Breaking News
Home / मराठी तडका / गर्भारपणात चिंच खाल्ली पाहिजे कि नाही, बघा

गर्भारपणात चिंच खाल्ली पाहिजे कि नाही, बघा

गर्भारवस्थेत काही न काही आंबट खायचं मन होतेच आणि चिंचेचं नाव या यादीत सगळ्यात वर असते. परंतु गर्भारपणात चिंच खायच्या आधी त्याने होणारे फायदे आणि तोटे समजून घ्या. गर्भावस्थेदरम्यान शरीराला अनेक बदलातून जावे लागते. जसे कि मूड स्विंग आणि खाण्याच्या सवयीत बदल होणे. असे मानले जाते कि गर्भारपणात महिलांना आंबट वस्तू जसे कि लिंबू, लोणचे आणि चिंच खायची खूप इच्छा होते. असेही समोर आले आहे कि गर्भापणाच्या पहिल्या तीन महिन्यात काही खायची इच्छा जास्त असते. काही लोकांचे म्हणणे आहे कि या दरम्यान चिंच खाणे नुकसानदायक होऊ शकते परंतु विशेषज्ञांचे ऐकले तर काही प्रमाणात चिंच खाल्याने आई आणि बाळाला काही फायदे हि होतात.

गर्भारपणात चिंच खाली पाहिजे कि नाही

होय, गर्भवती महिला चिंच खाऊ शकतात. त्यात व्हिटॅमिन ए आणि सी तसेच कॅल्शिअम असते आणि प्रोटीन, फायबर आणि उपयुक्त साखर हि असते. पॅरासिटामोल, इबुप्रोफेन आणि एस्प्रिन सारखी औषधे घेत असाल तर त्या औषधांच्या २४ तासानंतरच चिंच खाल्ली पाहिजे. चिंच आपल्या आहारात घ्यायच्या आधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या, कि ते कशा प्रकारे तुमच्या शरीराला प्रभावित करू शकते. गर्भारपणाच्या तिसऱ्या महिन्यात या गोष्टी ध्यानात ठेवा.

गर्भारपणात चिंच खाण्याचे फायदे
जर चिंच खाण्यावर नियंत्रण ठेवले तर त्यामुळे असेक फायदे मिळू शकतात, जसे कि :
१ . चिंचेचे सूज-रोधी गुणामुळे दुसऱ्या आणि तिसऱ्या महिन्यात होणाऱ्या पायाची सूज, पॉट फुगणे तसेच मांसपेशींचे दुखणे कमी करण्यास मदत करते.
२ . चिंचेत फ्लेवेनोएडस आणि पॉलिफेनोल्स असतात जे जेस्टेशनल डायबिटीज पासून तुमचा बचाव करतात.
३ . यात असलेले खनिज पदार्थ काही मर्यादेपर्यंत रक्तदाब नियंत्रणात आणण्यात मदत करतात. गोड चिंच गर्भारपणात बद्धकोष्ठता दूर करते. त्याने अतिसाराच्या समस्येपासून हि वाचले जाते.
४ . गर्भावस्थेत होणारी मळमळ आणि अशक्तपणा कमी करण्यासाठी सुद्धा चिंच खाऊ शकतात.

बाळाच्या विकासास मदत
चिंचेच्या नियासिन असते किंवा व्हिटॅमिन बी ३, ४ असते जे गर्भवती महिलांची रोजच्या पोषण तत्वांची १० टक्के आवश्यकता पूर्ण करते. ते पुढे जाऊन बाळाच्या नसा, मेंदू आणि पचन तंत्र विकसित करण्यास मदत करतात.

अकाली जन्माचा धोका
चिंचेत आयर्न भरपूर प्रमाणात आढळले जाते. हे शरीरातील रक्ताची पातळी वाढवते, ज्यामुळे अकाली जन्म म्हणजेच नऊ महिन्याआधीच प्रसूती होण्याचा धोका कमी होतो. त्याने बाळाच्या जन्माच्या वेळी वजन कमी होण्याची जोखीम हि कमी होते. अकाली प्रसूती होणे, बाळासाठी चांगले नसते या दरम्यान बाळाची पूर्ण वाढ झालेली नसते.

गर्भावस्थेत चिंच खाण्याचे तोटे
गर्भारपणात चिंच खाल्यास फायद्यासोबत नुकसान हि होते. परंतु नुकसान अधिक प्रमाणात चिंच झाल्यावरच दिसतात. चिंच जास्त खाल्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण असंतुलित होते. अधिक प्रमाणात चिंच खाल्यास रक्तदाब वाढून नुकसान होऊ शकते. अशातच, गर्भारपणात खूप आंबट पदार्थ खाण्याची इच्छा होते त्यामुळे तुम्ही कमी प्रमाणात चिंच खाऊ शकतात. कमी आणि मर्यादेत चिंच खाल्याने कोणतेही नुकसान होत नाही.

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.