Breaking News
Home / मनोरंजन / गेटच्या आत असलेल्या कुत्र्यांना डिवचण्यासाठी ह्या लहान मुलाने केलेली करामत पाहून तुम्हांला देखील हसू येईल, बघा व्हिडीओ

गेटच्या आत असलेल्या कुत्र्यांना डिवचण्यासाठी ह्या लहान मुलाने केलेली करामत पाहून तुम्हांला देखील हसू येईल, बघा व्हिडीओ

लहान मुलांमध्ये असलेली निरागसता आपलं मन जिंकून जाते. त्याचप्रमाणे त्यांच्यात असलेला अवखळपणा, खोडकर वृत्ती आपल्याला हसवून सोडते. त्यात त्यांचं डोकं जर जास्तच भरधाव धावत असेल तर मजाच येते. जोपर्यंत त्यांच्या खोडयांचा कोणाला त्रास होत नाही तोपर्यंत त्या हव्या हव्याश्या वाटतात. आज आपल्या टीमने असाच एक व्हिडियो पाहिला आहे जो पाहून अगदी धमाल येते. चला तर मग याविषयी जास्त जाणून घेऊयात.

हा व्हिडियो आहे एका लहान मुलाचा, जो एका बंगल्याबाहेर उभा असतो. बंगला असल्याने त्याला मोठं फाटक असतं आणि आत दोन छोटे, गोंडस असे दोन कुत्रे असतात. असतात लहान पण आवाज मात्र चांगलाच दमदार असतो. पण गंमत अशी असते की फाटक बंद असल्याने त्यांना बाहेर जाता येत नाही. बरं त्यात बाहेर उभा असणारा मुलगा मस्त खोडकर निघतो. त्याला कळतं की आपण हालचाल केली हे दोन कुत्रे भुंकतात. मग काय हा छोटा पंजाबी पुत्तर थेट भांगडा करायला लागतो.

सुरुवातीला एक स्टेप करतो. त्यावर गेटच्या अलिकडून भुंकण सुरू होतं. दोघेही उड्या मारत भुंकत असतात. तर या आपल्या छोट्या मित्राला अजून चेव येतो. तो अजून नवीन स्टेप करून दाखवतो. मग काय समोरून अजून प्रतिसाद येतो. आता तर या छोट्या मुलाची खात्रीच पटलेली असते की हा सिलसिला चालूच राहणार. त्यामुळे एक वेळ अशी येते की हा मुलगा मग थेट छोटेखानी डान्सच करतो. वेगवेगळ्या स्टेप्स करत त्याचा धमाल भांगडा बघायला मिळतो. हा सगळा प्रकार त्या बंगल्यात राहणारी एक व्यक्ती करत असते. त्यांनाही हसणं आवरत नसतं. या लहान मुलाच्या खेळण्याची त्यांना मजा वाटत असते. त्यांचा अधून मधून हसण्याचा आवाज येताना आपण ऐकत असतो. इथे या मुलाचा डान्स संपतो आणि मग तो त्या दोन्ही कुत्र्यांकडे औत्सुक्याने बघत असतो. आता काय प्रतिक्रिया येते बघूया असे भाव त्याच्या चेहऱ्यावर असतात. मग पुन्हा त्याचा डान्स सुरू होतो. पुन्हा त्या दोघांच्या प्रतिक्रिया भुंकण्यातून येत असतात. इथे कॅमेऱ्यामागून काका आणि फोन अलीकडले आपण मनापासून हसत असतो.

काही लहान मुलांच्या खोड्या बघून, ताया माया जेव्हा ‘लब्बाड’ म्हणून गालगुच्चा घेतात तसा हा मुलगा वाटून जातो. वात्रट असला तरी त्याच्या खेळकर स्वभावाने आपली काही क्षण तरी का होईना करमणूक होते. हा व्हिडियो पाहाताचक्षणी असं वाटलं की आपल्या वाचकांना याविषयी वाचायला आवडेल. त्यातूनच मग हा लेख लिहिला गेला आहे.

तेव्हा आपल्या या लेखाविषयी असलेल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स मधून कळू द्या. तसेच वेळ मिळाला की हा व्हिडियो सुद्धा नक्कीच बघा, धमाल येईल… आणि हो आपण मोठ्या प्रमाणावर आपल्या टीमचे लेख शेअर करता आहात त्याबद्दल मनापासून धन्यवाद !! आपल्या प्रोत्साहनामुळे आम्हाला, आपल्यासाठी नवनवीन विषयांवर लिहिण्याचा उत्साह वाढतो. त्यातून उत्तम लेखन होतं आणि आपलं उत्तम मनोरंजन. तेव्हा आपला हा स्नेह आपल्या टीमसोबत कायम असू द्या. आमच्यावर आपला लोभ कायम असावा ही विनंती. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.