Breaking News
Home / माहिती / गाडी पार्क करताना स्टँडच्या बाजूला पाय ठेवायला जागा आहे कि नाही ह्याची काळजी घ्या, बघा काय घडलं ह्या तरुणासोबत

गाडी पार्क करताना स्टँडच्या बाजूला पाय ठेवायला जागा आहे कि नाही ह्याची काळजी घ्या, बघा काय घडलं ह्या तरुणासोबत

बाईकवर स्टंट करणे हे काही खायचे काम नसते भाऊ… हात सोडून 10 सेकंद गाडी चालवत शायनिंग मारणे, म्हणजे स्टंट करणे नाही. व्यवस्थित प्रशिक्षण घेऊन, स्टंटसाठी अपेक्षित असणारी महागडी स्पोर्ट बाईक, सोबत हेल्मेट आणि इतर सुरक्षेसाठीचे साहित्य घेऊन स्टंट केला जातो. मात्र भारतात सगळं याच्याविरुद्ध असतं. सेफ्टी नाही, काळजी नाही, प्रशिक्षण नाही आणि तरीही स्टंट केले जातात. मग याचा परिणाम कधी कधी इतका वाईट असतो की, एखाद्याला जीवही गमवावा लागतो. हे सगळं कशामुळे होतं तर शायनिंग मारायच्या नादात… शायनिंग मारायच्या नादात अनेकांनी स्वतःला कायमचं अधू करून घेतलेलं आहे. पण दरवेळी स्टंट करणाऱ्या नाहीतर किरकोळ चुकीमुळे सुद्धा अपघात झाल्याचे समोर आले आहे. अनेकदा बाईकचे स्टँड वर करायला विसरल्याने लोक गाडीवरून पडतात, कधी कधी आयुष्यभर अधू होऊन एकाच जागेवर बसावं लागतं, अशीही परिस्थिती येते.

त्यामुळे अगदी गाडी स्टँडवर लावताना आणि गाडी चालू करताना स्टँड वर घेणं, गरजेचं आहे… अन्यथा अपघात अटळ आहे. खरं पाहिलं तर ही खूपच छोटी गोष्ट आहे पण विषय जीवाचा आहे भावांनो… तरुणांमध्ये बाइक आणि चारचाकी गाड्यांची क्रेझ आहे. मात्र असलं तरी काही तरुण धोकादायक स्टंट करताना दिसतात. यामुळे त्यांच्यासह इतरांचा जीवही ते धोक्यात टाकत असतात. एवढंच नाही तर नॉर्मल गाडी चालवतानाही एखादी छोटीशी चूक जीवावर बेतू शकते. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक तरुण बाईकवर बसून आलेला दिसतो. पुढं मात्र जे काही घडलं ते पाहून सगळेच शॉक झाले. हा व्हिडीओ पाहूं एवढंच सिद्ध होतं की, गाडी चालवण्यापासून थांबेपर्यंत तुम्ही चौकस राहिलं पाहिजे. खरं तर जेव्हा आपण गाडी चालवत असतो, तेव्हा अनेकदा रोडवर पाट्या पाहतो. जसे की, नजर हटी, दुर्घटना घटी… जास्त गती, जीवाची भीती… गाडी हळू चालवा, घरी आपली कुणीतरी वाट बघत आहे. अशा अनेक पाट्या आपल्या पाहण्यात येतात. पण या गोष्टी कायम पाहण्यात आल्याने आपलं या गोष्टींविषयीचं गांभीर्य कमी झालेलं असतं.

परिणामी आपण या सगळ्या सूचना कानामागे टाकत आपल्या मनमानी पध्दतीने गाडी चालवत असतो. परिणामी अपघात होतात आणि आपल्याला अनेकदा आशा अपघाताचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले दिसून येतात. आजच्या या व्हायरल व्हिडीओत दिसून येते की, एक माणूस गाडी घेऊन येतो. सदर गाडी ही रॉयल इंफिल्ड कंपनीची बुलेट 350 सीसी आहे. ही गाडी प्रचंड जड असून वजनदार आहे. किरकोळ देहयष्टीचा माणूस ही गाडी चालवू शकत नाही. अशी ही गाडी घेऊन एक माणूस आला. जिथे गाड्या लावल्या जात होत्या, तो साधारण ओट्यासारखा भाग होता, जो जमिनीपासून 3 फूट उंच होता. हा व्यक्ती तिथे आला आणि गाडी लावण्यासाठी स्टँड खाली करता करता थेट ओट्यावरून खाली कोसळला.

एवढंच नाही तर स्टँड व्यवस्थित न लागल्याने गाडी पण याची अंगावर पडली. क्षणात मोठा अपघात झाला. काही कळते न कळते तोच एवढी मोठी घटना घडली. त्यामुळे हा व्हिडीओ बघा आणि कायम सावधानता बाळगा.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *