“हे भारतमाते सांग तुझ्यासाठी वीर किती हवे, तुझ्या कुशीतून निघतील थवेच्या थवे…!” असं उर भरुन येणारं वाक्य आपल्या देशाच्या सैनिकांचं देशाबद्दलचं प्रेम पाहिल्यावर आपसूक ओठी येत असतं. देशसेवेसाठी आपल्या प्राणांची बाजी लावणाऱ्यांना एक कडक सॅल्यूट. आता या आपल्या गावच्या सुपूत्राचं स्वागत करण्यासाठी सुरू असलेल्या धडाक्यावरुन तुमच्या लक्षात येईलचं. देशासाठी लढणाऱ्या आणि प्राणांची आहुती देण्यासाठी कायम सज्ज असणाऱ्या या सुपूत्राचं स्वागत असंचं धुमधडाक्यात व्हायला हवं. देशाच्या प्रत्येक सैनिकांच्या प्रति आपली अशीच श्रद्धा असायला हवी. त्यामुळे सैनिक ज्या ज्या वेळी आपल्या गावी येईल त्याला आपल्या देशरक्षणासाठी उर भरून आलं पाहिजे. केवळ गावानंच नव्हे तर प्रत्येकानं त्यांची खातरदारी अशी करावी की आपण ज्यांच्यासाठी सीमेवर लढायला जात आहोत, त्यांनी दिलेल्या प्रेमामुळं कधीही एकटं वाटायला नको. आता आमच्या गावातील या सुपुत्र अक्षय शेडगे यांच्याकडेच पहा ना. नुकतेच आर्मीचे एक वर्षाचे ट्रेनिंग पूर्ण करुन आले. त्यांच्या स्वागताची पूर्ण तयारी गावातल्या मंडळी्ंनी केली होती.
जशी नवी नवरी नव्या घरात पाऊल टाकल्यावर संपूर्ण घर सजवलेलं असतं तसं गाव अगदी सजवण्यात आलंयं. पण आपला वर्दीतला फौजी हा तितकाच दर्दी निघाला. सारा मान सन्मान बाजूला ठेवून त्यानं काय केलं हे तुम्ही एकदा पहाच त्यांच्या या साधेपणाची चर्चा अगदी गावागावात काय पंचक्रोशीत झाली. त्यानं नेमकं काय केलंयं ते तुम्हाला व्हीडिओत दिसेलच. पण बापासाठी त्यानं जे काही आज कमावलंयं त्या दृष्टीनं बापाला गगन ठेंगणं करुन सोडलंयं. सगळे मानपान सत्काराचे कार्यक्रम त्यानं बाजूला नेऊन ठेवले. सरळ बापाकडं गेला आणि आर्मीची कॅप बापाच्या डोक्यावर फिट्ट बसवली आणि एक बापाला कडक सॅल्यूट दिला. तोही कडक वर्दीतला सॅल्यूट बापाला उभ्या डोळ्या देखत त्यानं ब्रम्हांड दाखवलं, एका बापाला आणखी काय हवं. वर्दीतला आपला शेर पाहून बापाचाही कंठ दाटून आला होता. अशा सच्च्या शेराला एक कडक सॅल्यूट. संपूर्ण गावानं अक्षयला डोक्यावर घेतलं. आणखी काय हवं एका बापाला. पण यश पायाशी लोळत असलं तरीही पाय जमिनीवर ठेवणं म्हणजे नेमकं काय असतंयं. हे तुम्हाला या वीरपुत्राला पाहून लक्षात आलं असंल. महाराष्ट्रातील काही खेड्या पाड्यात आजही देशाच्या सेवेसाठी धावून जाणारे वीरपुत्र जन्माला येतात त्याचा आपल्याला अभिमान आहे.
एक भाऊ शत्रुशी लढता लढता धारातीर्थी पडला तर त्याच्याऐवजी लढण्यासाठी दुसरा भाऊ तयार होऊन निघतो. देशाप्रति असलेला हा अभिमान हा इथल्या भूमीत जन्म घेणाऱ्या प्रत्येकामध्ये उपजत असतो. गरज असते ती या निखाऱ्याला वेळीच फुंकर मारण्याची देशासाठी त्याग, बलिदान सर्वस्व अर्पण करण्याची आणि त्याला योग्य वयात दिशा देण्याची. गावाकडची माणसं जास्त शिकलेली नसतील. पण त्यांच्या मुलांना देशसेवेचे धडे कसे द्यायचे हे त्यांना सांगावं लागत नाही. आपल्या मुलाला देशाच्या सेवेसाठी अर्पण करण्याचं त्यांचं व्रत पाहून एखाद्या भल्या गडगंज श्रीमंत व्यक्तीलाही जमायंचं नाही. आता अशी तुलना केल्यावर काही लोकांना राग येईल पण खरं ते खरंचं आहे. अशीच एक गोष्ट सैनिकांला विचारली जाते. त्यावर त्याचं उत्तर ऐका आणि अक्षयचं उदाहरण आलं त्यावरचाच एक किस्सा आहे. एकदा एक ट्रेनिंग सुरू असणाऱ्या सैनिकाला विचारलं जातं. तुझ्या घरी तुझी आई आजारी आहे आणि इथे युद्धाची परिस्थिती आल्यावर काय करशील?. त्यावर त्याचं उत्तर होतं मी माझ्या भारतमातेच्या सेवेला थांबेन. पण मग त्याला पुन्हा विचारण्यात आलं की मग तुझ्या जन्मदात्या आईचं काय?, तिची जबाबदारी घ्यायला संपूर्ण देश आहे. माझं गाव आहे. मला तिची चिंता नाही. पण मी इथून गेलो तर माझ्या भारतमातेच्या सेवेसाठी कमी पडलो असं वाटेल. कसं वाटलं अक्षयचं स्वागत आणि सैनिकाचं धाडसी उत्तर.
बघा व्हिडीओ :