Breaking News
Home / मनोरंजन / खिडकीतून आत येण्यासाठी आईला हाक मारणाऱ्या बोलणाऱ्या पोपटाचा व्हिडीओ होत आहे वायरल, बघा व्हिडीओ

खिडकीतून आत येण्यासाठी आईला हाक मारणाऱ्या बोलणाऱ्या पोपटाचा व्हिडीओ होत आहे वायरल, बघा व्हिडीओ

माणूस असो, इतर प्राणी असोत वा पक्षी असोत, आपल्यात अनेक भावना या समसमान असतात. त्यात जर आपण काही प्राणी अथवा पक्षी पाळलेले असतील तर त्यांच्या ही सवयी आपल्याला पूरक अशाच होतात. याचा आपण पुरेपूर अनुभव घेत असतो. कुत्रा, मांजर यांच्या बाबतीत हे अनुभव तर आपल्या पैकी अनेकांनी घेतले असतील. कारण हे प्राणी प्रामुख्याने पाळले जातात. यांच्या सोबतच एक पक्षी ही असा असतो ज्याला जास्त पाळलं जात, तो चट्कन माणसाळतो सुद्धा आणि अगदी आपल्या सारखा बोलायला ही लागतो. पोपट हा तो पक्षी हे काही वेगळं सांगायला नको. पण एक खरं की वरील तीनही उदाहरणांध्ये पोपट हा आपलं अनुकरण करून बोलायला शिकत असल्याने त्याची एक वेगळीच गंमत असते.

आपल्या आजूबाजूला जर कोणाकडे हा पक्षी पाळला असेल तर आपल्याला याची कल्पना यावी. तसे नसेल तरी युट्युब आहेच. अनेक धमाल देशी विदेशी व्हिडियोज मध्ये हा पक्षी मस्त मजा करताना दिसतो. पण काही वेळेस तो धमाल करत असतोच असं नाही. पण त्याच एखाद्या व्हिडियोत असणं सुद्धा आवडून जातं. आता याच व्हिडियोचं उदाहरण घ्या ना, जो आपल्या टीमने आज बघितला आहे.

या व्हिडियोत आपल्याला एका शहराच्या उत्तुंग इमारतीच्या खिडकीबाहेर अडकलेला पोपट दिसतो. होय, खिडकी बाहेर अडकलेला असतो तो, आणि खिडकीच्या आत नाही. खरं तर असं झालं असावं की हे पोपट महाशय उडत उडत हुंडारून आले असावेत आणि आता घरी कोणी नसावं. त्यामुळे या पोपट पक्षाची अवस्था एखाद्या अल्लड मुलासारखी झालेली असते. असा अल्लड मुलगा जो खेळ खेळून तर आला आहे पण वेळेची मर्यादा न पाळल्याने त्याला आईने बाहेर उभं केलं आहे..अशावेळी हा मुलगा काय करील ? तो इकडून तिकडे फेऱ्या मारेल. हे पोपटराव पण हेच करत असतात. इकडून तिकडे येरझाऱ्या घालत असतात. पण यात गंमतीचा भाग असा की हा पोपट आतल्या एका महत्वाच्या व्यक्तीला हाक मारत असतो. ही व्यक्ती म्हणजे त्या कुटुंबातील आई. खिडकीच्या बाहेर उभं राहून, त्याचा ‘मम्मी मम्मी’ चा धोशा चालू असतो. आपल्या बाकदार चोचीने खिडकीवर टकटक करत राहतो. इथे दुसऱ्या बाजूने त्याच्या या कृतीचं चित्रीकरण होत असतं. कदाचित शेजारी राहणाऱ्या मंडळींना त्याचं कौतुक वाटत असावं. इथे त्याची अवस्था मात्र, ‘मला एकदाचे आत घ्या’ अशी असते.

एखादं अल्लड पोर जस रागावलेल्या आईच्या पाठिपाठी करत माफी मागायचा प्रयत्न करत असतं, तसा फिल येतो. एकदा एके ठिकाणाहून जवळपास तीन ते चार वेळा मम्मीला हाक मारून ही ओ येईना हे बघून हा पोपटराव मग दुसऱ्या बाजूने जातो. तिथेही त्याचा , ‘मम्मी’ चा धोशा चालूच राहतो आणि हा व्हिडियो संपतो. खरं तर अवघ्या चाळीस सेकंदांचा हा व्हिडियो आहे. पण त्या पोपटरावामुळे धमाल येते. तसेच त्याच्या हुशारीचं कौतुक वाटतं. बरोबर मम्मी लाच कसा हाक मारतो पठ्ठा. कदाचित त्यालाही कल्पना असावी, की घरी फक्त एकाच व्यक्तीची हुकूमत चालते, ती म्हणजे त्याची मम्मी. असो. गंमतीचा भाग सोडला तरी त्याच्या या हुशारीचं कौतुक करावे तेवढं थोडं आहे.

आपण ही हा व्हिडियो बघितला असेल आणि आपल्याला तो आवडला असेल अशी अपेक्षा आहे. तसेच आपल्या टीमने लिहिलेला हा लेख ही आपल्या पसंतीस उतरला असणार ही खात्री आहे. कारण आपल्या वाचकांना जे हे आवडतं, त्यावर लेख लिहिण्याकडे आमच्या टीमचा नेहमीच कल राहिला आहे. तेव्हा आमचा हा प्रयत्न आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कळवायला विसरू नका. आपले अभिप्राय आम्हाला नवनव्या विषयांवर लेखन करण्यास प्रोत्साहन देतात. हेच प्रोत्साहन यापुढेही मिळत राहू दे हीच सदिच्छा. आपला दिवस शुभ असो ह्या शुभेच्छा !! धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.