Breaking News
Home / मनोरंजन / खेळायला जाण्याच्या घाईत ह्या मुलाचे पाढे पाहून हसू आवरणार नाही, बघा व्हिडीओ

खेळायला जाण्याच्या घाईत ह्या मुलाचे पाढे पाहून हसू आवरणार नाही, बघा व्हिडीओ

आपण मराठी गप्पावर आत्तापर्यंत अनेक वायरल व्हिडियोज विषयी वाचलं आहे. आम्ही वेगवेगळ्या विषयांवरील वायरल व्हिडीओ तुमच्या भेटीस आणत असतो. त्यामागे तुमचे निव्वळ मनोरंजन व्हावे, तुम्हांला माहिती मिळावी किंवा नवीन काहीतरी द्यावे हा मूळ हेतू असतो. काही विनोदी व्हिडीओज असतात, तर काही भावनिकसुद्धा असतात. आज अशाच एका वायरल व्हिडियो विषयी आपण जाणून घेणार आहोत. हा व्हिडीओ आहे एका लहान मुलाचा. अगदीच लहान, पण शाळेत जात असणारा. कोणी तरी त्याची अंकांची उजळणी घेतंय, असं जाणवतं. पण या छोट्या रावांना मात्र खेळायला जायची घाई दिसते. त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव, सारखं पाठी पाहणं पाहून त्याला खेळायला जायची घाई आहे, हे कळतं.

पण तरीही तो उजळणी सुरू करतो. एक ते आठ पर्यंत गाडी येते आणि मग अचानक घसरते. पण त्याला चूक कळते. कशीबशी उजळणीची गाडी सावरत सावरत विसाच्या पुढे जाते आणि मग अगदी जोरात धावते की हो. पाहणारा हसून हसून लोटपोट होतो. त्यात खेळायला जायची घाई असावी. त्यामुळे उजळणीची गाडीचं मग विमान होतं. ते थेट चाळीसच्या पुढील घरात जातं आणि वेगही पकडतं आणि पन्नास म्हणून उजळणीचं विमान तर उतरतं, पण हा लहान मुलगा मात्र खेळायला पळतो. पाहणारा व्यक्ती अर्धा मिनिटाच्या या व्हिडियो भर हसत राहतो. खरंच, लहान मुले म्हणजे देवाघरची फुले म्हणतात ते काही खोटं नाही. त्यांच्या वागण्याच्या तऱ्हा, बोलणं सगळंच मनमोहक वाटतं. त्यांच्या रूपाने निरागसता अजूनही टिकून आहे याचं बरं वाटत राहतं. आम्ही हा व्हिडीओ खाली देत आहोत, तुम्ही नक्की पहा.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *