एक चांगला शिक्षिक तोच असतो जो आपल्या विद्यार्थ्यांना स्वतःच्या मुलांप्रमाणे मानतो. त्यांना योग्य मार्गदर्शन करतो. टवाळखोर आणि वात्रट विद्यार्थांना देखील योग्य मार्गावर घेऊन येतो. सामान्यतः असं पाहिलं गेलं आहे कि जेव्हा कोणी विद्यार्थी घरचा अभ्यास (होमवर्क) करत नाही, किंवा अभ्यासात कच्चा असतो तेव्हा शिक्षक त्यांना ओरडतात, प्रसंगी मारही देतात. परंतु आज आम्ही तुम्हांला अश्या एका समजूतदार शिक्षिकेची ओळख करून देणार आहोत, ज्यांची विद्यार्थ्यांशी बोलण्याची पद्धत पाहून प्रत्येक जण त्यांचा फॅन झाला आहे. काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडीओ खूप वायरल होत आहे. ह्या व्हिडिओमध्ये दिसत आहे कि एका विद्यार्थिनीने आपला घरचा अभ्यास पूर्ण केलेला नाही. ती खूप घाबरलेली दिसून येत आहे. घरचा अभ्यास केला नसल्यामुळे आपली काही मॅडमच्या हातून खैर नाही, आता एकतर मार तरी खावा लागेल किंवा ओरडा तरी, असंच काहीसं तिच्या मनात चाललेलं असतं. परंतु शिक्षिका ह्याच्या अगदी उलट कृती करते. त्या विद्यार्थिनीला खूप प्रेमळपणे समजावतात. व्हिडीओच्या शेवटाला शिक्षिका विद्यार्थिनीच्या चेहऱ्यावर देखील हास्य आणतात.
आयपीएस ऑफिसर सुद्धा झाले इम्प्रेस :
शिक्षिका इतक्या प्रेमाने आणि समजूतदारपणे आपले म्हणणे मांडतात कि मुलगी पुढच्या वेळेपासून आपले होमवर्क पूर्ण करून आणण्याचे वचन देते. शिक्षिकेने ज्या पद्धतीने विद्यार्थांना हाताळलं आहे, तो अंदाज लोकांना खूप आवडत आहे. प्रत्येकजण हेच म्हणत आहे कि जर सर्व शिक्षक ह्यांच्या सारखे झाले तर. मन जिंकणारा हा व्हिडीओ ट्विटरवर IPS ऑफिसर दीपांशु काबरा ह्यांनी शेअर केला आहे. ह्या व्हिडीओच्या कॅप्शन मध्ये त्यांनी लिहिलं आहे कि, “मुलीचं होमवर्क झालं नव्हतं. शिक्षिकेने मारणे किंवा ओरडण्याऐवजी प्रेमाने समजावत मुलीच्या चेहऱ्यावर हास्य खुलवलं आणि मुलीला होमवर्क करण्याची समज सुद्धा दिली. खूपच सुंदर आणि प्रेमळ संवाद… जरूर ऐका..”
लोकांनी दिल्या प्रतिक्रिया :
हा व्हिडीओ पाहून लोकांनी सुद्धा खूप मजेदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलं, “आम्हांला तर कुटून काढत होते आणि जेव्हा शिक्षकांचा मूड खराब असायचा तेव्हा तर पूर्ण वर्गाचीच धुलाई व्हायची.” तर दुसर्याने लिहिलं, “शिक्षक तर आम्हाला कुत्रं बनवून वेताच्या छडीने मारायचे.” तर एकाने कमेंट केली आहे कि, “शिक्षक कधी साधारण नसतो, आपत्ती आणि निर्मिती दोन्हीची क्षमता त्याच्यात असते. आचार्य चाणक्य ह्यांनी म्हटलेलं वाक्य सार्थक केलं ह्या शिक्षिकेने.” तर एकाने कमेंट केली आहे कि, “फारच सुंदर. आमचे शिक्षक तर आम्हाला समजावण्याऐवजी सर्व वर्गासमोर चांगलाच अपमान करायचे.” अश्याप्रकारे अनेकांनी शिक्षेकच्या ह्या वागणुकीबद्दल प्रशंसा केली आहे. तर मित्रांनो तुम्हाला शिक्षिकेचा हा अंदाज कसा वाटला, नक्की सांगा.
बघा व्हिडीओ :