वायरल डान्स व्हिडियोज वरील लेख वाचण्याचं आपलं हक्काचं ठिकाण म्हणजे मराठी गप्पा. आपली मराठी गप्पाची टीम सातत्याने, विविध वायरल व्हिडियोज बघून त्यावर लेख लिहीत असते. यात आम्ही कधीही खंड पडू देत नाही. कारण केवळ एकच. आमच्या वाचकांचं दररोज मनोरंजन झालेच पाहिजे आणि त्यांना धकाधकीच्या आयुष्यातून काही क्षण विसावा मिळाला पाहिजे. आजच्या लेखासाठी पाहिलेला व्हिडियो आहे आपल्या लाडक्या गणेशोत्सव काळातला.हा व्हिडियो काही वर्षांपूर्वीचा आहे.यात एका घरगुती गणपती बाप्पाच्या साक्षीने त्या घरातील दोन काकू गणपती बाप्पा समोर आपलं नृत्य सादर करतात. त्यांनी सादर केलेला कोळी डान्स हा अतिशय अप्रतिम आहे आणि आजचा हा लेख हा याच व्हिडियो विषयी आहे. हा व्हिडियो सुरू होतो तोच मुळी एका सुप्रसिद्ध गाण्याच्या साथीने. त्याअगोदर आपल्याला दिसतात ते आपले लाडके बाप्पा आणि त्यांच्यासोबत असलेली गौराई.
मनोमन बाप्पाला आणि गौराईला नमन करत आपण व्हिडियो बघणं सुरू करतो. व्हिडियो मध्ये ‘या गो दांड्यावर, नवरा कुणाचा येतो’ हे लोकप्रिय गीत वाजत असतं. व्हिडियोच्या केंद्रबिंदू असतात या दोन काकू. त्यांना नृत्याची आवड असल्याचं त्यांच्या स्टेप्स बघून कळून येतं. तसेच त्यांनी अतिशय मेहनतीने हा डान्स बसवल्याचं लक्षात येतं. कारण प्रत्येक स्टेप अगदी व्यवस्थित आणि एकत्रितपणे करत दोघीही मस्त नाचत असतात. कोणतीही व्यक्तीं जेव्हा डान्स करताना त्याचा आनंद घेत घेत डान्स करत असते तेव्हा डान्स उत्तम होतोच. या दोघी याचं मूर्तिमंत उदाहरण. हे नृत्य पाहायला घरातील मंडळीही उपस्थित असतात. त्यात खासकरून मजा येते जेव्हा ‘यजमान गो, यजमान चष्मे वाले’ ही ओळ येते तेव्हा. दोघीही हाताच्या स्टेप्सचा उपयोग करत चष्मे वाले दाखवतात. आपोआप उपस्थितांमध्ये खसखस पिकते. बाजूला उभे असलेले दादा सुदधा कॅमेऱ्याआड असणाऱ्या कोणाशी तरी मस्करीत काही बोलतात. संपूर्ण डान्स उत्तम झाल्यावर त्याचा शेवटही अगदी उत्तम होतो. दोघीही दमतात खऱ्या पण उपस्थितांची दाद मिळवून जातात.
डान्स आणि व्हिडियो संपतो तेव्हा आपसूकच या दोघींविषयी आपल्या मनात कौतुक असतं. कारण कोणत्याही उत्सवात कामं ही मोठ्या प्रमाणावर असतात. त्यात आपला लाडका बाप्पा आला की त्याचा पाहुणचार व्यवस्थित व्हावा, त्याला आवडणारा नैवैद्य अगदी साग्रसंगीत असावा आणि वेळेवर मिळावा ही आपली इच्छा असते. त्यामुळे घरातील महिला वर्ग या काळात सतत व्यस्त असतो. पण त्यातूनही वेळ काढून या दोघींनी हा छान डान्स बसवला हे कौतुकास्पद. या दोघींचा डान्स तर आपल्याला आवडला असेलच. तसाच आजचा हा लेखही कसा वाटला ते ही आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा. तसेच हा लेख वाचून झाल्यावर खास आपल्यासाठी असलेले विविध लेखही वाचा. त्यात आपल्याला वायरल व्हिडियोज, कलाकार, त्यांची कारकीर्द आणि इतरही बरेच विषय हाताळलेले आहेत ते वाचता येतील. या लेखांमुळे मराठी गप्पावरील आपला वेळ आनंदात जाईल हा विश्वास आहे. तसेच यामुळे या धकाधकीच्या आयुष्यात काही क्षण का होईना आपल्याला विसावा मिळावा ही सदिच्छा. आपला आणि आपल्या टीमचा स्नेह असाच वाढता राहू दे. आपल्याला आवडणारे लेख शेअर करायला विसरू नका. धन्यवाद !!!
बघा व्हिडीओ :