Breaking News
Home / मनोरंजन / गावाकडच्या ह्या लहान मुलाने केलेला भन्नाट डान्स पाहून भल्या भल्या कोरिओग्राफर्सना सुद्धा चक्कर येईल, बघा व्हिडीओ

गावाकडच्या ह्या लहान मुलाने केलेला भन्नाट डान्स पाहून भल्या भल्या कोरिओग्राफर्सना सुद्धा चक्कर येईल, बघा व्हिडीओ

पोट्टी ही बालपणापासूनच हुश्शार असतात. कुणापुढं कसं वागायचं कुणाला काय बोलायचं काय बोलायंचं नाही या गोष्टी शिकवायला लागत नाही. आता या लहान पोरांचंच बघा ना. अगदी तालात ठेका धरलायं. कुणी शिकवलंयं का त्याला, कुणी सांगितलंयं. कुठल्या डान्स क्लासमध्ये घातलंयं. डान्स क्लासमधून कुणी आणलायं डान्स क्लासच्या कोरिओग्राफरला चक्कर येईल, असला डान्स या वयात या पोरानं करुन दाखवलायं. जमलं तुम्हाला असला भन्नाट हावभाव. डान्स करतानाच्या बारीक लकबी टीपून ठेवल्यात. डान्स करताना या व्हीडिओत तो वारंवार पहावासा वाटतो. अगदी पोट्ट पॅँट चिखलात लोळवून आणतंयं… तुम्ही काय विचार कराल. हो अगदी बरोबर आज धुलाई दो गोष्टींची होणार आहे. एकतर या चिखल्यात मळलेल्या पोट्ट्याची आणि मग वेळ राहिलाच तर पँटची. असला धुणार आहे त्याची आई त्याला विचारू नका.

एवढ्या बारीक गोष्टी लचकेबाज अंदाजात टिपणाऱ्या या छोटूला आईची धुलाई माहिती नसेल का पण जाऊद्यांना मार खायचा तेव्हा खाऊन घेऊ आधी मज्जा करू, बालपण रंगीत करू. धमाल करू, असं सगळं या पोट्ट्याचं होतं. या पोरानं ठरवून घेतलंयं आत्ताचा क्षण जगायचा. पुढे काय होईल ना त्याचा विचार आत्ता करून वर्तमान काळ अंधारात नाही घालवायाचा आपल्या बऱ्याच लोकांचा ना नेमका हाच प्रॉब्लेम असतो. त्यांना चिंता खाते ती भविष्याची आणि चिंता ही चितेसमान असते. चिंता नको चिंतन करा, असा सुविचारही आपण ऐकला असेल. चिंतनामुळे माणूस जगतो आणि चिंतेमुळे क्षणाक्षणाला म’रत म’रत जगत असतो. या मुलाला लहान वयात कळलं असावं की काय महत्वाचं आहे. जे आपल्याला इतक्या उशीराही कळलेलं नाही. संत तुकाराम महाराज म्हणतच लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. अशीच गत इथल्या प्रत्येकाची असते.

उद्याचा भविष्याचा आनंद शोधण्यामागे संकटंचं एवढी ओढावून घेत बसतो. की आजचं जगण्यासाठी वेळच उरत नाही. डान्स करता करता पोरानं केवढा निरागस जगण्याचा मंत्र दिला असेल. कोरोना काळ आहे बिनमास मोकाट फिरणाऱ्यांनो त्या पोराकडं पहा. एवढा दमेस्तोवर नाचला पण नाकाच्या खाली मास्क सरकू दिलेला नाही. डान्स करता करता मास्कही खाली पडू दिला नाही. अंगावरचे कपडे लोळले तरी चालतील पण आपल्यामुळे को’रोना किंवा तत्सम महामारीचा प्रसार कुणाला होऊ नये, याची काळजी एवढ्याशा जीवानं कशी घेतलीयं पहा. नाहीतर काही डोक्यानं जास्त असलेल्यांना मास्क का लावाला यासाठी पोलीसांशी हुज्जत घालावी लागते. डान्सबद्दल बोलायचं झालं तर शरीर इतकं लवचिक करुन घेतलं. की अजून हाडं विकसित व्हायची आहेत की काय,असा भास होईल. तुम्ही याच्या व्हीडिओला १० पैकी किती गुण द्याल ।

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.