Breaking News
Home / बॉलीवुड / गोविदाने २ वर्षाअगोदर साइन केलेला गदर चित्रपट ह्याकारणामुळे सनी देओलला मिळाला

गोविदाने २ वर्षाअगोदर साइन केलेला गदर चित्रपट ह्याकारणामुळे सनी देओलला मिळाला

हा बॉलिवूडचा एकमेव चित्रपट आहे ज्याने सर्वात जास्त तिकीट विक्रीचा विक्रम केला आहे. ह्या चित्रपटाचे १० कोटींपेक्षा जास्त तिकिटं विकले गेले होते. २००१ साली ह्या चित्रपटाने २६५ कोटींचा व्यायसाय केला होता. परंतु जर आजच्या काळात जर ह्याची किंमत काढली गेली तर ती ६०० कोटींपेक्षा कितीतरी जास्त होते. हा चित्रपट होता ‘गदर’ आणि ह्या चित्रपटाचे मुख्य कलाकार होते सनी देओल आणि अमिषा पटेल. परंतु तुम्हांला कदाचितच माहिती असेल, हा चित्रपट अगोदर गोविंदाला ऑफर झाला होता आणि ह्या चित्रपटाची मुख्य अभिनेत्री काजोल होती. आजच्या लेखात आम्ही तुम्हांला सांगणार आहोत कि केव्हा गोविंदाला ‘गदर’ चित्रपट ऑफर झाला होता, का त्याच्या हातून हा चित्रपट गेला आणि नंतर सनी देओलला घेऊन कसे ह्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाल उडवून दिली.


ज्यावेळी अनिल शर्मा ह्या चित्रपटावर काम करत होते, म्हणजेच ‘गदर’ चित्रपटाच्या कथेवर काम करत होते, तेव्हा ‘सकीना’ चे कॅरॅक्टर त्यांनी काजोलला डोळ्यासमोर ठेवून लिहिले होते. ह्यानंतर अनिल शर्मा हि कथा काजोलकडे घेऊन गेले. त्यांनी काजोलला चित्रपटाची कथा सांगितली. काजोलला हि कथा खूपच आवडली परंतु जेव्हा अनिल शर्माने जेव्हा काजोलकडे चित्रपटासाठी तारखा मागितल्या तेव्हा त्यावेळी काजोल अगोदरच दुसरा चित्रपट करत होती. तिने त्यावेळी अगोदरच वेगळ्या चित्रपटासाठी तारखा दिल्या होत्या. त्यामुळे तारखांचा जुळत नसल्या कारणाने काजोलला ह्या चित्रपटासाठी नकार द्यावा लागला. आता गोष्ट करूया चित्रपटातील मुख्य अभिनेत्याची. ‘गदर’ चित्रपटाअगोदर अनिल शर्मा एका चित्रपटावर काम करत होते ज्याचे नाव होते ‘महाराजा’. ह्या चित्रपटाचे मुख्य कलाकार होते गोविंदा आणि मनीषा कोईराला. ज्या वेळी अनिल शर्मा हे ‘महाराजा’ चित्रपटावर काम करत होते त्याचवेळी ‘गदर’ चित्रपटाबद्दल त्यांच्या डोक्यात कल्पना आली. त्यांना गोविंदासोबत काम करून चांगले वाटले होते त्यामुळे त्याने हि कल्पना गोविंदासोबत शेअर केली.


अनिल शर्मा ह्यांनी ‘गदर’ चित्रपटाची कथा गोविंदाला सांगितली. गोविंदाला सुद्धा ‘गदर’ ची कथा आवडली होती. त्यामुळे गोविंदाने १९९८ मध्येच अनिल शर्मासोबत हा चित्रपट साईन केला होता. ह्याच दरम्यान ‘महाराजा’ चित्रपट बनून पूर्ण झाला होता आणि जेव्हा हा चित्रपट रिलीज तेव्हा बॉक्सऑफिस वर ‘महाराजा’ चित्रपट सपशेल अपयशी ठरला. जेव्हा महाराजा चित्रपट बॉक्सऑफिस वर खूप वाईतरीत्या फ्लॉप झाला तेव्हा अनिल शर्मा ह्यांनी निश्चय केला कि ते ‘गदर’ चित्रपट गोविंदासोबत करणार नाहीत. त्यांनी गोविंदाचा विचारच सोडला. जरी गोविंदाने मीडियामध्ये अनेकदा सांगितले आहे कि त्याला असे मारामारीवाले रोल करायचे नव्हते. त्याला हसणारे, विनोद आणि नाचगाण्यावाले चित्रपट करायचे होते ह्यामुळे त्याने ‘गदर’साठी नाही म्हटले. ह्यानंतर अनिल शर्मा गेले आपले आवडते अभिनेते धर्मेंद्र ह्यांच्याकडे. धर्मेंद्रच्या अनेक चित्रपटांत अनिल शर्मांनी असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम केले आहे. सोबतच धर्मेंद्रच्या अनेक चित्रपटांचे त्यांनी दिग्दर्शन सुद्धा केले आहे.


म्हणून अनिल शर्मा ह्यांनी धर्मेंद्र ह्यांना रिक्वेस्ट केली कि, कृपया तुम्ही सनी देओलला सांगा कि माझा एक चित्रपट आहे ‘गदर’. त्यामध्ये मुख्य पात्र आहे ‘तारा सिंग’चे. त्याची भूमिका निभवायला सांगा. सर्वांना माहिती आहे, सनी देओलचा स्वभावच असा आहे कि त्याच्या वडिलांची कोणतीच गोष्ट तो टाळू शकत नाही. त्यामुळे सनी देओलने ह्या चित्रपटासाठी लागेचच होकार दिला. ह्यानंतर अमित शर्मा ह्यांनी सनी देओल आणि अमिषा पटेल ह्यांना घेऊन ‘गदर’ चित्रपट बनवला. जो सुरुवातीला त्यांनी गोविंदा आणि काजोल ह्यांना डोळ्यासमोर ठेवून बनवला होता. हा चित्रपट खूपच्या चांगल्याप्रकारे बनला. जेव्हा हा चित्रपट पूर्ण होऊन रिलीज झाला तेव्हा ह्या चित्रपटाने बॉक्सऑफिसवर धमाल उडवून दिली होती. उलट ह्या चित्रपटासोबत अजून एक मोठा चित्रपट रिलीज झाला होता, आणि तो चित्रपट होता ‘लगान’. हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर ब्लॉकबस्टर ठरले. एकीकडे ‘गदर’ने कमाईचे रेकॉर्ड तोडले तर दुसरीकडे ‘लगान’ हा चित्रपट कमाई सोबतच ऑस्करसाठी सुद्धा गेला होता. तर आजच्या लेखात आम्ही सांगितले कि कश्याप्रकारे ‘गदर’ चित्रपट गोविंदाच्या हातून निसटून सनी देओलकडे गेला.

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *