जेव्हा पण श्रीकृष्णाची गोष्ट येते, तेव्हा अनेकांच्या डोक्यात एक चेहरा अवश्य येतो आणि तो चेहरा म्हणजे नितीश भारद्वाजचा ह्यांचा. होय, नितीश भारद्वाज ह्यांनी टीव्हीवर श्रीकृष्णाचा सुंदर अभिनय करून फक्त लोकांची मनेच नाही जिंकली, तर अनेक वर्षांनंतरसुद्धा लोकं त्यांना श्रीकृष्णाच्या चेहऱ्यामध्ये शोधायचा प्रयत्न करतात. इतकंच नाही, जेव्हा त्यांचा सिरीयल टीव्हीवर यायचा, तेव्हा लोकं त्यांना श्रीकृष्ण समजून पूजा सुद्धा करायची. तर चला जाणून घेऊया आजच्या ह्या लेखामध्ये तुमच्यासाठी काय खास आहे ते.
नितीश ह्यांनी बीआर चोप्रा ह्यांच्या महाभारत सिरीयल मध्ये भगवान श्रीकृष्णांची भूमिका निभावली होती, त्यानंतर ते घराघरांत लोकप्रिय झाले. असं बोललं जातं कि, त्याकाळी नितीश ह्यांच्या महाभारतातील श्रीकृष्णांच्या प्रतिमेतील पोस्टरची सुद्धा लोकं पूजा करू लागले होते. कारण लोकांनी त्यांना कृष्णच मानलं होतं. आणि त्यांच्या शिवाय कोणती वेगळी प्रतिमा लोकांच्या मनात येत नव्हती. ह्याचा स्पष्ट अर्थ असा होता कि श्रीकृष्णच्या एका भूमिकेमुळे नितीश ह्यांचे संपूर्ण जीवनच बदलून गेले होते, ज्याविषयी त्यांनी कधी विचार सुद्धा केला नसेल.
टीव्हीवरचा एक लोकप्रिय चेहरा असल्या कारणाने बीजेपी ने नितीश ह्यांना १९९६ मध्ये जमशेदपूर येथून लोकसभेचे निवडणूक तिकीट दिलं गेलं. त्यानंतर त्यांनी निवडणूक लढवली आणि त्यांना त्यांच्या लोकप्रियतेचा फायदा सुद्धा झाला. होय, नितीश निवडणूक जिंकले होते आणि संसदेत सुद्दा निवडून आले होते. परंतु नंतर त्यांना आपण काहीतरी चुकीचं करत आहोत असं वाटू लागलं आणि नंतर त्यांनी राजनीती सोडून दिली. राजनीती सोडल्यानंतर नितीश ह्यांना विचारले गेले कि तुम्ही भविष्यात पुन्हा राजनीतीमध्ये येणार का, तर त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं कि राजनीती माझ्यासाठी बनलेलीच नाही आहे, कारण जे मी तिथे करायचो, तेच काम मी माझ्या चित्रपटांतून करतो. अश्यामध्ये राजनीती बद्दल आता काहीच विचार नाही करत आणि माझे सर्व मित्र मला राजनीती मध्ये जाण्यापासून थांबवत आहेत. आणि मी माझ्या चित्रपटांमध्येच खूप समाधानी आहे आणि आता पुन्हा एकदा राजनीती मध्ये जाऊ असा कोणताच इरादा नाही. त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा अभिनय क्षेत्रात पाउल ठेवलं, परंतु आज सुद्धा त्यांच्या श्रीकृष्ण वाल्या भूमिकेची बरोबरी कोणीच करू शकलं नाही.