Breaking News
Home / मनोरंजन / ग्राहकांशी अश्याप्रकारे बोलल्यावर दुकानावर गर्दी का नाही जमणार, बघा अन्सार चाचांचा हा व्हिडीओ

ग्राहकांशी अश्याप्रकारे बोलल्यावर दुकानावर गर्दी का नाही जमणार, बघा अन्सार चाचांचा हा व्हिडीओ

आमच्या एका मित्राला काही काळापूर्वी एका कंपनीच्या सेल्स प्रोफाइल मध्ये जॉब लागला. आमचा हा मित्र तसा कमी बोलणारा. पण हा जॉब लागल्यापासून त्याच्यात जो बदल झाला आहे तो लक्षणीय आहे. आता तर त्याचं एक पेटंट वाक्य अगदी हमखास ऐकायला मिळतं – भाई, बोलनेवाले का पैसा होता है. त्याच्या जॉबच्या दृष्टीने अगदी खरंच आहे ते. पण गंमतीचा भाग सोडलात तर जाणवेल की तो जे बोलतोय ते खरं आहे. आपल्याकडे एक म्हण आहे नाही का, ‘बोलणाऱ्याची माती पण विकली जाते, पण गप्प राहणाऱ्याचं सोनं पण विकलं जात नाही.’

आज या सगळ्यांची आठवण झाली कारण बराच काळ मनात घोळत असलेला एक विषय आता लेखस्वरूपात आपल्या समोर येतो आहे. हा विषय म्हणजे आपल्या संगमनेर तालुक्यातले एक चाचा. ह्या चाचांच नाव आहे अन्सार चाचा. त्यांचं समनापूर येथे वडापावचं दुकान आहे. या दुकानात मिळणाऱ्या वडापावच्या चवीची जशी चर्चा असते तशीच चर्चा या काकांच्या मिठ्ठास वाणीची ही असते. गेल्या काही काळात तर या काकांच्या जबरदस्त कॉमेंट्री वर अनेक व्हिडियोज वायरल झाले आहेत.

आपल्या टीमने ही अनेक व्हिडियोज पाहिले आणि त्यातला एक तर अतिशय आवडला. अन्सार चाचा यांचा हा व्हिडियो म्हणजे ग्राहकांना कशा उत्तम पद्धतीने हाताळता येऊ शकतं याचा उत्तम नमुना आहे. उदाहरणार्थ त्यांच्या दुकानावर गर्दी खूप असते. असं असलं तरीही यांच्यातील प्रत्येकाला ते मायबाप म्हणून संबोधतात. तसेच प्रत्येकाशी अगदी अदबीने पेश येतात. अर्थात कधी कोणी नियमांचं उल्लंघन केलं की त्यांचा कठोर स्वर ऐकू येतो, पण तोही अगदी काही क्षण. पुन्हा त्यांच्या गोड वाणीत त्यांचं बोलणं चालू असतं. त्यांच्या उजव्या हाताला असलेला मुलगा, वडा पाव बांधत असतो तर डाव्या बाजूला वडे आणि मिरच्या तळण्याचा कार्यक्रम सुरू असतो. पण आपलं लक्ष मात्र वन अँड ओन्ली काकांकडे असतं. सोबतंच त्यांचे काही डायलॉग्ज तर एकदम लक्षात राहतात. जवळपास प्रत्येक व्हिडियोत हे ऐकायला येतात. जसं की त्यांच्या डाव्या बाजूला स्त्रियांसाठी विशेष जागा असते जेणेकरून त्यांना वडापाव व्यवस्थित विकत घेता यावा. पण त्यातही कोणत्या ताई, माईला, अक्काला वडापाव भेटायला वेळ लागला तर आपल्या माणसाला त्यांचा एक डायलॉग ठरलेला असतो, अरे अक्का वाट बघून राहिली काही महिने, पाहिले त्यांना वडापाव बांधून दे.

तीच बाब मिरच्या देताना. चटक्याला समुद्राचा झटका देऊन टाक असं म्हणत ते आपल्या माणसांना मिरच्या वगैरे तळायला सांगतात. तसंच वडापाव आता खायला हवा आहे की पार्सल हे विचारताना ‘नेता की खाता’ हा प्रश्न विचारतात. बरं ते या टोन मध्ये विचारतात की उत्तर पण खाता किंवा नेता असंच येतं. ते पार्सल द्या, इथे खाऊ वगैरे उत्तरं येत नाहीत. त्यातून एक गंमत निर्माण होते. तसंच जेव्हा वडापाव चट्कन बनवून हवे असतात त्यावेळी आपल्या खानसाम्याला महाप्रचंड वेग धारण कर म्हणून काका ऑर्डर देतात. काका आणि त्यांचे एकापेक्षा एक डायलॉग्ज उगीच प्रसिद्ध होत नाहीत. त्यांच्या या सुप्रसिद्ध डायलॉग्जचं आणि खेळकर वृत्तीचं कारण विचारलं असता, गिर्हाईकांनी सगळं शिकवलंय, अनुभवाने बरंच शिकवलंय ही त्यांची उत्तरं असतात. खरं ही असणार. कारण काही काळापूर्वी त्यांनी एका युट्युब चॅनेल ला मुलाखत दिली होती. त्यात त्यांनी स्वतःचा प्रवास सांगितला होता. चाचांना परिस्थितीमुळे अगदी लहान वयात हॉटेल मध्ये काम करणं भाग पडलं. पुढे त्यांनी बरीच विविध कामं करून आपली परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला. त्यातील एक यशस्वी ठरलेला प्रयत्न म्हणजे नसीब वडापावची गाडी. १९७८ साली चाचांनी ही गाडी लावायला सुरुवात केली. अवघ्या ३० पैशाला तेव्हा वडापाव मिळत असे. तिथपासून अथक परिश्रम करत करत आज चाचांनी ह्या वडापावच्या गाडीला महाराष्ट्रात प्रसिद्धी मिळवून दिली आहे. आता तर युट्युब मुळे त्यांची कीर्ती सातासमुद्रापार पोहोचली असणार यात शंका नाही.

त्यांच्या या प्रवासातून व्यवसायाचे अनेक धडे शिकता येतात. गिर्हाईकांशी डोक्यावर बर्फ ठेऊन आणि तोंडावर साखर ठेवत कसं संभाषण करावं, बोलताना शब्दांचा ठसका असला तरीही मिठ्ठास कशी असावी, दुकान चालवताना गर्दीचं नियोजन कसं करावं, हे करत असताना आपल्यासोबत काम करणाऱ्यांना कसं हाताळावं या आणि अशा अनेक गोष्टी शिकता येतात. आपल्या टीमने तर त्यांच्या या व्हिडियोज मधून बऱ्याच गोष्टी शिकल्या आहेत. आपणही नक्कीच अनेक बाबी शिकला असाल. त्या बाबी आपल्या कमेंट्स सेक्शन मध्ये लिहायला विसरू नका. कारण न जाणो आम्ही न पाहिलेली एखादी गोष्ट आपल्यामुळे आम्हाला आणि इतर वाचकांना ही कळेल. तसेच नेहमीप्रमाणे आपला हा लेखही अगदी आवर्जून शेअर करा. कारण आपलं तर ठरलंय ना मंडळी, ‘लेख वाचत राहा, शेअर करत राहा’. आपला आमच्या टीमविषयी असणारा लोभ कायम राहू द्या ही सदिच्छा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.