Breaking News
Home / मनोरंजन / ‘गेट वे ऑफ इंडिया’ जवळ तोल गेल्यामुळे समुद्रात पडली महिला, बाजूला उभ्या असलेल्या फोटोग्राफरने बघा कसे वाचवलं

‘गेट वे ऑफ इंडिया’ जवळ तोल गेल्यामुळे समुद्रात पडली महिला, बाजूला उभ्या असलेल्या फोटोग्राफरने बघा कसे वाचवलं

पाऊस म्हटलं की, 2 गोष्टींमध्ये मोठया प्रमाणात वाढ होते. पहिलं म्हणजे शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान होतं आणि दुसरं म्हणजे पर्यटनस्थळी गर्दी वाढते आणि निष्कळजीपणामुळे अपघात पण होतात. पावसाळ्यात अपघात होण्याचे प्रमाण इतर ऋतूंच्या तुलनेने जास्त असते. कारण रस्ते निसरडे झालेले असतात. पावसाळ्यात पर्यटनस्थळीही मोठ्या प्रमाणात अपघात होतात. अगदी काहींना यात मृ’त्यूलाही सामोरं जावं लागतं. आज आम्ही तुमच्यासमोर असाच एक व्हिडिओ घेऊन आलो आहोत. ज्यात दिसून येते की, समुद्रात बुडालेल्या महिलेला एक व्यक्ती वाचवण्यासाठी आपला जीव पणाला लावतो. पोहता येत नसलेल्या त्या महिलेला वाचवायला तो फोटोग्राफर गेला नसता तर काय घडलं असतं, याची कल्पना करूनच आपल्या अंगावर शहारे येतात. को’रोना असूनही सध्या पर्यटक पर्यटनस्थळी गर्दी करत आहेत. प्रत्येक पर्यटनस्थळाचे विविध नियम असतात.

जसे की, पाण्याचे पर्यटनस्थळ असेल पाण्याचा जवळ जाऊ नका, असे स्पष्ट सांगितले जाते. ते पाळले गेले नाही तर आपल्या जीवाला आघात होऊ शकतो. को’रोनाची दुसरी लाट ओसरली आहे, असं वातावरण आहे. अशातच पावसाचा जोर वाढला आहे. पर्यटनस्थळी गर्दी कमी करण्याचे आवाहन प्रशासनाने केलेलं असतानाही तोबा गर्दी दिसत आहे. भर पावसाळ्यातही मुंबईकर आणि पर्यटक ‘गेटवे ऑफ इंडिया’ या पर्यटनस्थळी आनंद घेताना दिसतात. अशातच एक महिला समुद्र बघत असताना किनाऱ्यावरून घसरली आणि कठड्यावरून तोल जाऊन ती थेट समुद्रात पडली. आरडाओरडा सुरू झाली. त्या भागात उपस्थित असलेले इतर लोकही गोंधळले. दुर्दैवाने समुद्रात पडलेल्या महिलेला पोहता येत नव्हते. तिच्यासोबत काही इतर लोकही होते पण तिला वाचवण्यासाठी समुद्रात उडी मारण्याचे कुणाचे धाडस होईना.

तिथेच फोटोग्राफीचा व्यवसाय करणाऱ्या एका फोटोग्राफरने मागचा पुढचा कसलाही विचार न करता थेट समुद्रात उडी घेतली. या फोटोग्राफरचे नाव होते गुलाबचंद गोंड. बघ्यांची गर्दीत असणारा हा खरा धाडसी हिरो पुढे झाला आणि थेट समुद्राला भिडला. गुलाबचंद यांनी त्या महिलेला आधी बुडता बुडता वाचवले. मग कठड्याच्या बाजूच्या किनाऱ्यावर आणले. त्यानंतर वरून लोकांनी मोठी रस्सी खाली सोडली. त्या रस्सीच्या आणि एका मोठ्या एअरट्यूबच्या आधारे डुबलेली महिला सावरली. आश्चर्यकारक नजरेने लोक गुलाबचंद यांच्याकडे बघत होते, त्यांचे कौतुक करत होते. एवढं अफाट धैर्य खूप कमी लोकांकडे असते. हळूहळू गुलाबचंद यांनी त्या महिलेला किनारी आणले. त्या भागात पोलीस कर्मचारीसुद्धा तैनात होते. त्यांनीही जमेल तशी मदत केली. कसेबसे त्या महिलेला घेऊन गुलाबचंद किनाऱ्याच्या दुसऱ्या बाजूला गेले. कारण जिथून ती महिला समुद्रात पडली आणि ज्या भागातून लोकांनी खाली रस्सी सोडली त्या भागातून वरती येणे शक्य नव्हते.

समुद्रातुन कुठलाही आधार नसताना फक्त रस्सीच्या सहाय्याने जवळपास 25 फुटांची कठड्यावर चढून वर येणे शक्य नव्हते. मग गुलाबचंद यांनी रस्सीच्या साहाय्याने किनाऱ्याची दुसरी बाजू गाठली. त्या महिलेचे प्राण वाचले. त्या महिलेचे प्राण वाचवण्यासाठी साक्षात देवाच्या रूपाने गुलाबचंद धावले. उपस्थित असलेल्या लोकांनी त्यांचे खूप कौतुक केले. गुलाबचंद यांचं वय 45 आहे. मात्र त्यांच्यात असलेली जिद्द आणि उर्मी एखाद्या नवं तरुणाला लाजवेल, अशी आहे. त्यांनी ज्या पद्धतीने या अनोळखी महिलेचे प्राण वाचवले, त्याचा व्हिडीओ उपस्थित असलेल्या कुठल्यातरी पर्यटकाने शूट केला आणि सोशल मीडियावर टाकला. नंतर हळूहळू हा व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला. इथे लोक स्वतःच्या रक्ताच्या नात्यातील लोकांना जवळ करत नाहीत. त्यांची अडचणीत मदत करत नाहीत. गुलाबचंद यांच्यासारख्या एका ‘कॉमन मॅन’ने आपला जीव धोक्यात घालून ओळख पाळख नसलेल्या महिलेचे प्राण वाचवले. हा धडा खर तर पाठ्यपुस्तकात ‘माणुसकी’ नावाने छापला जायला हवा, असा आहे.

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.