Breaking News
Home / मनोरंजन / गावाकडच्या ह्या २ आजोबांनी केला अतरंगी नागीण डान्स, व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही

गावाकडच्या ह्या २ आजोबांनी केला अतरंगी नागीण डान्स, व्हिडीओ पाहून हसू आवरणार नाही

लग्न असो, गॅदरिंग असो, वरात असो वा जत्रा असो… सगळीकडे एक गाणं कायम लावलं जातं आणि त्या गाण्यावर नाचल्याशिवाय लोकांचं मनही भरत नाही. कार्यक्रम कोणताही असो… नागीण डान्स तर झालाच पाहिजे ना भावा… गावाकडची काही म्हातारी लै बिलिंदर असतेत. गावाकडच्या या इपितर म्हाताऱ्यांमध्ये एक रहेमानी किडा डसलेला असतो. त्यामुळे ही गावाकडची म्हातारी कायम सर्किटसारखं वागतेत. आता आमच्या हाती असा एक व्हिडिओ लागला, ज्यात गावाकडची दोन जख्खड म्हातारी नागीण डान्स करत आहेत. साप झालेला म्हातारा लोळून लोळून एवढा मळाला आहे की, घरी गेल्यावर त्याला सुनबाई हाताने कपडे धुवायला लावील. आणि जो गारुडी (सपेरा) झालेला आहे, तो म्हाताराही खूपच तन्मयतेने पुंगी वाजवतो आहे.

खरं पाहिलं तर गावाकडची म्हातारी कायम मंदिरातच दिसतात, ते कायम भगवंताच्या नाम संकीर्तनात दंग असतात, असा एक गैरसमज शहरवासीयांमध्ये विनाकारण पसरलेला आहे. ज्याला काहीही लॉजिक नाही. उलट गावाकडचे लोक लै बेरकी असतेत, हे मी ठामपणे सांगतो कारण मीही गावाकडचा आहे. गावाकडची बिलिंदर म्हातारी कधी कुणाला कसं येड्यात काढतील, ते समजायचं पण नाही. या गावाकडच्या लोकांचा नादच खुळा असतो भाऊ…

आता ही 2 म्हातारी एकदम अतरंगी डान्स करत आहेत. या नागीण डान्सला अभिनयाचाही तडका लावलेला आहे. या दोन्ही म्हाताऱ्यांच्या चेहऱ्यावरील एक्सप्रेशन्स बघून तर मिथुन चक्रवर्ती पण यांचं कौतुक करीन. या महाताऱ्यांचा अवखळ डान्स बघून सुरुवातीला तुम्हाला असं वाटू शकतं की, या दोघांनी थोडी थोडी घेतलेली आहे. पण व्हिडीओ जसजसा पुढे जातो, तेव्हा यांचा डान्स एकदम पिव्वर असल्याचे जाणवते. यांच्या या डान्सला कुठल्याही नशेची गरज नाही. कारण सर्वसाधारणपणे सगळीकडे जेव्हा जेव्हा नागीण डान्स केला जातो तेव्हा डान्स करणाऱ्यांनी थोडी का होईना, घेतली आहे, असा समज असतो. मात्र इथे तसला काहीही प्रकार नसून या म्हाताऱ्यांनी एकदम अस्सल गावठी नागीण डान्स केला आहे.

डान्स करताना त्यांनी कोणतीही कमी ठेवलेली नाही. लोळण्यापासून तर डसण्यापर्यंत सगळेच प्रकार केल्याने हा नागीण डान्स एकदम जबराट झाला आहे. आता तुम्हाला असाही प्रश्न पडला असेल की, असा नागीण डान्स करायला या गावठी म्हाताऱ्यांचे शरीर एवढं लवचिक कसे? गावाकडची ही म्हातारी रानात काम करतात, गुर हाकण्यापासून तर ओझी उचलण्यापर्यंत सगळी कामे करावी लागत असल्याने, त्यांचे अंग लवचिक राहते.

आता दुसरा प्रश्न तुम्हाला पडला असेल की, हे बरोबर गाण्याच्या बीटला धरून डान्स कसा करू शकतात? तर त्याच उत्तर असं आहे, गावाकडे पहाटे अनेक म्हातारी मंडळी मंदिरात ईश्वर नामात दंग असतात. तर ज्यांना सकाळी जमत नाही ते संध्याकाळी हरिपाठ करतात. एकूणच काय तर आपल्यापेक्षा जास्त वेळ ते संगीताच्या सानिध्यात असतात. गातात, नाचतात आणि रमतात. शेतातही दिवसभर पेरणी, कापणी आणि इतर कामे करताना शेतीची गाणी त्यांच्या मुखी चालूच असतात. त्यामुळे त्यांना बिट पकडणे, खूप सहज जमते. त्यामुळे या म्हाताऱ्यांचा नागीण डान्स एकदम जमून आला आहे. नागीण डान्स करताना एक गोष्ट फार महत्त्वाची आहे ती म्हणजे हा डान्स बिनलाज्यासारखा करावा लागतो तेव्हाच आपल्याला आणि बघ्यांना त्याची मजा घेता येते. या एकाच गोष्टीमुळे या म्हाताऱ्यांनी दमदार डान्स केला आहे.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *