वन्यप्राण्यांचे व्हिडिओ अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होतात. यातील काही व्हिडिओंमध्ये प्राण्यांमधील चित्तथरारक मारामारी पाहायला मिळते, तर काही व्हिडिओंमध्ये छोटे प्राणीही हिंस्र प्राण्यांना धूळ चारताना दिसतात. वन्य प्राण्यांमधील जबरदस्त झुंज पाहण्यासाठी प्रत्येकाला उत्सुकता असते. त्यात काही वन्यप्राणी फॉटॉग्राफर नेहमीच असे काही क्षण टिपण्यासाठी तत्पर असतात जे आपल्या सगळ्यांना आश्चर्यचकित करतात. सोशल मीडिया हे असं एक माध्यम आहे जेथे सगळे लोकं आपले आगळे वेगळे व्हिडीओ तेथे अपलोड करत असतात. ज्यामुळे त्यांना प्रसिद्धी ही मिळते आणि त्यांचे फॉलोअर्स देखील वाढतात.
सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे जो पाहून तुम्ही हसून हसून लोटपोट व्हाल. कधी प्राण्यांनी उपद्रव दिल्याचे व्हिडिओ व्हायरल होतात, तर कधी त्यांनी दाखवलेल्या समजूतदारपणाचे. सध्या सोशल मीडियावर एका गरीब प्राण्याचा भारी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ एका गायीच्या आहे आणि तिच्या समजूतदारपणाचा आणि स्मार्टनेसची चर्चा सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या गायीचे भरपूर कौतुक होत आहे. पण ते का? हेही जाणून घेणे महत्वाचे आहे.
तुमच्या लहानपणी तुम्ही सर्कस पहिलीच असेल. सर्कशीत वाघ, सिंह, हत्ती अशा अनेक प्राण्यांना खेळवले जाते. त्यांच्याकडून वेगवेगळ्या करामती करून घेतल्या जातात आणि सर्वात महत्वाचे म्हणजे लोकांचे मनोरंजन केले जाते. या प्राण्यांच्या करामती म्हणजे फुटबॉल खेळणे, विविध प्रकारच्या उद्या मारणे, बॅटबॉल खेळणे, अशा असतात. मात्र हे प्राणी पाळीव असतात आणि त्यांना या सगळ्या गोष्टींचे योग्य प्रशिक्षण दिलेले असते. मात्र तुम्ही कधी आपल्या शेतातील बैल, गाय, म्हैस यांना कधी तुम्ही काही खेळताना बघितलं आहे का? … नाही ना…
पण आम्ही बघितलं आहे. आणि तुम्हालाही दाखवणार आहोत. सध्या सोशल मीडियावर एक गाईचा व्हिडीओ खूप व्हायरल होतोय. नेहमी शांत असणारी गाय जेव्हा रागात येते आणि थेट मैदानात उतरते, तेव्हा नेमके काय घडते आणि लोकांचे कसे मनोरंजन होते, हे या व्हिडीओत दिसत आहे.
रागात असलेली आणि फुटबॉल आवडणारी एक गाय चक्क मैदानात येते आणि फुटबॉलवर ताबा मिळवते. चवताळलेली गाय बघून मुले आजूबाजूला पळतात. पण जेव्हा चक्क गाय फुटबॉल खेळू लागते, तेव्हा मात्र मुले आणि उपस्थित असणारी इतर मंडळी शॉक झाली. या व्हिडिओमध्ये सुरुवातीला मुलं फुटबॉल खेळताना दिसत आहेत. पण, काही वेळानंतर बॉल गायीच्या पायात जातो. काही वेळानंतर एक मुलगा गायीच्या पायातून बॉल काढून घेण्यात यशस्वी होतो. त्यानंतर मात्र, ती गाय फुटबॉलसाठी मैदानावर चकरा मारताना दिसत आहे. गायीच्या या कृत्यानं त्यावेळी मैदानावर उपस्थित प्रत्येकाला हासू आवरले नाही. तुम्ही हा व्हिडिओ पाहिला तर तुम्हीही पोट धरून हसू लागाल. हा व्हिडीओ तुमचं मनोरंजन करेलच याची खात्री आम्हाला आहे. म्हणूनच आता हा व्हायरल व्हिडीओ तुम्हीही बघा आणि मजा घ्या. काळजी घ्या तसेच आमचे लेख वाचून, व्हिडीओ पाहुन आनंदी राहा.
बघा व्हिडीओ :