Breaking News
Home / बॉलीवुड / खूपच कमी वयात केले आहे बॉलिवूडच्या ह्या ५ कलाकारांनी लग्न, बघा गोविंदाने केव्हा केले होते

खूपच कमी वयात केले आहे बॉलिवूडच्या ह्या ५ कलाकारांनी लग्न, बघा गोविंदाने केव्हा केले होते

बॉलिवूडच्या मायानगरीत असे बोललं जातं कि, कलाकार यशस्वी झाल्यानंतरच लग्न करतात. कारण त्यांच्या लग्नाचा परिणाम त्यांच्या करियर पडू नये. परंतु काही असे सुद्धा कलाकार आहेत, ज्यांनी खूप कमी वयात लग्न केले आणि यशस्वी झाल्यानंतर लग्न करण्याच्या विचारला छेद दिला. ह्या कलाकारांनी फक्त कमी वयात लग्नच नाही केले तर त्यांनी आपले लग्न यशस्वी करून दाखवले आणि आपलय करिअर मध्ये ते टॉप वर सुद्धा होते. जरी असं असलं तरी काही कलाकारांचे आता लग्न मोडलेले आहे, परंतु काही खूप खुश आहेत. तर चला जाणून घेऊया ज्यांनी कमी वयात लग्न केले होते.

१. शाहरुख खान :
बॉलिवूडचा बादशाह म्हणून ओळख असणाऱ्या शाहरुख खानने २५ ऑक्टोबर १९९१ ला लग्न केले होते. असं सांगितले जाते कि त्यावेळी त्याचे वय फक्त २५ वर्ष होते आणि तो चित्रपटांत एक रोमँटिक हिरो म्हणून ओळख बनवत होता. अशामध्ये आपल्या स्ट्रगलिंगच्या काळात शाहरुखने आपल्या प्रेमाला मागे सोडले नाही आणि आज तो पत्नी गौरी सोबत एक चांगले वैवाहिक आयुष्य जगत आहे.

२. आमिर खान :
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्टनिश्ट म्हणून ओळख असणारा आमिर खानने रीना दत्तासोबत १९८६ मध्ये लग्न केले होते आणि त्यावेळी आमिर केवळ २१ वर्षाचा होता. म्हणजेच आमिरने तेव्हा लग्न केले होते जेव्हा तो स्ट्रगल करत होता. परंतु त्याचे हे लग्न जास्त काळ टिकू शकले नाही. आणि नंतर काही वादविवादांमुळे दोघेही वेगळे झाले. त्यानंतर आमिर खान ने किरण राव हिच्याशी लग्न केले. पत्नी किरणसोबत आमिर खान खूप सुखी आयुष्य जगत आहे.

३. ह्रितिक रोशन :
ह्रितिक रोशन आणि सुजैन खानचे जेव्हा लग्न झाले होते, तेव्हा ह्रितिक रोशनचे वय फक्त २६ वर्षे होते. सुजैन खान हि अभिनेता संजय खान ह्यांची मुलगी आहे. लग्न झाले त्यावेळी ह्रितिक आपल्या करिअर मध्ये खूप संघर्ष करत होता. परंतु आता दोघांचाही काडीमोड झाला आहे आणि दोघांचे मार्गे वेगवेगळे झाले आहेत.

४ सैफ अली खान :
सैफ अली खान ने जेव्हा लग्न केले होते तेव्हा तो फक्त २२ वर्षाचा होता आणि त्याने ज्या अभिनेत्रीसोबत लग्न केले होते ती त्याच्यापेक्षा ८ वर्षांनी मोठी होती. ती अभिनेत्री होती अमृता सिंग. दोघांचे लग्न खूप जास्त चर्चेत राहिले, परंतु काही वर्षानंतर दोघांनी काडीमोड घेतला. अमृतापासून सैफ अली खानला दोन मुले आहेत. त्यापैकी सारा अली खानने बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले आहे. तर दुसरीकडे मुलगा इब्राहिम सुद्धा बॉलिवूडमध्ये पर्दापण करण्यासाठी सज्ज आहे.

५. गोविंदा :
डान्सिंग सुपरस्टार म्हणून ओळख असणाऱ्या गोविंदाने १९८७ मध्ये सुनीता सोबत लग्न केले आणि त्यावेळी तो फक्त २१ वर्षाचा होता. म्हणजेच गोविंदाने करियरमध्ये यशस्वी होण्याअगोदरचा लग्न केले, ज्यानंतरसुद्धा दोघे आजही एकत्र आहेत. सुनीताचे आयुष्य गोविंदासोबत खूप चांगले चालू असून दोघेही एकमेकांसोबत खूप सुखी आहेत.

About IrK0sFrKWQ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *