गेल्या काही दिवसांत मराठी गप्पाच्या आपल्या टीमने अनेक वायरल व्हिडियोज वर लेखन केलेलं आहे. त्यातले बहुतांश व्हिडियोज हे लहान मुलं आणि त्यांच्या कलागुणांवर आधारित आहेत हे आपण अनुभवलं असेलच. अशा वेळी आमच्या टीमला अशाच एका लहान भावांच्या जोडीची आठवण झाली आणि आजचा लेख त्यांच्यावर लिहायचं ठरलं. मागील वर्षी लॉकडाऊन काळात अनेक घटना, गोष्टी, व्यक्तींची सातत्याने चर्चा होत होती. या चर्चेच्या विषयांपैकी एक विषय असायचा तो दोन लहानग्या भावंडांच्या गाण्यांचा. अर्जुन आणि अर्णव मंजेश्वर अशी या दोघांची नावं. या दोघांना आपण ‘मंजेश्वर ब्रदर्स’ म्हणुन ओळखतो. मुळचे भारतीय निवासी असणारे या दोघांचे आई वडील ऑस्ट्रेलिया येथे आपल्या मुलांसमवेत राहतात. ऑस्ट्रेलियात राहूनही या दोघांनी आपल्या मुलांमध्ये मराठी आणि हिंदी गाण्यांविषयीची आवड रुजवल्याचं दिसतं.
त्यामुळे त्यांच्या गाण्यातून एक प्रकारचा सहजपणा आपल्याला जाणवतो. या आवडीला सुरेल सुरांची साथ लाभल्याने मंजेश्वर ब्रदर्सचं प्रत्येक गाणं आपल्याला भावतं आणि स्मरणातही राहतं. त्यांनी गायलेली अनेक गाणी गाजली आहेत. त्यांच्या वयाला साजेसं असं ‘ससा तो ससा की कापूस जसा’ हे गाणं असो वा ‘आकाशी झेप घे रे पाखरा’, ‘अबीर गुलाल उधळीत रंग’ यांसारखे अभंग असोत. प्रत्येक गाण्याने श्रोत्यांची वाहवा मिळवली आहे. तसेच त्यांनी गायलेलं ‘रुपेरी वाळूत माडांच्या बनात ये ना’ हे तर सगळ्यांत जास्त लोकप्रिय ठरलेलं गाणं. सोबतीला ‘गोरे गोरे ओ बाके छोरे’ किंवा ‘हाल कैसा है जनाब का’, ‘होल्ले होल्ले चलो मोरे साजना’, ही हिंदी गाणीही गाजली. त्यांच्या लहान वयातील निरागसपणामुळे या गाण्यांच्या गोडव्यात भरच पडत आली आहे. गेल्या काही काळात या दोघांचं नवीन असं गाणं प्रदर्शित झालेलं नाहीये. पण येत्या काळात मात्र त्यांच्या निरागस सुरावटी पुन्हा आपल्या कानावर पडाव्यात ही इच्छा ! भावंडांच्या या सुरेल जोडगोळीला मराठी गप्पाच्या टिमकडून खूप खूप आशिर्वाद आणि शुभेच्छा. तसेच या बालकलाकारांना प्रोत्साहन देणाऱ्या त्यांच्या पालकांचे आणि कुटुंबीयांचं विशेष कौतुक.
मराठी गप्पाची टीम सातत्याने नवनवीन विषयांवर लिहीत असते. आपणही आमचे सगळे लेख शेअर करत आम्हाला पाठींबा दर्शवत असता. त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद. हा पाठिंबा कायम वाढता राहील हे नक्की. तेव्हा आजचा हा लेखही शेअर करा. तसेच न वाचलेले लेखही नक्की वाचा. आपल्या वेळेसाठी धन्यवाद ! आम्ही हा व्हिडीओ खाली देत आहोत, तुम्ही नक्की पाहून घ्या. आणि तुमच्या प्रतिक्रिया देखील क’मेंट्समध्ये द्यायला विसरू नका.
बघा व्हिडीओ :