्षा जास्त मदत एका बॉक्स मध्ये टाकायची असा हा उपक्रम. प्रेक्षकांनीही यास उत्तम प्रतिसाद दिला. एवढा उत्तम प्रतिसाद की काही दिवसांनी ही रक्कम जेव्हा सिंधुदुर्ग सै’निक स्कुल यांना सुपूर्द करण्यात आली तेव्हा ती होती एक लाख एक हजार रुपये रोख.

(फोटोत : अभिनेते माधव अभ्यंकर आणि त्यांच्या पत्नी रेखा अभ्यंकर)

आपल्या लोकप्रियतेचा असा वापर करून घेतल्याचं नजीकच्या काळातलं हे अगदी दुर्मिळ उदाहरण म्हणता येईल. कारण हे करत असताना सगळा कारभार पारदर्शक राहील हे त्यांनी पाहिलं खरं पण त्याची इतरत्र प्रसिद्धी करत बसले नाहीत. त्यामुळे मदत जरी झाली तरी त्याचे अवडंबर झालेले कधीच कानावर आले नाही. याचे श्रेय माधवजींच्या नेक वृत्तीला. पण एक मात्र खरं की अशा वृत्तीच्या व्यक्तीचं कार्य समाजासमोर जास्तीत जास्त प्रमाणात येणं गरजेचं. अण्णांच्या पत्नींचे नाव रेखा असे आहे. आमचं हे भाग्य कि, माधवजींविषयी माहिती घेत असताना ही माहिती आम्हाला मिळाली आणि आपल्या समोर मांडता आली. या लेखाच्या निमित्ताने लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचूनही आपलं सामाजिक भान बाळगणाऱ्या माधवजींना मराठी गप्पाच्या टिमकडून आणि वाचकांकडून मानाचा मुजरा. त्यांची कारकीर्द अशीच बहरत राहो आणि चाहत्यांना विविध भूमिकांतून आपल्या लाडक्या अभिनेत्यास सतत भेटता येवो हीच सदिच्छा.

आपल्या सगळ्यांना हा लेख आवडला असेलच, तेव्हा हा लेख शेअर करायला अजिबात विसरू नका. तसेच आमच्या टीमने लिहिलेले अन्य लेखही आवर्जून वाचत राहा आणि शेअर करत राहा. धन्यवाद !!!

(फोटोत : अभिनेते माधव अभ्यंकर, त्यांच्या पत्नी रेखा अभ्यंकर आणि त्यांची नातवंडं )

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.