Breaking News
Home / मनोरंजन / गणिताच्या शिक्षकांनी कॉलेजच्या फेअरवेल पार्टीमध्ये केला अप्रतिम डान्स, बघा व्हिडीओ

गणिताच्या शिक्षकांनी कॉलेजच्या फेअरवेल पार्टीमध्ये केला अप्रतिम डान्स, बघा व्हिडीओ

शाळा असो, कॉलेज असो वा अगदी दैनंदिन आयुष्य. बेरीज, वजाबाकी, भागाकार आणि गुणाकार सोडला तर गणिताशी आपला फारसा संबंध येत नसतो आणि तो यावा अशी आपली इच्छाही नसते. कारण गणित म्हणजे रुक्षपणा असा एक समज आपल्या डोक्यात बसलेला असतो. तोच समज पुढे, ज्यांना गणित येतं त्यांच्या बाबतीत ही नकळतपणे केला जाऊ शकतो. पण खरंच अस असतं का? उत्तर नाही असं आहे. गणित शिकणारे आणि शिकवणारे हे काही रुक्ष स्वभावाचे असतात असं नाही. उलट आयुष्याचा मस्त अनुभव घेणारी अशी ही माणसं असतात. याची उत्तम प्रचिती येते ती एका व्हिडियोद्वारे.

हा व्हिडियो वैभव कुमार यांच्या युट्यूब चॅनेल वरून बघायला मिळतो. वैभवजी हे आय आय टी मद्रास च्या गणित विभागाशी संलग्न असलेलं एक व्यक्तिमत्व. एकदम उत्साही आणि त्यातही डान्सची विशेष आवड असणारे. त्यामुळे विविध स्तरावर त्यांनी डान्स केल्याचे व्हिडियोज आपल्याला पाहायला मिळतात. त्यातही आय आय टी मद्रासच्या गणित विभागाच्या स्नेहसंमेलन प्रसंगी त्यांनी केलेला डान्स हा विशेष लक्षात राहतो. याच डान्सचा व्हिडियो आज आपल्या टीमने पाहिला आणि म्हंटलं याविषयी आपल्या वाचकांना वाचायला आवडेलच.

हा व्हिडियो सूरु होतो तेव्हा वैभवजी एका ऑडिटोरियम मध्ये उभे असतात. आजूबाजूला शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित असावेत असा कयास बांधता येतो. व्हिडियोच्या सुरुवातीपासून एका प्रसिद्ध गाण्याची धून कानावर पडत असते. गोविंदा यांच्या लोकप्रिय ठरलेल्या, ‘तुझको मिर्ची लगी तो मैं क्या करू’ या गाण्याची ही धून असते. हे गाणं अगदी धुमधडाक्यात सादर होणं अपेक्षित असतं आणि तस ते होतं सुद्धा. त्यासाठी अर्थात श्रेय जातं ते वैभव यांना. सुरुवातीस स्लो मोशन मध्ये ते ज्या प्रकारे ठुमके लगावतात त्यावरून कळून येतं की यांना डान्सची आवड आणि सवय दोन्ही आहेत. मग तर काय एका पेक्षा एक स्टेप्स करत त्यांचा डान्स सुरू राहतो. त्यात गोविंदाजींसारख्या स्टेप्स केल्यामुळे अजून गंमत येते. तसेच शब्दांना अनुसरून ही डान्स केलेला असतो त्यामुळे त्या डान्सला ही अजून अर्थ येतो. सोबत ठुमके आणि स्लो मोशन यांचं उत्तम टायमिंग साधल्याने डान्स पुन्हा पुन्हा पाहावा असंच वाटत राहतं.

बघायला गेलं तर केवळ एक मिनिट २८ सेकंदांचा असा हा व्हिडियो आहे. म्हणजे दीड मिनिटांपेक्षा ही कमी वेळ आहे हा. पण आपण यापेक्षा नक्कीच जास्त वेळ हा व्हिडियो बघण्यात घालवतो. कारण डान्स ही अशी कला आहे जी मनापासून सादर केली असता पुन्हा पुन्हा पहावी आणि अनुभवावी अशीच वाटते. हाच अनुभव सदरचा व्हिडियो बघताना येतो. तेव्हा आपण हा व्हिडियो बघितला नसेल तर नक्की बघा. उत्तम डान्सचा आनंद अनुभवा.

सोबतच मंडळी आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला कसा वाटला याचा अभिप्राय ही द्या. कारण आपली टीम आपल्या वाचकांसाठी नेहमीच विविध विषयांवर लेखन करत असते. यासाठी स्फूर्ती मिळते ती आपल्या प्रोत्साहनपर कमेंट्स मधून ! तसेच आपण मोठ्या प्रमाणात आपले लेख शेअर करता तेव्हाही आम्हाला प्रोत्साहन मिळत असतं. त्यातूनच मग उत्तमोत्तम लेख लिहिले जातात आणि वायरल ही होतात. तेव्हा आपला हा पाठिंबा आमच्या टीमच्या पाठीशी कायम असू द्या. लेख वाचत राहा, शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा !!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *