Breaking News
Home / जरा हटके / गावाकडच्या मुलांचे हे टॅलेंट पाहून तुम्हीदेखील थक्क व्हाल, बघा हा व्हिडीओ

गावाकडच्या मुलांचे हे टॅलेंट पाहून तुम्हीदेखील थक्क व्हाल, बघा हा व्हिडीओ

लहान मुलं म्हणजे देवाघरची फुलं असतात असं म्हणतात. खासकरून अतिशय शांत स्वभावाच्या मुलांसाठी. पण काही मुलं मात्र लहान वयापासून चळवळी आणि धडपडी असतात. त्यांच्या या स्वभावामुळे त्यांच्या आयांना नेहमीच एकप्रकारची चिंता लागून राहिलेली असते. पण ही मुलंही बिलंदर असतात. आई वडिलांना दिसणार नाही, अशा पद्ध्तीने त्यांची त्यांची मस्ती चालतेच. अर्थात ही मस्ती त्यांना किंवा इतरांना त्रा’सदायक ठरत नाही तोपर्यंत तिचं नक्कीच कौतुक वाटतं. पण या मस्ती मस्तीत अनेक वेळेस मुलं सिनेमा, मालिका यांत पाहिलेल्या गोष्टी करून बघायला धजावतात. हेच दाखवणारा व्हिडियो आमच्या टीमच्या हाती लागला आणि त्याविषयी लिहायचं ठरलं. व्हिडियो सुरू होतो तेव्हा कॅमेरा लेन्स मधून आपल्याला दुरचं चित्र दिसत असतं. कॅमेरामन झूम करतो तेव्हा काही लहान मुलं गावाकडच्या एका भागात खेळताना दिसत असतात.

पण त्यांचा खेळ बघून क्षणभर आपला विश्वास बसत नाही. हे पठ्ठे स्टं’टबाजीतले बॅक फ्लिप सारखे कारनामे करताना आपल्याला दिसतात. हे कारनामे ते एका मातीच्या खळग्यात करताना दिसतात. यासाठी ते धावत येत, या खळग्यांचा वापर करत बॅक फ्लिप करत असतात. कोणत्याही संरक्षण साधनांचा वापर न करता ही मुलं हे कारनामे करताना दिसतात. तसेच बरेच वेळेस ही मुलं धडपडतात सुद्धा, पडतात. लागतही असेल पण दुखापत होत नाही. पण एकूणच त्यांच्या या करामतींमुळे त्यांची काळजी वाटतेच. पण तेवढंच त्यांचं कौतुकही वाटतं. लहान वयात फारसा विचार न करता धाडस करण्याची जी वृत्ती असते ती यात दिसून येते. या मुलांमधील हिरवी हाफ पॅन्ट घातलेला मुलगा विशेष लक्ष वेधून घेतो. कोणत्यातरी कुं’ग फु चित्रपटांतून त्याने प्रेरणा घेतलेली दिसत असते. त्यामुळे करामती करण्यापूर्वी तो विशेष स्टान्स घेतो आणि खाली उडी मारल्यावरही एकदम स्टाईल मध्ये ऍ’क्शन करतो. या व्हिडियोतील त्याची शोमनशिप लक्षात राहते.

मिनिटं दीड मिनिट आपल्याला त्यांचे हे कारनामे बघण्याची संधी मिळते. अर्थात असे हे स्टं’टस किंवा कारनामे करताना संरक्षक साधनांचा वापर अनिवार्य ठरतो. त्यामुळे मराठी गप्पाची टीम कुठच्याही प्रकारे या मुलांच्या संरक्षण साधनांशिवाय झालेल्या कारनाम्यांना पाठिंबा देत नाही. तसेच इतर कोणीही असे काही स्टं’टस करावेत असं प्रोत्साहन देत नाही. पण त्याचसोबत या चळवळ्या मुलांमध्ये असलेली ऊर्जा अभ्यासा सोबतच खेळ आणि कार्यानुभव यांतून सतत व्यवस्थितपणे कार्यान्वित व्हावी, असंही मनापासून वाटतं. तसं कदाचित होतंही असेल. असो.

आपल्याला याविषयी काय वाटतं हे आम्हाला क’मेंट्स मधून नक्की कळवा. तसेच हा लेख आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका. आणि हो मंडळी आमची टीम नवनवीन लेख अगदी रोज प्रसिद्ध करत असते. त्या लेखांचाही आनंद घेत राहा आणि हे लेख शेअर करत तो आनंद वाटत राहा. आपल्या वेळेसाठी धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.