Breaking News
Home / बॉलीवुड / घटस्फोटानंतर सुद्धा ह्या ५ कलाकारांना झाले प्रेम, दुसऱ्या लग्नाची बघत आहेत वाट

घटस्फोटानंतर सुद्धा ह्या ५ कलाकारांना झाले प्रेम, दुसऱ्या लग्नाची बघत आहेत वाट

फरहान अख्तर हा जावेद अख्तर यांचा मुलगा आहे. सिनेमा क्षेत्रात आपल्या दमदार निर्देशन आणि शानदार अभिनयामुळे फरहान ने प्रेक्षकांच्या मनात आपली वेगळी जागा निर्माण केली आहे. सध्या फरहान अख्तर त्याच्या लग्नाच्या बातमीमुळे चर्चेत आहे. अशी बातमी समोर येत आहे कि, २०२० फेब्रुवारी मध्ये फरहान अख्तर त्याची प्रेयसी शिवानी दांडेकर हिच्या सोबत लग्न करणार आहेत. बॉलीवूड मध्ये असे खूप कलाकार आहेत जे घटस्फोटानंतर पुन्हा लग्न करणार आहेत. आज आम्ही तुम्हाला या लेखातून काही अश्या कलाकारांबद्दल सांगणार आहोत, जे एकदा घटस्फोट झाल्यानंतर पुन्हा लग्न करण्यामुळे चर्चेत आहेत.

फरहान अख्तर

फरहान आणि शिवानी यांच्या फेब्रुवारी २०२० मध्ये होणाऱ्या विवाहाबाबत खूप बातम्या येत आहेत. फरहानचे या आधी २००० मध्ये अधुना सोबत लग्न झाले आहे. लग्नानंतर १७ वर्षांनी या दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. या नंतर फरहानचे शिवानी दांडेकर सोबत प्रेम जुळले. आता या दोघांच्या लग्नाची बातमी समोर येत आहे.

मलायका अरोरा
मलायका अरोरा हि बॉलिवूड मधील एक सुंदर आणि मादक अभिनेत्री आहे. मलायका सिनेमा क्षेत्रात आपल्या कामासोबतच आपल्या रिलेशनशिपबद्दल खूप चर्चेत असते. अरबाज खान बरोबर तिचे पहिले लग्न झाले आहे. परंतु लग्नाच्या काही वर्षांनी २०१६ मध्ये मलायका आणि अरबाज ह्यांनी घटस्फोट घेतला. अरबाज खान सोबत घटस्फोट घेतल्यानंतर मलायका अरोरा चे नाव अर्जुन कपूर सोबत जोडले जाते. असे कळते कि लवकरच अर्जुन आणि मलाईका लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत.

अरबाज खान
अरबाज खान आणि मलायका अरोरा यांनी १९९८ मध्ये लग्न केले. परंतु, २०१६ मध्ये दोघे वेगळे झाले. मलायका अरोरा नंतर अरबाज खानला जॉर्जिया अँड्रीअनी सोबत प्रेम झाले. सध्या दोघे रिलेशनशिपमध्ये आहेत. अरबाज आणि जॉर्जिया ला बहुतेक वेळा एकत्र पाहिले गेले आहे. दोघेही पुढच्या वर्षी लग्न करण्याच्या विचारात आहेत.

कलकी
कलकी ने २०११ मध्ये निर्देशक अनुराग कश्यप ह्यांच्या बरोबर विवाह केला. परंतु दोघांचे हे लग्न जास्त काळ टिकू शकले नाही. त्यांनतर दोघांनी घटस्फोट घेतला. कलकी ने अनुराग कश्यप ह्यांना विसरून आपल्या जीवनात पुढे जाण्याचा निर्णय घेतला आणि आता ती गई हर्षबर्ग सोबत रिलेशन मध्ये आहे. कलकी हर्षच्या बाळाची आई होणार आहे.

अर्जुन रामपाल
अर्जुन रामपालचा विवाह १९९८ मध्ये मेहर जेसिया सोबत झाला. परंतु लग्नाच्या २० वर्षांनी २०१८ मध्ये दोघे वेगळे झाले. अर्जुन आणि मेहरच्या घटस्फोटाबाबत काही खास माहिती मिळाली नाही, पण सध्या अर्जुन गॅब्रिएला सोबत रिलेशन मध्ये आहे. काही दिवसांपूर्वी गेब्रिएला ने अर्जुन च्या बाळाला जन्म दिला आहे.

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *