Breaking News
Home / मनोरंजन / गाणं गाता गाता जुनं प्रेम आठवलं आणि अचानक तात्या भडकले, व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही

गाणं गाता गाता जुनं प्रेम आठवलं आणि अचानक तात्या भडकले, व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही

शहर तर आधीपासूनच बदलांचा भाग होती मात्र आता गावाकडेही बदलाचे वारे घोंगवू लागले आहे. गावाकडची साधी भोळी असणारी माणसं आता अँड्रॉइडची फॅन होऊ लागली आहे. गावाकडे बैलाऐवजी आता ट्रॅकटर चा वापर होऊ लागला आहे. जात्याऐवजी पिठाच्या गिरणी घरोघरी झाल्यात. घरोघरी दुचाकी आहे. गावाकडेही इंग्रजी शाळा होऊ लागल्या आहेत. मात्र अशातही काही गोष्टी मात्र कॉमन आहेत, ज्या कधीच बदलत नाहीत. ते म्हणजे भावना… कुठल्याही वयात प्रेमाची भावना कधीच बदलत नाही. माणूस प्रगती करतो, नवनवीन बदलांना आत्मसात करतो, कुटुंबही वाढवितो मात्र प्रेम आणि प्रेमात मिळालेला धोका काही माणूस विसरत नाही. आणि मग त्याकाळात एकमेकांना पाठवलेल्या चिठ्ठी… बोले तो प्रेमपत्र… इंग्रजीत लव्ह लेटर… एकमेकांना डेडिकेट केलेली गाणी आणि मग तिच्या लग्नात वाढलेली बुंदी, लापशी, भात आणि आमटी…

एक गोष्ट तर सगळीकडे कॉमन आहे. जेव्हा जेव्हा तुमचा प्रेमभंग झालेला असतो. तेव्हा त्या काळात आलेली सगळी दर्दभारी गाणी तुम्हाला पाठ असतात. एवढंच नाहीतर या गाण्याचे अर्थ सुद्धा तुम्हाला खोलवर कळत असतात. शेवटी प्रेम हे प्रेम असतं. प्रेमात आ-त्मह-त्या करण्याचं फॅड फक्त चित्रपटांनी पुढे आणले आणि त्याला जबाबदारही सिनेमाच आहे. कारण 1980 च्या आधीही प्रेम व्हायचं, लफडी व्हायची… घरी कळलं तर हाणामारी व्हायची पण सगळे राडे होऊनही कुणी आ-त्मह-त्या केल्याचं ऐकिवात नाही. तेव्हाचे लोक तर प्रेमात दणकून आपटले तरीही त्याचा आनंद घ्यायचे. काही काळ रुसण्यात त्यांचाही जायचा पण उभं आयुष्य पुढ्यात असल्याने… सुखाचा जीव दुःखात घालण्यास कोणीही धजावत नाही. आता तुम्ही आजवर अनेक अतरंगी म्हातारे बघितले असतील, जे सगळ्या विषयांवर बोलतात. मनमोकळं रान हानतात, गाणी गातात… आणि त्यांचे जुने तसले अनुभवही सांगतात. प्रेम, दर्द सगळं काही त्यांनीही अनुभवलेलं असतं.

अशाच एका एकदम जबराट म्हाताऱ्याचा व्हिडीओ आमच्यासमोर आलेला आहे. या म्हाताऱ्याने एकदम भन्नाट गाणं म्हणलं आहे. हे गाणं पाहून असं वाटतं की, या म्हाताऱ्याने आयुष्यात प्रेमाचा खूप मोठा दर्द अनुभवला आहे. एवढंच नाही तर या आजोबांनी गाणं म्हणताना अशा काही हरकती घेतल्या आहेत, ज्या मूळ गाण्यात पण नाहीत. हे गाणं ऐकून प्रेयसीची आठवण येण्यापेक्षा या म्हातारबाबाचं हसूच जास्त येतं. या अतरंगी म्हातारबाबांनी आपल्या हटके स्टाईलमध्ये म्हटलेलं हे गाणं लोकांना खूप आवडलेलं आहे. लोकांनी यावर अनेक भरभरून प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. आता हे गाणं ऐकून एखादा सगळं काही सोडलेला प्रियकर सुद्धा हसून पुन्हा शहाणा होईल आणि आपली गाडी रुळावर आणेल. या म्हातारबाबांच्या गाण्यातुन आणि वागण्यातुन आपण एकच बोध घ्यायचा. “वेळ कितीही बिकट येऊ द्या, आत्मविश्वासाने पुढे चला”. तर आता म्हातारबाबांनी एकदम जोशमध्ये गायलेलं हे गाणं बघा, मजा घ्या आणि काळजीही घ्या.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *