सोशल मीडिया म्हणलं की काही ना काही मनोरंजक असा प्रकार हमखास डोळ्यांसमोर येतोच. आणि त्या मधे सुद्धा या सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक प्रकारचे मजेशीर व्हिडिओ हे नेहमीच व्हायरल होत असल्याचे आपल्याला बघायला मिळत असते. आणि त्या व्हायरल होत जाणाऱ्या व्हिडिओतील प्राण्यांच्या दिसण्यात येणाऱ्या विविध अदा पाहून सर्वांनाच फार मजा येत असते.
हे असे काही मजेशीर व्हिडिओ पाहत असताना अनेकांना तर त्यांचे हसू आवरत नाही, आणि हे असे काही व्हिडिओ तर इतके मजेदार असतात की ते त्यावरुन नजर हटवणं कठीण असतं पण काही व्हिडिओ बघून तर लोकांना राग सुद्धा येत असतो आणि असाच एक व्हिडिओ अलिकडच्या काळात सोशल मीडिया माध्यमांवर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालाही थोड्याफार प्रमाणात राग येऊ शकतो.
तर या व्हायरल झालेल्या व्हिडिओ मधे एक मुलगा आणि एक गाय उभी असल्याचे दिसत आहे. ती गाय शांत उभी आहे परंतु हा मुलगा मात्र त्या गायीचे दोन्ही शिंगे धरून त्या गायची मान वर खाली करत असल्याचे दिसत आहे आणि हे करत असताना मागे बाहुबली या सिनेमा मधील टायटल ट्रॅक वाजत असल्याचे पण दिसत आहे. परंतु ज्यावेळेस हा मुलगा गायीचे दोन्ही शिंगे धरून तिची मान दाबतो त्यावेळेस मात्र ती गाय त्याला तिच्या शिंगांच्या साहाय्याने उचलून फेकून देते आणि तो मुलगा बाजूला जाऊन पडतो.
गाईने तिला त्रास देणाऱ्या मुला सोबत जे काही केले आहे ते बघून हा सोशल मीडियावर हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला असल्याचे चित्र दिसून येत आहे. बर्याच युजर्सने या व्हिडिओवर आपले अभिप्राय देखील व्यक्त केले आहेत. एका युजरने असे लिहिले आहे की हे दृश्य बघण्यासाठी खूपच रंजक आहे आणि त्या गायीने जे केले ते योग्यच आहे. तर दुसऱ्या एका युजरने या व्हिडिओ वर स्वतःचे मत व्यक्त करत लिहिले आहे की प्राण्यांना असा वागणाऱ्या लोकांना चांगलीच शिक्षा झाली पाहिजे. या व्यतिरिक्त बर्याच युजर्सनी या व्हिडिओवर अनेक वेगवेगळ्या प्रकारे त्यांचे मत नोंदवले आहे.
बघा व्हिडीओ :