Breaking News
Home / मनोरंजन / गर्लफ्रेंडला इम्प्रेस करण्यासाठी बाईकवरून स्टंट करत होता तरुण, परंतु पुढे जे घडलं ते पाहून हसू आवरणार नाही

गर्लफ्रेंडला इम्प्रेस करण्यासाठी बाईकवरून स्टंट करत होता तरुण, परंतु पुढे जे घडलं ते पाहून हसू आवरणार नाही

आपली छाप समोरच्यावर पडावी असं कुणाला वाटत नाही? प्रत्येकाला वाटतं. अगदी लहान पोरापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत हे सगळ्यांनाचं वाटतं. प्रत्येकाची ती एक मनस्वी इच्छा असते. अर्थात वय वाढलं की, ही भावना कमी तीव्रतेची असते इतकंच आणि त्यातही काही अपवाद असतात. पण तरीही ही भावना अनेकांमध्ये असते. त्यामुळे या इच्छेला शांत करण्यासाठी मग आपण आपल्याला जमेल ते करत असतो. काही वेळा आपण ते जास्त प्रमाणात केलं तर, आपलेच मित्र म्हणतात नाही का, ‘भाई, जरा जास्त शायनिंग मारतोय’ !

गंमतीचा भाग सोडला तर खरंच समोरच्या व्यक्तीवर आपली छाप पडावी ही आपली मनोमन इच्छा असते. त्यातही सदर व्यक्ती आपल्या अगदी जवळची असेल तर ही भावना नक्कीच प्रबळ असते. इतकी प्रबळ की मग आपणही आपल्यातली विविध ‘कौशल्य’ या व्यक्तीला दाखवायची एकही संधी सोडत नाही. ही हौस इतकी असते की कधी कधी या हौसेचं रूपांतर किश्यामध्ये होतं. आता आमच्या टीमने बघितलेल्या एका व्हिडियोच उदाहरण घ्या ना.

या व्हिडियोत आपल्याला तीन जणं भेटतात. त्यातील एकाची फक्त सावलीच दिसते आणि बाकीचे दोघे मात्र आपल्याला व्हिडियोत स्पष्टपणे दिसतात. आता यात ज्याची सावली दिसते तो बहुधा या व्हिडियोचा कॅमेरामन असणार. तसेच बाकीचे दोघे जे दिसतात ते बहुधा हा व्हिडिओ चित्रित करते वेळी एकमेकांचे प्रियकर प्रेयसी असावेत असा अंदाज बांधता येतो. हा अंदाज बांधायचं कारण म्हणजे या व्हिडियोत घडणारी घटना ! या व्हिडियोत आपल्याला एक बाईक स्टंट बघायला मिळतो. हा स्टंट अनेक बाईक स्टंट करणाऱ्यांमध्ये लोकप्रिय आहे. बहुधा प्रियकर आणि प्रेयसी यांच्यांत हा स्टंट बऱ्यापैकी प्रसिद्ध असतो. जर व्यवस्थित जमला तर हा स्टंट खरंच मनोरंजन म्हणून बघायला मजा येते. या स्टंट मध्ये होतं काय तर बहुधा प्रेयसी (किंवा काही वेळेस फक्त एखादी मुलगी) एके ठराविक ठिकाणी उभी असते. स्टंट आहे म्हंटल्यावर प्रियकर वा बाईकर हा ठराविक अंतरावर बाईकवर बसलेला असतो. स्टंट सुरू झाल्यावर हा मुलगा बाईक सुरू करून समोर उभ्या मुलीजवळ येतो. वेग नियंत्रित करत तो एका क्षणी आपली बाईक पुढील चाकावर उभी करतो. अशावेळी समोर उभी असलेली मुलगी आणि हा मुलगा आपली डोकी एकमेकांना हलकेच टेकवतात.

कदाचित इथे वाचताना इतका रोमँटिक वाटत असेल वा नसेल. पण आपल्यापैकी ज्यांनी ज्यांनी हा यशस्वी स्टंट पाहिला आहे त्यांना याची कल्पना येईल. कारण यात बाईकस्वाराचं कौशल्य आणि समोर उभ्या मुलीचं धैर्य हे दोन्ही कामाला येतात. आता वर उल्लेख केलेल्या व्हिडियोत हे सगळं होतं का? तर बऱ्याच अंशी होतं. या मुलीचं धैर्य हे निर्विवादपणे दिसून येतं. पण बाईक चालवणाऱ्या मुलाचं एक तर वेगावर नियंत्रण राहत नाही किंवा त्याचा बाईक आणि मुलगी उभी असते त्याचा अंदाज चुकतो किंवा दोन्ही बाबी होतात. अर्थात कारण काहीही असलं तरी परिणाम असा की या बिचाऱ्या ताईला या बाईकचा बऱ्यापैकी जोरात धक्का लागतो. त्यामूळे ती बाजूला पडते. पुढे कॅमेरा धड राहत नाही त्यामुळे कळत नाही पण कदाचित हा मुलगा ही पडतो. त्यातल्या त्यात सुदैवाचा भाग इतकाच की या संपूर्ण व्हिडियोभर दोघांनीही हेल्मेट घातलेलं आपण बघू शकतो. त्यामुळे पडले तरी डोक्याला दुखापत झाली नसावी असा आपण अंदाज बांधू शकतो. पण बाकीची माहिती उपलब्ध नसल्याने त्याविषयी टिपणी करणं योग्य होणार नाही म्हणून इथेच थांबतो. पण सदर घटनेनंतर हे दोघेही सुखरूप असतील एवढीच सदिच्छा आमची टीम व्यक्त करू इच्छिते !

तसेच लेख संपवण्यापूर्वीय आपल्या वाचकांना सूचना करावीशी वाटते. ही सूचना म्हणजे स्टंट करणं ही बाब वाटते तेवढी सोप्पी नाही आणि भर रस्त्यात करणं तर तसेही योग्य नाही. जे स्टंटमन वा स्टंटवुमन कार्यरत असतात त्यांच्यापाठी प्रशिक्षण आणि बराच अनुभव असतो. तेव्हा आपल्याकडे या गोष्टी नसतील तर यापासून दूर राहिलेलं बरं. कारण स्टंट करताना तसाही धोका कायम असतोच, त्यामुळे त्यात योग्य ते प्रशिक्षण घेतल्याशिवाय आणि आजूबाजूला तसं सुरक्षित वातावरण तयार केलेलं असल्याशिवाय स्टंट केले असता हे आपल्याला आणि इतरांना ईजा पोहोचवू शकतात. त्यामुळे सदर व्हिडियो वा इतर स्टंट व्हिडियो पाहून काहीही स्टंट वा तत्सम प्रकार करायला जाऊ नका ही विनंती. बाकी सांगणे न लगे, आपण सुज्ञ आहातच.

चला, तर मंडळी हा होता आजचा लेख. आपल्या टीमने लिहिलेला हा लेख आपल्याला आवडला असेल अशी अपेक्षा आहे. आपली टीम नेहमीच उत्तमोत्तम विषयांवर लेखन करत असते आणि करत राहील. त्यासाठी अर्थातच आपला पाठिंबा अपेक्षित आहे आणि जो आम्हाला मिळतो ही आहे. हा पाठींबा येत्या काळात ही मिळत रहावा ही सदिच्छा. आपली टीमही नेहमीच उत्तमोत्तम लेख आपल्या भेटीस घेऊन येत राहील याची खात्री बाळगा. लवकरच एका नवीन विषयासह भेट होईलच. तोपर्यंत आपल्या टीमचे अन्य नवनवीन लेख वाचत राहा. आठवणीने सगळे लेख शेअर करत राहा आणि आनंद वाटत राहा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *