Breaking News
Home / मनोरंजन / घरातल्यांचा निरोप घेताना तुम्ही हसणारी नवरी कधी पाहिली आहे का, बघा व्हिडीओ

घरातल्यांचा निरोप घेताना तुम्ही हसणारी नवरी कधी पाहिली आहे का, बघा व्हिडीओ

लग्न म्हंटलं की तसंही आनंद हा असतोच. किंबहुना लग्न सोहळ्याच्या पायभरणीत आनंद हा महत्वाचा घटक असतो. त्यामुळे लग्न हा एक प्रसन्न समारंभ व्हावा याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं असतं. या सोहळ्यातील जबाबदार व्यक्ती तर यासाठी रात्रंदिवस झटत असतात. अगदी डोक्याचा भुगा आणि रक्ताचं पाणी होईस्तोवर त्यांचे प्रयत्न चालू असतात. त्यांच्या या प्रयत्नांना यशही मिळतं. लग्न सोहळा उत्तमरीत्या पार पडतो. भटजी वेळेवर येतात, विधी वेळेत पूर्ण होतात, रिसेप्शन ही दणक्यात होतं. सगळं होतं. मग वेळ येते ती मुलीच्या पाठवणीची !

सहसा यावेळी प्रत्येकाचेच डोळे पाणावलेले असतात. अगदी काही वेळा तर आपली पत्नी आणि सासू सासरे यांच्या मधील भावबंध बघून नवरदेव ही रडतात. अर्थात हे तसं दुर्मिळ असलं तरी होतं. कारण क्षणच तसे असतात. पण…. प्रत्येक गोष्टीला अपवाद हे असतातच ना ! होय, काही वेळा याउलट प्रसंग सुद्धा घडून येतात. माहेराहून सासरी जाताना माहेर सोडल्याच दुख्ख असतं. पण सासरी जाण्याचा आनंद हा जरा जास्त असतो. इतका की काही वेळेला वधू रडत रडत न जाता अगदी हसत हसत सासरी जाते. तुम्ही म्हणाल वेड लागलंय काय. काहीही बरळताय ! तुम्हाला तसं वाटणं साहजिक आहे. पण आपली टीम पुराव्यांशिवाय बोलत नाही.

आज आपल्या टीमने असा एक मजेशीर व्हिडियो बघितला त्यामुळेच वर उल्लेख केलेलं विधान करावंसं वाटलं. हा व्हिडियो खरं तर काही वर्षांपूर्वीचा आहे. पण त्यातील गंमत आजही आपल्याला हसवून सोडते. होतं काय तर वधूच्या पाठवणीची वेळ आलेली असते. सुंदर अशी नटलेली वधू सासरी जायला निघणार असते. घरातील स्त्रियांना अशावेळी हुंदका अनावर होत नाही. त्या बिचाऱ्या रडत असतात. पण वधू ही सुशेगाद असते. एका काकींना मिठी मारता मारता हसत असते. बरं एकदम एका कानापासून ते दुसऱ्या कानापर्यंत जाईल इतकं मोठं हसू असतं ते ! त्यामुळे काही जणींना भावुक होता होता, हसायला ही येतं. एक ताई तर कॅमेऱ्यामागून बोलतच असतात. पण वधू मजा मस्ती करणारी असावी. ती अजून हसत राहते. परिणामी जे क्षण भावुक होऊन डोळ्यांत अश्रू येण्याचे असतात तिथे हसून हसून अश्रू येत असतात. आता हे सगळं, वातावरण आनंदी राहावं म्हणून।वधू कडून केलं जातं की तिचा स्वभावच आनंदी, काहीसा गमत्या आहे हे कळत नाही. कारण काहीही असो, पण तिथलं वातावरण हसमुख करण्यात मात्र ती यशस्वी होते हे नक्की.

किंबहुना आपल्याला ही तिचं हे वागणं हसवून सोडतं. काही क्षण करमणूक होते आणि आनंद सुद्धा ! आमच्या टीमने हा व्हिडियो बघितला आणि त्याचं वेगेळेपण चट्कन जाणवलं. म्हंटलं यावर लिहायला हवं. त्यातूनच आजचा हा लेख लिहिला आहे. तसेच वर उल्लेख केलेला व्हिडियो हा या लेखाच्या शेवटी दिलेला आहे. हा व्हिडियो जरूर बघा.

तसेच आपल्या टीमच्या अन्य लेखांना जरूर भेट द्या. कारण आपली टीम आपल्या वाचकांसाठी अगदी शोधून शोधून विषय निवडत असते. त्यावर माहिती घेऊन लिहीत असते. दिसलं काही तरी आणि लिहून दिलं अस होत नाही. अनेकवेळा तर विविध विषयांवर लिहिताना खूप वेळ ही जातो. पण आमची लिहायची आणि आपली वाचायची आवड यासाठी आम्ही हे अगदी मनापासून करत असतो. पुढेही करत राहू. गरज आहे ती आपल्या खंबीर पाठिंब्याची ! आपल्याकडून तो कायम मिळत राहू दे ही सदिच्छा ! लवकरच एका नवीन विषयासह भेटूच. तोपर्यंत काळजी घ्या, आमचे सगळे लेख वाचा आणि आठवणीने शेअर करा. धन्यवाद !!!

बघा व्हिडीओ :

About Rahulya

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *