Breaking News
Home / मनोरंजन / गावाकडच्या पोरांचा नादखुळा, लाकडाचे बांबू आणि सिमेंटच्या गोण्या जमा करून काय आयडिया केली बघा

गावाकडच्या पोरांचा नादखुळा, लाकडाचे बांबू आणि सिमेंटच्या गोण्या जमा करून काय आयडिया केली बघा

गावाकडची लोकं अतरंगी असतात, हे आपल्याला माहिती आहे. सोशल मीडिया आल्यापासून तर व्हिडिओच्या माध्यमातून गावकरी मंडळी जास्त ऍक्टिव्ह झालेली आहेत. को’रोना काळात तर गावकरी मंडळीचे व्हिडीओ भयंकर व्हायरल झाले. गावाकडच्या लोकांचे अजून एक भारी वैशिष्ट्य म्हणजे त्यांना असलेला नाद.. नाद म्हणजे तो कशाचाही असो… बैलगाडाच्या नाद असो वा कुस्तीचा… एकदा एखाद्या गोष्टीचा नाद घेतला की तो पुरा केल्याशिवाय राहणार नाही, अशी गावाकडची लोकं असतात. गावाकडं कुणाची कितीही भांडण असू द्या, भावकीचे वाद असू द्या… पण वर्षातून एक असा दिवस असतो ज्या दिवशी सगळे गावकरी एकत्र येतात. तो दिवस म्हणजे जत्रेचा… जत्रा हा गावोगावचा मोठा आनंदाचा ठेवा. वर्षानुवर्ष ग्रामदेवतेच्या जत्रेला गर्दी करणारे, मनोरंजन करणारे आणि जत्रेच्या ओढीनं शहरातून गावाकडे धावणारे गावकरी आहेत. अर्थात, कालपर्यंत हा भाग ग्रामीण भागाशीच संबंधित होता.

शहरी मंडळी या जत्रेकडे फारशी फिरकायची नाही. जे जायचे, ते मूळ गावातलेच असायचे. शहरात कसं असतं? लहान मुलांची खेळणी असो वा खायचे साहित्य… अथवा पाळणे, राहडगाडगे… हे सगळं शहरात 365 दिवस अनुभवायला मिळतं. खेड्यात मात्र वर्षातून एकदाच या सगळ्या गोष्टी अनुभवायला मिळतात. म्हणूनच या दिवसाचे आकर्षक लहान मुले, महिला आणि आपल्या घरी माहेरी आलेल्या मुलींना असते. मात्र कधी जत्रा 1 दिवसाची असते तर कधी 2 दिवसाची… त्यामुळे 1-2 दिवसात मिळणारा हा भला मोठा आनंद वर्षभर पुरून पुरून वापरता यायचा.

जत्रेचं वातावरण रंगीबेरंगी असतं. ग्रामदैवतानं मंदिर रंगवलं जातं. मंदिराच्या अंगणात पारंपरिक सनई-चौघडा असतो. भोवतालच्या परिसरात मांडव घातले जातात. खाद्य पदार्थ, तर काही ठिकाणी खेळणी, बांगड्या, दागिने, कपडे असे विविध स्टॉल सजायला लागतात. ग्रामदैवताच्या पालखी मिरवणुकीसाठी मार्गही रंगीबेरंगी पताकांनी सजविला जातो. उसाच्या गुऱ्हाळातील घुंगरांचा ठेका कानावर पडतो. गावातील मोठ्या मैदानावर चित्तथरारक बैलगाडा शर्यतीचं नियोजन सुरू होतं. दुसऱ्या बाजूला रात्रीच्या मनोरंजनासाठी लोकनाट्य तमाशांच्या राहुट्याही सज्ज होत असतात.

या सगळ्यात महत्वाचा असतो तो पाळणा… जो सगळ्याना आवडत असतो. मात्र आता लहान मुलांना आवडणारा पाळना 365 दिवस गावात थांबवणे, शक्य नाही. मग याला उपाय काय? पण आताची पिढी भलतीच हौशी… अहो आमच्या गावातल्या या पिढीकडे पैसे नसले तरी डोकं आहे आणि या डोकेलिटीच्या जोरावर आम्ही काहीही करण्याची हिम्मत ठेवतो. आता गावाकडच्या तरुणांनी एकत्र येऊन लहान पोरासाठी पाळणा उभा केला तोही चक्क लाकडाचा आणि विना खर्च… आणि लहान मुलांच्या आयुष्यात 365 दिवस आनंद कसा आणला, हे जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडीओ नक्कीच बघा. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला नक्कीच कौतुक वाटेल.

हा व्हिडीओ तुमचं मनोरंजन करेलच याची खात्री आम्हाला आहे. म्हणूनच आता हा व्हायरल व्हिडीओ तुम्हीही बघा आणि मजा घ्या. काळजी घ्या तसेच आमचे लेख वाचून, व्हिडीओ पाहुन आनंदी राहा.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *