Breaking News
Home / मनोरंजन / गावातल्या ह्या मुलाने केला जबरदस्त लावणी डान्स, कौशल्य पाहून तुम्हीही कौतुक कराल

गावातल्या ह्या मुलाने केला जबरदस्त लावणी डान्स, कौशल्य पाहून तुम्हीही कौतुक कराल

प्रत्येक कलाकार हा त्यांच्या कलेच्या प्रेमात असतो. त्या कलेतील बारकावे जाणून घेण्यात आणि त्यांना आपल्या कलाकृतींतून उतरवण्यात त्यांना वेगळाच आनंद मिळतो. पण जेव्हा ते हा आनंद मिळवू शकतात तेव्हा आपसूकच आपलं मनोरंजन होत असतं. असाच एक कलाकार सध्या सोशल मीडियावर अतिशय लोकप्रिय ठरला आहे. सोशल मीडियाचा आपल्या आयुष्यात वाढलेला सहभाग आणि त्या अनुषंगाने आपल्या समोर येणारे अनेक गुणी कलाकार यांची आपल्याला कल्पना आहेच. राज मिस्त्री हे त्यातलंच एक उदयोन्मुख नाव.

मूळचा कर्नाटकचा असणारा हा राज आता महाराष्ट्रात राहतो. किंबहुना तो या मातीशी एवढा एकरूप झाला आहे की विचारू नका. त्याची ही एकरूपता एवढी आहे की महाराष्ट्रातील एक लोकप्रिय लोककलाप्रकार असणाऱ्या लावणीचा तो पुरस्कर्ता आहे. बरं हे केवळ बोलणं म्हणून नव्हे तर त्याला या लोककलाप्रकाराबद्दल आस्था आहे म्हणून आहे.

तो स्वतः एक उत्तम लावणी नर्तक म्हणून उदयास आलेला आहे. खरं तर खूप आधीपासूनच त्याला नृत्याची आवड होती. त्यात लावणी ही आवडे. पण लावणी ही मुख्यतः स्त्रियांनी करायचा नृत्यप्रकार म्हणून त्याने त्यात भाग घेतला नाही. पण एके दिवशी एक लावणी ऐकली आणि मग मात्र त्याला राहवलं नाही. त्याने आपल्या या आवडत्या कलेचं सादरीकरण करणारे व्हिडियोज त्यावेळी अगदी जोमात असणाऱ्या टिकटॉक वर टाकले. म्हणता म्हणता त्याला लोकप्रियता मिळाली. पुढे टिकटॉक आपल्या आयुष्यातुन बाद झालं. पण अशावेळी राज इन्स्टाग्रामवर दिसू लागला. या संपूर्ण काळात त्याच्या आजूबाजूला असणारे, ओळखीचे आणि मुख्य म्हणजे कुटुंबातील व्यक्ती त्याचं कौतुक करू लागले. तो लावणी कोणाकडेही शिकलेला नाही. एकलव्याप्रमाणे त्याने या कलेची साधना करत करत स्वतःला घडवलेलं आहे. त्याच्यात होणारी प्रगती ही निश्चितच लक्षणीय आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांच्याच कौतुकास तो पात्र आहे. नुकताच त्याने बीबीसी मराठी या प्रथितयश चॅनल ला मुलाखतही दिली. त्यावेळी त्याने या कलेविषयी त्याला असणारं प्रेम व्यक्त केलं आहे.

त्याचं हे प्रेम त्याच्या प्रत्येक व्हिडियोतुन ही दिसून येतंच. तसेच त्याची उत्तरोत्तर होत जाणारी प्रगती कळून येते. राज याची या कलेप्रति असणारी तळमळ, या कलेवरच असलेलं प्रेम लक्षात आलं की कौतुकात भर पडते. तसेच राज प्रमाणेच इतरही काही जण असे आहेत जे लावणी हे नृत्य अगदी आवडीने करत असतात. त्यांचीही या निमित्ताने आठवण होते. गेल्या लॉक डाऊन पासून राज याने आपल्या नृत्याने सगळ्यांचं मनोरंजन केलेलं आहे. यापुढेही तो आपलं मनोरंजन करत राहिलंच. आपल्या टिमकडून राजला त्याच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा !! यानिमित्ताने त्याचा एक व्हिडियो आपल्या टीमच्या पाहण्यात आला होता तो येथे शेअर करत आहोत. या उदयोन्मुख कलाकाराविषयी लिहिलं आहेच आणि सोबत त्याच्या कलेविषयी झलक वाचकांना पाहता यावी म्हणून हा व्हिडिओ शेअर करत आहोत. आपण त्याचा आस्वाद घ्यावा. तसेच हा लेख कसा वाटला हे ही आम्हाला कमेंट्स मधून नक्की कळवा. आपलं प्रोत्साहन हीच आमच्यासाठी उत्साह देणारी गोष्ट आहे. तेव्हा आपला पाठिंबा आपल्या टीमच्या पाठीशी कायम राहू द्या. लोभ असावा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.