Breaking News
Home / जरा हटके / गाडीच्या बोनेटवर बसून फोटोशूट करत घाटातून वरात आणण्याची नवरीची हौस पडली महागात, बघा पुढे काय घडलं ते

गाडीच्या बोनेटवर बसून फोटोशूट करत घाटातून वरात आणण्याची नवरीची हौस पडली महागात, बघा पुढे काय घडलं ते

लग्न हा एक असा सोहळा असतो ज्यात सगळ्यांना मिरवण्याची आपली हौस मौज भागवून घेता येते. यात मग अगदी नवरा नवरी पासून सगळेच जण उत्साहाने सहभागी होतात. अर्थात प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. काही जण आपल्याच लग्नात अगदी मस्त नटून थटून येत डान्स करतात तर काहींची एन्ट्री एकदम वेगळीच असते. अगदी लाजवाब. तर काहींचा रुबाब हा त्यांच्या वरातीतून दिसून येतो. व्यक्ती तितक्या प्रकृती हे वाक्य याबाबतीत लागू पडतं. पण काही वेळेस ही कलात्मक विचारसरणी अंगाशी येऊ शकते. आता एका नववधूच्या बाबतीत घडलेला हा प्रकार बघा. या ताईचं लग्न झालं पुण्याजवळ सासवड येथे. तिथून वरात येत असताना कोणाच्या डोक्यात कल्पना आली काय माहिती पण या ताईला गाडीच्या बोनेट वर बसवून काही काळ तशी वरात न्यावी किंवा फोटोसेशन करावं असं ठरलं असावं. परंतु असं करणं ह्या नाविवाहिताला महागाचं ठरलं.

नक्की काय घडलं याविषयी माहिती नाही. पण त्यांच्या डोक्यातील ही कल्पना सत्यात उतरवण्याची त्यांची जागा चुकली. ऐन घाट मार्गावर हा प्रयोग झाला. त्याचा व्हिडियोही बनला. मग काय एकदा असं काही जगावेगळं बघायला मिळालं की ते वायरल झाल्याशिवाय राहतं होय. तसंच झालं या व्हिडियो च्या बाबतीत. पण सदर प्रकाराची दखल घेत पोलिसांनी कार्यवाही केल्याचे कळते. कारण घाट मार्गावर जिथे वाहतूक वेगाने आणि धोकादायक वळणांवर होत असते तिथे असं काही करणं म्हणजे सगळ्यांच्या जीवाला धोकाच म्हणायचा. हेतू छान असेलही पण जागा मात्र योग्य नव्हती. असो. यातून ताईने आणि कुटुंबीयांनी पुन्हा असं करणार नाही हे ठरवलं असणार हे नक्की. कारण एखाद्या मंगलप्रसंगाच्या आठवणीत अशा आठवणींची सरमिसळ झालेली कोणाला आवडेल बरं. असो. झालं ते झालं. या निमित्ताने या ताईला आणि तिच्या यजमानांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.

तसेच एक बाब नमूद करावीशी वाटते की वर उल्लेख झालेली माहिती ही विविध स्रोतांतून घेतलेली आहे. त्यामुळे सदर घडलेली घटना आणि महिती यांच्यात तफावत असू शकते. तेव्हा सुज्ञ वाचकांनी याची नोंद घेतली असेल असा विश्वास वाटतो. त्याचप्रमाणे वाचकांनीही ह्या गोष्टीची दखल घेऊन आपल्या जीवाची तसेच इतरांच्या जीवाची काळजी घ्यावी. तसेच यानिमित्ताने आपल्या समस्त वाचकवर्गाचे धन्यवाद. आपण आपल्या टीमचे लेख नियमितपणे वाचता आणि शेअर करत असता. त्यातून आम्हाला नवनवीन विषयांवर लेखन करण्याची उर्मी मिळते. हीच ऊर्जा आपल्या मनोरंजनासाठी विविध लेख घेऊन येत असते. तेव्हा आपला हा पाठिंबा आमच्या टीमच्या पाठीशी सदैव असू द्या. आपला आमच्या टीमवर असलेला लोभ कायम असेल अशी खात्री आहे.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *