Breaking News
Home / मनोरंजन / गाय आणि वासरूंनी पाणीपुरवल्याकडून खाल्ली पाणीपुरी, बघा हा वायरल व्हिडीओ

गाय आणि वासरूंनी पाणीपुरवल्याकडून खाल्ली पाणीपुरी, बघा हा वायरल व्हिडीओ

वायरल व्हिडियोज म्हंटलं म्हणजे काही तरी अनोखं, वेगळं पाहायला मिळणार हे नक्कीच असतं. पण काही वेळेस आपण विचार करणार नाही अशा गोष्टी ही बघायला मिळतात. त्या बघून काहीसा अचंबा वाटतो. असाच एक व्हिडियो आपल्या टीमने आज पाहिला. हा व्हिडियो आहे काही वर्षांपूर्वीचा. पण आजही त्यातील रेकॉर्डिंग अजूनही काही क्षण का होईना अचंबा निर्माण करते आणि समाधान सुदधा.

हा व्हिडियो आहे लखनऊ शहरातील. तेथील एका प्रसिद्ध ठिकाणी एक पाणीपुरी वाले दादा चाटचा ठेला लावत असत. कदाचित आजही ते तो व्यवसाय करत असतील. पण ही काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे म्हणा त्यामुळे काही कल्पना नाही. असो. तर या व्यवसायादरम्यान एके दिवशी त्यांना दोन पाहुण्यांनी भेट दिली. येथे या पाहुण्यांचा उत्तम पाहुणचार केला गेला. पुढे हा पाहुणचार रोज होत असे की नाही त्याची कल्पना नाही. पण एके दिवशी चा पाहुणचाराचा व्हिडियो मात्र वायरल झाला होता. यात त्यांच्या चाट ठेल्याला भेट देणारे पाहुणे होते एक गाय आणि तिचं वासरू.

व्हिडियो सुरू होतो तेव्हा हे दोन्ही मायाळू जीव दादांच्या चाटच्या ठेल्याजवळ उभे राहिलेले दिसून येतात. जवळच एक दादा उभे राहून पाणी पुरी तयार करून देत असतात. तर दुसरे दादा आपल्या हातांनी पाणी पुरी या दोघांना भरवत असतात. पहिली पुरी गायीला. मग दुसरी तिच्या वासराला. मग पुन्हा गायीला आणि मग वासराला. हा त्यांचा सिलसिला चालूच असतो. अर्थात पाणी पुरी खाण्याचा या दोघांचा वेग सामान्य माणसापेक्षा जास्तच. ती पाणी पुरी त्यांच्या पोटाला कितपत पुरी पडत असेल देव जाणे. पण निदान त्या क्षणी तरी त्यांची क्षुधा शांती होत असणार हे नक्की. एक वेळ अशी येते की दादा गायीला थोडं पाठी करतात. पण हकलवून देत नाहीत. त्या दोघांना पाणी पुरी भरवणं चालूच राहतं आणि आपल्या नकळत हा व्हिडियो संपतो. खरं तर केवळ ४० सेकंदाचा हा व्हिडियो आहे. पण अजून थोडा काळ हा व्हिडियो चालला असता तरी चाललं असतं असं नकळतपणे वाटून जातं. कारण सांगता येत नाही, पण या मुक्या जनावरांची ही जी क्षुधा शांती होत असते ते बघून बरं वाटतं.

मनोमन आपण त्या दादांना धन्यवाद म्हणत असतो ज्यांनी त्यांची भूक शमावली. तसंही भूतदया ही प्रत्येक माणसात असावी हे आपल्याला लहानपणापासून शिकवलं जातच. आपण अशी काही निवडक उदाहरणं आपल्या आजूबाजूला पाहत ही असतो. त्यातलं एक प्रातिनिधिक उदाहरण म्हणजे हा व्हिडियो.

भूतदया आणि भुकेल्या जीवाला अन्नदान या दोन गोष्टींमुळे आपल्या टीमला तर हा व्हिडियो आवडला. आपणही हा व्हिडियो पाहिला असल्यास आपल्याला ही आवडला असणार यात शंका नाही. आपल्या प्रतिक्रिया आपण आम्हाला आपल्या कमेंट्स मधून कळवायला विसरू नका. तसेच आपण ज्या मोठ्या प्रमाणावर आपले लेख शेअर करत असता, त्याबद्दल धन्यवाद. हा लेखही यास अपवाद असणार नाही हे नक्की. येत्या काळातही आपण आपल्या टीमवरचा हा लोभ कायम ठेवावा ही विनंती. आपल्या पाठिंब्यासाठी पुन्हा एकदा मनःपूर्वक धन्यवाद !!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *