Breaking News
Home / मनोरंजन / “गुरुजी छडी नका मारू जी, लागतंय हातावरी”, शिक्षकांचा हा भन्नाट व्हिडीओ एकदा पहाच

“गुरुजी छडी नका मारू जी, लागतंय हातावरी”, शिक्षकांचा हा भन्नाट व्हिडीओ एकदा पहाच

नुकत्याच एक आठवड्यापूर्वी शाळा सुरू झालेल्या आहेत. आणि शाळा म्हटलं की, गम्मत-जम्मत, मजा, मस्ती असं सगळं काही आलं. अशातच आता एका शाळेतील व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. या व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सर्वजण थक्क झाले आहेत. व्हिडीओ पाहून तसं तुम्हाला हसू येईल पण बॉस अशी शाळा आपल्यालाही हवी होती, असे शिक्षक आपल्यालाही हवे होते, किंवा आताही माझी या शाळेत जायची तयारी आहे, असे विचार तुमच्या मनात आल्याशिवाय राहणार नाही. आता असं या व्हिडीओत नक्की आहे तरी काय हे जाणून घेण्याची, पाहण्याची उत्सुकता तुम्हालाही असेल नाही का?

सोशल मीडियावर दररोज वेगवेगळ्या प्रकारचे मजेदार व्हिडीओ अपलोड होत असतात. असे व्हिडीओ सोशल मीडियावर काही क्षणात हेडलाइनमध्ये झळकतात. आता पुन्हा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. हा व्हिडीओ एका शाळेतिल आहे. विशेष बाब म्हणजे हा व्हिडीओ विद्यार्थ्यांचा नसून शिक्षकांचा आहे. चक्क एक शिक्षिकाच बाकीच्या शिक्षक मंडळींना शिकवत आहे.

या व्हिडीओमधल्या शिक्षकांना त्यांच्यातीलच एक सहकारी शिक्षिका एक गीत व त्यावर नृत्य शिकवत आहेत. जेव्हा तुम्ही या गीताचे बोल ऐकाल आणि हा व्हिडीओ पाहाल तेव्हा जे काही दिसून येतं, पाहून तुम्ही अक्षरशः पोट धरून हसाल. ज्या पद्धतीने त्यांनी शिक्षकांच्या विनंतीवरून शिक्षकांनी स्वतःला शिकवले आहे आणि जो परफॉर्मन्स दिला तो पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही, हे मात्र नक्की.

अन भाऊजी… हात नका लाऊजी, पाहिल कुणीतरी… ही लावणी किंवा गाणे तुमच्यापैकी सगळ्यांनी ऐकले असेल. मात्र या गाण्याच्या चालीवर विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठीचा ध्यास काही शिक्षक मंडळींनी घेतला आहे. “अहो गुरुजी… छडी नका मारू जी, लागतंय हातावरी”, असे म्हणत विद्यार्थ्यांमध्ये एका वेगळ्याच पध्दतीने प्रबोधन केले जाणार आहे. आणि त्याच्याच सरावाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल झाला आहे.

एका शाळेच्या वर्गातील हा व्हिडीओ. जिथं लहान लहान मुलं नसून खुप सारे शिक्षक दिसत आहेत. आता हा व्हिडीओ चर्चेत येण्याचं कारण म्हणजे इथं शिक्षकांची विद्यार्थ्यांना शिकवण्याची पद्धत. या व्हिडीओत मात्र शिक्षिका बाकीच्या शिक्षकांना शिकवत आहे. खरं पाहिलं तर प्रत्येक शाळेची, शिक्षकाची शिकवण्याची वेगवेगळी पद्धत असते. काही शिक्षक तर इतक्या वेगळ्या पद्धतीने शिकवतात ज्याचा कुणी विचारही करू शकत नाही. अशाच शिक्षकांपैकी हा एक शिक्षक मंडळींचा ग्रुप आहे, जो आपल्या विद्यार्थ्यांना वेगळ्या प्रकारे शिकवून त्यांचे प्रबोधन करत आहे. यांच्या याच शिकवण्याच्या हटके शैलीमुळे हा शिक्षक ग्रुप फेमस झाला आहे. आता त्यांनी या व्हिडीओत नेमकं काय सांगितले आहे, हे तुम्हीही बघा आणि आपल्या मुलांनाही दाखवा. हा व्हिडीओ तुमचं मनोरंजन करेलच याची खात्री आम्हाला आहे. म्हणूनच आता हा व्हायरल व्हिडीओ तुम्हीही बघा आणि मजा घ्या. काळजी घ्या तसेच आमचे लेख वाचून, व्हिडीओ पाहुन आनंदी राहा.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.