मराठी गप्पाच्या टीमला लेख लिहायला आवडतात का ? तर हो नक्कीच. पण मग सगळ्यांत आवडते लेख कोणते असा प्रश्न विचारला तर सगळेच असं उत्तर येईल. पण तरीही अगदी सुखावणारे लेख कोणते असा प्रश्न विचारालात तर उत्तर येतं की उदयोन्मुख कलाकारांविषयी असलेले. कारण कलाक्षेत्रात येणं, आपल्या कलेच्या जोरावर स्वतःची जागा बनवणं हे वाटतं तितकं सोप्पं नाहीये. आपली टीम सातत्याने कलाकारांच्या करकीर्दीचा आढावा घेत असते, त्यामुळे स्वतःतील कला सादर करायला आणि नाव कमवायला किती कष्ट लागतात, याची आम्हाला कल्पना आहे. त्यामुळे एखाद्या उदयोन्मुख कलाकाराला कुठेही मानसन्मान मिळत असेल, ओळख मिळत असेल तर आम्हाला विशेष आनंद होतो. खासकरून जेव्हा हा कलाकार अतिशय ग’रीब प’रिस्थितीतून पुढे आलेला असेल तेव्हा तर जास्तच.
आता गिटार बॉय शिवम याचंच उदाहरण घ्या ना. शिवम राहणारा दिल्लीतला. अतिशय ह’लाखीच्या प’रिस्थितीत वाढलेला. पण संगीत आणि खासकरून गिटार वर वाजत असलेलं संगीत आवडणारा हा मुलगा. दिवसा क’ष्ट करून पै’से क’मवत असे तर रात्री दिल्लीतील कॅनॉट प्लेस येथे बस्किंग करत असे. बस्किंग याचा अर्थ रस्त्यावर स्वतःची कला सादर करणारे कलाकार. ज्यांची कला बघून लोकं पै’से ही देऊ शकतात. पण शिवम मात्र पै’से घेतंच असे असं नव्हे.
हे म्हणू शकतो कारण आपल्या टीमने पाहिलेला व्हिडियो. या व्हिडियो मध्ये हा पोरगेलासा गिटार वादक आपल्या मित्रांसोबत गाणं सादर करताना दिसतो. ‘तेरी मिट्टी में मिल जावा’ हे बी.प्राक यांचं गाणं. या गाण्याची जादूच अशी आहे की प्रत्येकाच्या मनात हे गाणं अगदी पक्कं लक्षात राहतं. केसरी चित्रपटातलं हे गाणं बी.प्राक यांच्या सुरावटींनी भारलेलं आणि आपल्या मनाचा ठाव घेणारं. त्यामुळे शिवम हे गाणं गात असताना बरेच जण जे कॅनॉट प्लेस मध्ये फिरायला येतात ते हे गाणं ऐकत असत. त्यात शिवमच्या सुरावटींना गिटारची असलेली जोड यात रंग भरत असे.
यात लक्षात राहते ती एक गोष्ट. ती म्हणजे एक मुलगी या शिवमच्या गाण्याने प्रेरित होऊन त्याला मदत म्हणून पै’से देऊ करते. तिचा हेतू शुद्ध असतो, पण शिवम मात्र हे पै’से नाकारतो. तो असं का करतो काही कळत नाही. पण त्याचं कलेवर असणारं प्रेम हे त्यामागचं कारण असणार हे नक्की. या संपूर्ण व्हिडियो चा आपण अगदी अथपासून ते इतिपर्यंत आनंद घेतो.
असाच आनंद रेड एफ एम यांच्या टीमने ही घेतला. या गुणी गायक आणि गिटार वादकाला मंच मिळावा असंही त्यांना वाटून गेलं. रेड एफ एम वाल्यांना वाटलं आणि त्यांच्या एका इव्हेंट मार्फत त्यांनी ते शक्यही केलं. बरं नुसतं शक्य नाही तर या इव्हेंट् मध्ये त्याला प्रेक्षकांसमोर कोण घेऊन गेलं असेल याचा अंदाज करा. बरोबर ! खुद्द बी. प्राक तिथे त्यांच्या गाण्यांसाठी आले होते. त्यावेळी त्यांनी या शिवमशी बॅकस्टेज बातचीत ही केली. त्यावेळी असं ही लक्षात आलं की शिवम याने आपले पै’से साठवून साठवून त्याचं गिटार घेतलं होतं, ते पण नवं कोरं.
त्याने आधीही एकदा हे गिटार घेतलं होतं पण ते काही कारणाने तुटलं. मग त्याने नवीन गिटार साठी पैसे जमवून हे गिटार घेतल्याचं कळतं. हे सगळं आपल्याला शिवम च्या युट्यु’ब चॅ’नेल वर बघायला मिळतं. हे ऐकत असताना या व्हिडियोज मध्ये बी.प्राक ही थक्क झाल्यासारखे दिसून येतात. शिवमचा एकंदर प्रवास थक्क करणारा आहे. पण त्यासाठी त्याने केलेला संघर्ष, लढवलेलं डोकं आणि कलेची सातत्याने केलेली साधना ही त्याच्या यशाची मुख्य कारणं. मराठी गप्पाच्या टीमकडून या उदयोन्मुख गायक आणि वादकास पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा. येत्या काळात त्याने सातत्यपूर्ण पणे मेहनत करून नाव कमवत राहावं ही आमची सदिच्छा. आपल्याला हा लेख आवडला असेल अशी आशा आहे. तसेच आपल्या टीमने लिहिलेले अन्य लेखही आवडीने वाचा आणि आपल्याला आवडणारे लेख शेअर करायला विसरू नका. धन्यवाद !!!
बघा व्हिडीओ :