वायरल व्हिडियोज वरील लेख म्हणजे मराठी गप्पा. आमच्या नियमित वाचकांच्या मनात हे समीकरण अगदी ठाम झालेलं आहे. या वाचकांच्या प्रतिसादामुळेच आमच्या टीमला विविध वायरल व्हिडियोज शोधून त्यावर लेखन करण्याचं प्रोत्साहन मिळतं. आपल्या भक्कम पाठिंब्यासाठी धन्यवाद ! आजही आमच्या टीमने असाच एक वायरल व्हिडियो वरील लेख आपल्या भेटीस आणला आहे. पण या वायरल व्हिडियोचं वैशिष्ठ्य असं कि एका अतिशय सुप्रसिद्ध अभिनेत्रीने या व्हिडियोची दखल घेत हा व्हिडीओ ट्वि’ट केला होता. या सुप्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे खुद्द माधुरी दीक्षित. माधुरीजींना काही दिवसांपूर्वी एका मुलाचा वायरल व्हिडियो नेट वर दिसला. त्यांनी तो ट्वि’ट करत त्या मुलाला डान्स दिवाने ३ या लोकप्रिय डान्स कार्यक्रमात आणण्याचं ठरवलं आणि तसं केलंही. या कार्यक्रमाचा त्या मुख्य जज म्हणून महत्वाचा भाग आहेत.
या व्हिडियोतील हा मुलगा म्हणजे अमन कुमार राज. मूळचा रांची, झारखंड इथला अमन वयाने केवळ आठ वर्षांचा आहे. पण अतिशय लहानपणापासून त्याला नृत्याची आवड होती आणि त्याने ती जोपासली. त्यामुळे एवढ्या कोवळ्या वयातही त्याने सादर केलेली नृत्य भुरळ पाडतात. त्याचे वडील पेशाने नाभिक आहेत आणि आई गृहिणी. तो ज्या वायरल व्हिडियो मुळे चर्चेत आला तो वायरल व्हिडियो म्हणजे सुप्रसिद्ध अभिनेता गोविंदा यांच्या चार गाण्यांचा मिळून केलेला एक व्हिडिओ आहे. जवळपास दोन मिनिटांच्या या व्हिडियो मध्ये चार गाणी आणि गोविंदाजींचे अनेक प्रसिद्ध असे संवाद सुद्धा ऐकायला मिळतात. एखाद्या डान्स परफॉर्मर साठी ही पर्वणीच आणि संधी सुद्धा.
अमन याने या संधीचं सोनं केलेलं दिसून येतं. हा व्हिडीओ सुरू झाल्यापासून पहिली काही सेकंद आपल्याला त्याची डान्स विषयी असलेली तळमळ जाणून घेण्यास पुरेशी असतात. त्याने अवघ्या काही सेकंदात आपलं लक्ष वेधून घेण्यात यश मिळवलेलं असतं. मग मध्येच संवाद येतात. गाण्यासारखंच या संवादांवरही उत्तम असे हावभाव आणि देहबोलीच्या जोरावर अमन आपलं लक्ष या व्हिडियो वर खिळवून ठेवतो.
एवढंच नव्हे तर पुढे येणाऱ्या प्रत्येक गाण्याच्या शब्दांनुसार तो जेव्हा जेव्हा स्टेप्स करतो तेव्हा आपण आपसूक त्याला दाद देत असतो. गोविंदाजींची गाणी आणि त्यावरचा त्यांचे परफॉर्मन्सेस म्हणजे पाहणाऱ्यास पर्वणीच. त्यांच्या विषयी वेगळा असा लेखच किंवा लेखांची मालिकाच होऊ शकते. त्यामुळे अमन याने या वयात त्यांच्या गाण्यावर डान्स करणं, हे तसं आ’व्हानात्मक म्हंटलं पाहिजे. पण अमन याने ते आ’व्हान लीलया पेलेलंय असं दिसतं. अर्थात त्याची मेहनत यांस कारणीभूत आहे, हे नक्की. सध्या अमन याचा हा व्हिडीओ जगभरातून प्रेक्षकांची प्रशंसा मिळवतो आहेच. याच व्हिडियोच्या जोरावर त्याला डान्स दिवाने सारखा लोकप्रिय शो मिळाला हे त्याच्या मेहनतीचं चीज. त्याच्या या आनंदात मराठी गप्पाची टीमही सामील आहे. त्याच्या सातत्यपूर्ण आणि यशस्वी कारकीर्दीसाठी मराठी गप्पाच्या टिमकडून मनःपूर्वक शुभेच्छा !
बघा व्हिडीओ :