Breaking News
Home / बॉलीवुड / खूपच रोमँटिक आहे हार्दिक पांड्या आणि नताशाची प्रेमकहाणी, अशी झाली होती पहिली भेट

खूपच रोमँटिक आहे हार्दिक पांड्या आणि नताशाची प्रेमकहाणी, अशी झाली होती पहिली भेट

भारतीय क्रिकेटचा आघाडीचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याचे रिलेशनशिप स्टेटस आता बदलले आहे. होय, नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच हार्दिक पांड्याने संपूर्ण जगाला सरप्राईज देत आपली गर्लफ्रेंड नताशा स्टेनोविक सोबत साखरपुडा केला. साखरपुडा नंतर हार्दिक पांड्या आणि नताशाने आपले फोटोज सोशिअल मीडियावर शेअर करून संपूर्ण जगाला गोड बातमी दिली, त्यानंतर प्रत्येकजण त्यांना शुभेच्छा देताना दिसत आहे. इतकंच नाही, त्यांचे फॅन्स त्यांच्या लव्हस्टोरी मध्ये खूप जास्त रस दाखवत आहेत, ज्यामुळे आम्ही तुमच्यासाठी त्या दोघांची प्रेमकहाणी घेऊन आलो आहोत. भारतीय क्रिकेटचा ऑलराऊंडर खेळाडू हार्दिक पांड्या क्रिकेटच्या मैदानापासून खूप वेळापासून लांब आहे, ज्यामुळे त्याच्या पुनरागमनासाठी त्याचे फॅन्स आतुरतेने वाट पाहत आहेत.

असं मानलं जात आहे कि, हार्दिक पांड्या लवकरच भारतीय संघात परतणार आहे. ते सगळं जाऊ द्या, इथे आपण त्याच्या प्रोफेशनल जीवनाबद्दल नाही तर वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलत आहोत. खरंतर, आम्ही येथे हार्दिक पांड्या आणि नताशा स्टेनोविक दोघांच्या प्रेमकहाणीबद्दल बोलत आहोत, कि शेवटी दोघांमध्ये प्रेम कसे झाले आणि कशी दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली.

नाईट क्लबपासून सुरुवात झाली होती प्रेमाला :
मीडिया रिपोर्ट्सच्या म्हणण्यानुसार, हार्दिक पांड्या आणि नताशा स्टेनोविक दोघांची भेट मुंबईतील एका नाईट क्लब मध्ये झाली होती, त्यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली. नाईट क्लबमधील भेटीनंतर दोघांनी एकमेकांना भेटणे सुरु केले, अश्यातच ह्या भेटीगाठी कधी प्रेमात बदलून गेल्या, कदाचित दोघांनाही ह्याबद्दल माहिती पडले नाही. त्यानंतर दोघेही हळूहळू एकमेकांना डेट करू लागले आणि त्यानंतर डेटिंग करतानाचे दोघांचे फोटोज सुद्धा समोर येऊ लागले होते, परंतु तेव्हा दोघेही आपल्या नात्यावर काहीच बोलण्यापासून दूर राहिले होते.

अश्याप्रकारे झाले जवळीकता निर्माण :
सूत्रांच्या म्हणण्यानुसार, दोघांनी एकत्र दिवाळी सुद्धा साजरी केली आणि नंतर एकमेकांसोबत जास्त वेळ घालवू लागले. वेळ घालवता घालवता एकमेकांसोबत प्रेम झाले आणि दोघांनाही प्रेमाची हवा लागायला वेळ लागली नाही आणि त्यानंतर दोघांच्या प्रेमाच्या चर्चा होऊ लागल्या. दोघेही एकमेकांना खूप कमी वेळापासून ओळखतात परंतु दोघांमध्ये खूप जास्त ताळमेळ बघायला मिळत आहे. इतकंच नाही. दोघेही एकमेकांसोबत वेळ घालवण्यासाठी एकही संधी सोडत नाहीत. क्रिकेटच्या पार्ट्यांमध्ये हार्दिक पांड्या आणि नताशा स्टेनोविक दोघांनाही एकत्र पाहिले गेले आहे, ज्यानंतरच दोघांच्या अफेअरची चर्चा सोशिअल मीडियावर वायरल होऊ लागल्या. आणि आता नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच दोघांनी साखरपुडा केला, ज्यामुळे संपूर्ण जगाला दोघांचा नात्याबद्दल माहिती पडले. ज्यानंतर लोकांनी दोघांनाही शुभेच्छा द्यायला सुरुवात केली. हार्दिक पांड्याने खूपच रोमँटिक पद्धतीने नताशाला प्रपोज केले, ज्याचा व्हिडीओ सोशिअल मीडियावर वायरल झाला.

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.