माणसाच्या अंगात किडे असायला पाहिजेत. हे किडे असतील तर जगण्याची मजाय… नाहीतर ‘पृथ्वी पर आये और गये… खेल खतम… क्यू जीए मालूम नही, क्यू मरे मालूम नहीं’, तर असं साधं सरळ सरधोपट जीवन जगणारे लोक एका बाजूला… आणि अंगात किडे असूनही माज न जिरलेले लोक एका बाजूला… आज आमच्याकडे असा एक व्हिडिओ आला आहे. ज्यात एका माणसाला थेट नाकाला खेकडा चावला आहे. पण तरीही याचा कंड जिरलेला नाही.
सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल, हे जसं कुणाला सांगता येत नाही. अगदी त्याच पध्दतीने प्राण्यांच्या मनात काय चालू असत, हे कधीच कुणी सांगू शकणार नाही. ठरवलं तर प्राणी जीवापाड प्रेम करतात नाहीतर एखादी धुसनी देऊन थेट दवाखान्यात पाठवतात. त्यातही शेतीत रमणारे प्राणी असतील तर त्यांची बातच निराळी असते. बैलाने मालकाला पाडल्याचे व्हिडीओ जसे तुम्ही पाहिले असतील तसेच आपल्याला मालकाला बैलाने जीव लावल्याचे व्हिडीओ पण पाहिले असतील. अगदी शांत असणाऱ्या गाईचे क्रोध दाखवणारे व्हिडीओ पण तुम्ही पहिलेच असतील. मात्र आज आम्ही जो व्हिडीओ तुम्हाला दाखवणार आहोत, तो एका खेकड्याचा आहे. आणि हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.
आता सर्वसामान्य माणसाला खेकडा चावला तर तो काय करेल. तो लै स्वतःला जपणारा असेल तर गावातल्या एखाद्या डॉक्टरकडं जाईल आणि दवापानी करेल. एखादा म्हातारा खेकडा पकडायचा नाद सोडून देईल. आणि एखादा लैच नादिक गडी असेल तर त्या खेकड्याला पकडुन खाल्ल्याशिवाय राहणार नाही. याच्यापलीकडे कुणी काही करेल, असं वाटत नाही. पण मी वर सांगितल्याप्रमाणे काही अंगात किडे असणाऱ्या माणसांचा नाद कुणीच करू शकत नाही. एक माणूस खेकडा पकडायला गेला. त्याने खेकडा पकडलाही पण आता त्याला कंड आला खेकड्याचा व्हिडीओ काढायचा. बर एवढा व्हिडीओ काढून गड्याने थांबावं ना… खेकडा पार नाकाला चावायला लागला तरी याचा व्हिडीओ काही थांबेना… मग पुढे काय फजिती झाली, हे जाणून घेण्यासाठी व्हिडीओ तर बघावाच लागणार ना भाऊ..
माणसाच्या आयुष्यात काही असो व नसो पण 2 गोष्टी पाहिजेच. पहिली गोष्ट म्हणजे कसला न कसला छंद आणि दुसरी गोष्ट म्हणजे ‘कंड’ पाहिजे. ‘कंड’ हा गावाकडचा म्हणजेच अस्सल ग्रामीण, गावरान आणि गावठी भाषेतील शब्द आहे. या शब्दाचा शहरी भाषेत किडा असा अर्थ होतो. म्हणजेच आपण बऱ्याचदा म्हणतो असतो, त्याच्या अंगात लै किडे आहेत. अमूकच्या अंगात लै राहिमानी किडे आहेत. नाहीतर सुलतानी किडे आहेत. तर हे असे किडे असलेल्या माणसाने नाकाला खेकडा चावूनही व्हिडीओ काही बंद केला नाही.
आयुष्य सगळेच लोक जगत असतात पण छंद किंवा अंगात कंड असलेले लोक खऱ्या अर्थाने वेगळे आणि मनसोक्त आयुष्य जगतात. आता आम्हाला हे सगळं लिहिण्याचा प्रपंच सुचला तो एका डान्स व्हिडिओमुळे. खरं पाहिलं तर हा व्हिडीओ तुम्ही आतापर्यंत अनेकांच्या स्टेटसला, स्टोरीला आणि इतर टाईमलाईनला पाहिला असेल. पण निसतं व्हिडीओ बघण्यात मजा नसतीय ओ शेठ… जरा खोलात जाऊन आपल्याला त्या व्हिडीओमागचा कंड बी समजला पाहिजे. आता हे आर्टिकल वाचून झाले असेल तर बघा हा भारी व्हायरल व्हिडीओ…
बघा व्हिडीओ :