Breaking News
Home / ठळक बातम्या / घराचे नुकसान झालेल्या निराधार वृद्ध महिलेसाठी पोलिसांनी जी माणुसकी दाखवली ते पाहून तुम्हीही कौतुक कराल

घराचे नुकसान झालेल्या निराधार वृद्ध महिलेसाठी पोलिसांनी जी माणुसकी दाखवली ते पाहून तुम्हीही कौतुक कराल

आपण सध्या ज्या को’विड काळात जगतो आहोत तो येत्या भविष्य काळात चर्चिला जाणारा इतिहास असणार आहे, हे सगळेच जण मान्य करतील. त्यावेळी या काळात प्रत्येकाला आलेले विविध अनुभव मोठ्या प्रमाणावर शेअर केले जातील. अर्थात काहींचे अनुभव कटू, तर काहींचे सुखद असतील. अर्थात सध्याच्या काळात सुखद अनुभव तसा विरळाच म्हणायला हवा. पण जिथवर माणसा माणसातली माणुसकी जिवंत आहे तोपर्यंत सुखद अनुभव येत राहतील, हे नक्की. असाच काहीसा अनुभव एक बातमी ऐकल्यावर आपल्या टीमला आला. आजचा लेख त्याचविषयी आहे.

ही बातमी आहे औरंगाबाद जिल्ह्यातील. महाराष्ट्राचा आणि भारतातला एक आघाडीचा औद्योगिक जिल्हा म्हणजे औरंगाबाद. येथील सोयगाव, सावळदबारा येथे काही काळापूर्वी एक घटना घडली. एका वृद्ध महिलेच्या घरी मध्यरात्रीच्या सुमारास अचानक आग लागली. या वेळी घरातील बहुतांश वस्तूंचे नुकसान झाले. अतिशय दुर्दैवी अशी ही घटना. आग काही काळाने शांत झाली खरी, पण बरंचस नुकसान करून गेली. अशा वेळी पोलिसांत असलेली माणुसकी पुन्हा एकदा दिसून आली.

पोलिस कर्मचारी रवींद्र बागूलकर यांच्या लक्षात आलं, की या वृद्धेच्या घरात मोठी कमाई करणारं असं कोणी नाही. तसंही आग लागल्यामुळे नुकसान झालं की किती भुर्दंड पडतो हे आपण ऐकलं असेल, पाहिलं असेल किंवा कदाचित स्वतःच्या उदाहरणावरून अनुभवलं ही असेल. तसेच त्या वृद्ध महिला स्वतः काबाड कष्ट करून दैनंदिन जीवन व्यतीत करतात लक्षात आल्यावर रवींद्र बागूलकर यांनी पुढाकार घेत या वृद्ध महिलेस पुरेल असं धान्य देऊ केलं.

या विषयीची बातमी एका युट्युब न्यूज चॅनेल वरून ऐकायला मिळते. जवळपास महिनाभरापूर्वी झालेली ही घटना. सध्याच्या करोना काळात असं संकट अंगावर येणं म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. पण सुदैवाने समाजात आजही माणुसकी टिकून आहे. पोलीस हे ही आपल्या समाजाचाच एक भाग आहेत. त्यामुळे ते सुद्धा यास अपवाद कसे असतील. आपण या आधीही अनेक वेळेस पोलिसांना त्यांच्या कार्यकक्षेबाहेर जात नागरिकांना मदत करताना पाहिलं आहे. त्या घटनांमधील ही अजून एक घटना. पोलीस दलातील रवींद्र बागूलकर आणि इतर ज्या ज्या कर्मचाऱ्यांनी या वृद्धेस मदत करण्यात हिरीरीने भाग घेतला त्या सगळ्यांना मानाचा मुजरा.

तसेच याप्रसंगी जे जे लोकप्रतिनिधी, समाज सेवक पुढे येऊन मदतीस धावले असतील त्या साऱ्यांचं कौतुक. आपल्या टीमला पोलिसांविषयी नेहमीच आदर राहिला आहे. त्यात भर पडली ती आज ही बातमी ऐकून. लेखाचा शेवट करण्याअगोदर एक गोष्ट नमूद करावीशी वाटते. या लेखातील लिहिलेल्या बाबी या यु’ट्युब व्हिडियोज वरील माहितीवर आधारलेल्या आहेत. त्यामुळे त्या जागी झालेल्या घटनांचा क्रम हा युट्युब वरील माहिती वर आधारेलला आहे. तसेच त्या वेळेचा तिथला अनुभव आपल्या मराठी गप्पाच्या टीमने घेतलेला नाही आणि त्याविषयी आपल्या टीमला माहिती नाही. या सगळ्यांची आपण सुज्ञ वाचक म्हणून नोंद घ्यावी ही विनंती. आपल्याला हा लेख आवडला असेलच. तेव्हा नेहमीप्रमाणे हा लेख शेअर करा. आपल्या मित्र आणि परिवारातील इतरांनाही हा लेख वाचू द्या. तसेच एक उत्तम वाचक म्हणून आमच्या टीमच्या पाठीशी सदैव उभे राहा ही विनंती. लोभ असावा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published.