सोशल मीडियावर हटके आणि भन्नाट असे व्हायरल होत असतात. नेटकऱ्यांचं यामुळे मनोरंजन होतं, असे व्हिडीओ तुफान व्हायरल होतात. सध्या असाच एक मनोरंजक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ आहे, लग्न समारंभातील. या व्हिडीओत तुम्हाला दिसेल की, एक तरुण डान्स करत आहे. पण या तरुणाचा डान्स पाहून उपस्थित प्रत्येक जण चकीत झाला आहे. तुम्ही आतापर्यंत झिंगाट डान्स किंवा नागिन डान्स पाहिला असेल. पण सध्या सोशल मीडियावर या तरुणाच्या कोंबडा डान्सची चर्चा आहे. आम्ही असं का म्हणतोय, ते तुम्हाला व्हिडीओ पाहिल्यावरच कळेल. काही दिवसांपूर्वी एक अंगात आल्यासारखे जे तरुन नाचतात, त्यांचा डान्स व्हायरल झाला होता. त्याला व्हायरल डान्स असे म्हटले होते तर जे दारू पिल्यावर लोक जसे नाचतात, त्याला बेवडा डान्स म्हटले गेले होते. नागीण डान्स सारखा जगविख्यात प्रकार मागे पडून हे असले भयंकर अतरंगी डान्स पुढे आले आहेत.
नागिन डान्स केल्याशिवाय कार्यक्रमात मजाच येत नाही. कुटुंबात एखादा व्यक्ती तरी असतोच ज्याचा नागिन डान्स पाण्यासाठी लोक गर्दी करतात. टाळ्या आणि शिट्या वाजवून त्याला डान्स करण्यासाठी प्रोत्साहित करतात. पण आज आम्ही तुम्हाला नागिन डान्स पेक्षाही जबरदस्त डान्स स्टेप्स दाखवणार आहोत. याला कोंबडा डान्स असं म्हणतात. लग्नाच्या वरातीत या तरुणानं अशा काही अतरंगी स्टेप्स मारल्या आहेत. की ज्या पाहून नागिन डान्सर देखील थक्कच होतील. हा डान्स पाहून तुम्हाला देखील हसू आवरणार नाही. हा एकदा व्हिडीओ एकदा पाहाच. या व्हिडीओत दिसणाऱ्या तरुणाने खरच कोंबडा खाऊन हा डान्स केला की काय? असे वाटू लागते. इतका परफेक्ट कोंबडा डान्स केला आहे. या व्हायरल व्हिडीओतील तरुण जणू अचानक अंगात आल्यासारखं किंवा अंगात कोंबडा शिरल्यासारखा नाचायला लागतो. त्याचे हात, पाय, मान अशं संपूर्ण शरीर अगदी कोंम्बड्याच्या प्रकारच्या डान्स स्टेप मारताना तुम्हाला दिसेल. या तरुणाचा अंतरंगी डान्स पाहून बाजूला नाचणाऱ्या अनेकांची तंद्री उडाली.
सर्वजण आजूबाजूला पळू लागले, काही जणांना तर तरुणाचा विचित्र डान्स पाहून हसूही आवरत नव्हतं. या तरुणाची ही करामत डान्स कमी आणि एखाद्या मजा मस्ती जास्त वाटत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की पाहुणे मंडळी लग्नाच्या आधी असणाऱ्या कार्यक्रमात नाचत आहेत. याच दरम्यान एक तरुण पुढे येतो आणि तो कोंबडा डान्स करू लागतो. एक कोंबडा ज्या काही अॅक्शन करतो त्या सर्व अॅक्शन तो डान्सच्या माध्यमातून दाखवत आहे. बरं तो एवढ्यावर थांबत नाही तर पुढे कोंबड्याच्यानंतरच्या देखील अजब अॅक्शन दाखवतो. त्याचा हा डान्स पाहुन वाजंत्री मंडळी देखील थक्क होतात. ते आणखी जोरजोरात डीजे वाजवून त्याला नाचण्यासाठी प्रोत्साहित करतात. हा व्हिडीओ तुमचंही मनोरंजन करेलच याची खात्री आम्हाला आहे. म्हणूनच आता हा व्हायरल व्हिडीओ तुम्हीही बघा आणि मजा घ्या. काळजी घ्या तसेच आमचे लेख वाचून, व्हिडीओ पाहुन आनंदी राहा.
बघा व्हिडीओ :