आपल्या रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात जी व्यक्ती आपल्या सोबत सतत पळत असते, आपल्याला काय हवंय काय नकोय हे आपल्या आधी ती समजते, आणि ती वस्तू आपल्या हातात हजर करते. आणि तेही अगदी नकळत . पण आपल्याला तिची आठवण येते ती म्हणजे शाळेत असताना निबंध लिहीण्यासाठी आणि मोठं झाल्यावर मातृदिनाच्या दिवशी व्हाट्सअप वर डीपी आणि स्टेटस ठेवायला. हो ना? होतं ना तुमच्या सोबत हे असं. पण हे सगळं समजून घेऊन ती बिचारी सतत आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी असते. आणि हे फक्त माणसांमध्ये नाही बरं का तर कोणत्याही रूपात आईची माया ती आईची मायाच!
आता हाच व्हिडिओ बघा ना, व्हिडिओ सुरू होतो तेव्हा रस्त्यावर अगदी मध्यभागी एक पांढऱ्या रंगाची फोर विलर थांबलेली दिसते. पाहिल्यावर वाटतं कोणता असा ड्राइव्हर आहे. पण मग हळूहळू गाडी भोवती गर्दी जमा होऊ लागते. तसंही आपल्याकडच्या लोकांना नाही तिथं डोकं लावायची आणि काहीही माहीत नसताना गर्दीत सामील होण्याची हाऊसच असते.
असो, आता पुढे काय झालं ते बघू तर.. ती गर्दी बघून वाटलं कि ती गाडी बंद पडली असेल म्हणून हे लोक आपली शक्ती दाखवायला आले असतील. पण मग काय, मागून एक गाय अशी काय धावत आली की तिने काही सेकंदातच सगळी गर्दी बाजूला केली. काही केल्या ती गाय काही तिथून हटत नव्हती. गाडीभोवती तिच्या चकरा चालू होत्या. पण नेमकं हिला त्या चार चाकीशी काय घेणं होतं? स्वतःची चार पाय आहेत ना! पण तरीही ती मागे हटत नव्हती. कसं बसं करून तिला बाजूला केले दोन लोकं गाडीतून बाहेर आली. आणि मग मात्र सगळ्या माणसांनी मिळून ती गाडी उचलली मग काय बघता त्या गाडीखाली त्या गाईचं बिचारं वासरू अडकलं होतं. म्हणून तर तिचा जीव इतका कासावीस होत होता. शेवटी वासराला कुरवाळल्या नंतरच तिचा जीव भांड्यात पडला असेल.
बघा व्हिडीओ :