भारतीय लोकांना जुगाड काय ते वेगळं सांगायला नको. तो पंकज त्रिपाठीचा फेमस डायलॉग माहितीयं ना. हम करते है प्रबंध. अगदी तसंचं ही माणसं फार जुगाडू असतात. काय करतील कसला कशाचा नेम नाही. अनेकदा असे जुगाड कामी येतात पण त्या जुगाडांना कधी तोड नसतोय. आता या भावाचं डोकं बघा ईंजिनिअरचं पण डोक चालणार नाही इतकं भारी काम या पोट्ट्यानं करुन दाखवलंयं. त्यातून या व्हीडिओ पाहिल्यावर काय स्टंटबाज ड्रायव्हर असलं त्याची कल्पनाही करवतं नाही.
चाक तुटल्या वर काय करायच सोप्पयं की नायं, गाडी लावायची गॅरेजला. एकदम सायडींगला लावून निवांत चहा पिऊन यायचं फार वेळ लागणारं आसलं तर जायचं, मस्त जेवण करुनच यायचं. अर्धा दिवस गेला आणि गाडीचं टायर बदलण्यात अर्धा पगारही गेला. पंक्चर असलं तर थोडक्यात वाचला तुम्ही. पण या भावड्याकडं दोन्हीही नाही. ना पंक्चर काढायला पैकं ना बदलायला टायर. जुगाड कोण करतं ज्याच्याकडं गरीबी असते. त्याला परिस्थितीत सावरायचं असतं ती व्यक्तीच अशा जुगाडांचा शोध लावते.
ते म्हणतात ना गरज ही शोधाची जननी आहे. ही गरज ओळखूनच भावानं हा शोध लावला असावा. टायर गेलं तर अशावेळी काय करावं. टायरचं नाही म्हटल्यावर गाडी जागची हललं का पण नाही यानं तो मनावरच घेतलं आणि गाडी एकदम चढवली. सोट्यावर… सोटा म्हणजे लाकडाचा लांबलचक खांब. एकदम चौकोनी. मागचं चाक त्यावर रेडलं. पुढच्या चाकाच्या वर हा सोटा बांधला आणि गाडी मागून खेचू लागला. निघाला थेट हायवेलाच… कॉन्फिडन्स बघा किती तो भावाला. ट्राफिक हवालदारानं पकडल्यावर त्यालाही कांदे लावावे लागतील असली गत त्याचीबी होईल. याला कुठल्या कलमाखाली फाईन मारायचा हे शोधून पुन्हा उठल्यावर पण चक्कर येऊन पडेल तो. असलं जुगाड त्या ट्राफिक हवालदारानं आयुष्यभर पाहिलं नसेल. मात्र, काहीही होऊदे मानलं पाहिजे या पोट्ट्याला एवढा भला मोठा ट्रक टो करुन न्यायलाही हजार दोन हजारावर पाणी सोडायला लागेल.
त्यावर पण अचानक आलेला खर्च. टायर तो बसवण्याचा खर्च आलाच. त्यापकी टोईंगचे पैसे वाचावेत म्हणून तरी किमान भावानं हा जुगाड केला. पण त्यात थोडासा वांदा झाला, कुणी आपल्यासारख्याच अतरंगी माणसानं त्याचा व्हीडिओ केला आणि भावाला व्हायरल करुन टाकला. या प्रकारात आता भावाचं काय चुकलं म्हणा पण ज्यांच्या ज्यांचा टेम्पो असा अडकलं ते हा व्हीडिओ बघून जुगाडाला लागतील. भावान दाखवून दिलंय, यालाच म्हणतात इंडियन जुगाड… तुम्ही जुगाड कराच पण ज्यात रिस्क आपल्या आपल्या लोकांनी घ्यायची असते. अशावेळी काय आगळं वेगळं घडलं तर त्याला मंडळ जबाबदार राहणार नाही. कळलं का. आणि आपल्या भावाचा हा जुगाड कसा वाटला ते आम्हालाही कळवा.
बघा व्हिडीओ :