सामान्य जनतेमध्ये ऑटो रिक्षाचालकांची प्रतिमा काही खास नाही आहे. त्यांना अनेकदा जास्त पैसे चार्ज करण्याचा, मीटरचे पैसे जास्त होण्यासाठी चालू मीटर लावणे, कुठे जाण्यासाठी लगेच नकार देणे ह्या गोष्टींसाठीच जास्त ओळखले जाते. अनेकांना त्यांची भाषा आणि अर्वाच्य भाषेतील शिव्यांची पद्धत आवडत नाही. परंतु तुम्ही असे नाही म्हणू शकत कि, सर्व ऑटो वाले वाईट असतात. ह्यामध्ये काही खूप इमानदार आणि चांगल्या मनाचे देखील असतात. असाच एक ऑटोवाला मुंबईमध्ये आहे. ज्याने असे काम केले आहे, जे माहिती पडल्यानंतर तुम्ही त्याला सलाम करण्यास मजबूर व्हाल. रिपोर्ट्सनुसार सोनू यादव नावाचा २८ वर्षीय रिक्षाचालक मुंबईतील कुर्ला लोकमान्य टिळक टर्मिनल्स येथे काम करतो. १२ फेब्रुवारीला त्याच्या रिक्षात दोन किशोरवयीन मुली प्रवास करत होत्या. त्यांच्या आपापसातील गप्पांच्या दरम्यान सोनू ला माहिती पडले कि, दोघीही बेंगळुरू च्या राहणाऱ्या आहेत आणि घरातून पळून मुंबईला आल्या आहेत.
बंगलोर मिरर सोबत मुलाखतीदरम्यान सोनू ने सांगितले कि, “मी त्या दोघींना एका प्रोडक्शन हाऊस मध्ये घेऊन गेलो होतो. त्यांचे म्हणणे होते कि, प्रोडक्शन वाल्यांनी त्यांना इंटरव्हू साठी बोलावले आहे. परंतु सिक्युरिटी गार्ड ने त्यांना सांगितले कि तुम्ही तुमचा बायोडेटा इथे सबमिट करा, इथे कोणताच वॉल्क इन इंटरव्यू होणार नाही आहे.” सोनू रिक्षा चालकाने दोन्ही मुलींना सल्ला दिला कि, त्या व्यक्तीसोबत फोनवर बोलून घ्या, ज्यांनी त्यांना प्रोडक्शन हाऊस मध्ये इंटरव्हू साठी बोलावले होते. खरंतर दोघींकडे मोबाईल फोन नव्हता. त्यांनी सोनूच्या मोबाईल वरूनच काही कॉल्स केले, परंतु समोरून काहीच उत्तर आले नाही. त्यानंतर दोघी थोड्या डगमगल्या. त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव पाहून सोनू ला संशय आला कि, काहीतरी गडबड आहे. त्यानंतर सोनू ने त्या मुलींना दम देत विचारले कि, खरं खरं सांगा नाहीतर मी पोलिसांना कळवेल. ह्यानंतर दोन्ही मुलींनी सोनूला सांगितले कि, त्या १५ वर्षांच्या आहेत आणि कनाकानगर मधील लिटिल एंजल्स शाळेत ९ वीला शिकत आहेत. ११ फेब्रुवारीला ह्या दोघीही शाळेतून घरी येण्या ऐवजी ८४० रुपये जमवून, बुरखा घालून लोकमान्य टिळक एक्सप्रेस ट्रेन वरून मुंबईमध्ये आल्या होत्या. ह्याच दरम्यान बंगलोर मध्ये दोन्ही मुलींच्या कुटुंबाने पोलिसांमध्ये हरवल्याची तक्रार नोंदवली होती.
त्या घरातून ह्यासाठी पळाल्या होत्या कारण त्यांना ऍक्टिंग मध्ये करिअर बनवायचे होते. सोनूने सांगितले कि, “मी त्या दोघींकडून रिक्षाचे पैसे घेतले नाही, कारण मला त्यांच्यासाठी वाईट वाटले होते. त्यांच्या सुरक्षेततेची काळजी घेऊन मी त्यांना सीसीटीव्ही निगराणी असलेल्या प्रीपेड ऑटो स्टॅन्ड ऑफिस मध्ये बसवले होते. ह्यानंतर माझा एक खूप चांगला मित्र गुलाब गुप्ता आणि मी दोघांनी मिळून ७०० रुपये काढून त्या मुलींना जेवण आणि बेंगळूर ची तिकिट्स ची व्यवस्था केली, जिथे त्या मुलींचे घर आहेत. दोन्ही मुली १४ फेब्रुवारीला आपल्या घरी सुरक्षित पोहोचल्या.” सोनू ने दोन्ही मुलींना आपला मोबाईल नंबर सुद्धा दिला होता, ज्यामुळे मुंबई ते बंगळूरच्या प्रवासामध्ये रस्त्यात कोणतीही मदत लागली तर त्या त्याला कॉल करू शकतील. सोनू नंतर दोन्ही मुलींच्या आईवडिलांशी सुद्धा बोलला. ह्यानंतर दोघींनी पोलीस स्टेशन मध्ये जाऊन आपला जबाब नोंदवला, ज्यामुळे त्यांच्या हरवण्याची तक्रार बंद केली गेली. सोनूचे म्हणणे आहे कि, त्याला खूप आनंद झाला कि दोन्ही मुली सुरक्षित आपल्या घरी पोहोचल्या. रिक्षाचालकाने ह्या दोन मुलींसाठी केले ते खरंच खूप प्रसंशनीय होते. आजच्या जमाना कसा आहे आपलया सर्वांना खूप चांगल्या प्रकारे माहिती आहे. जर कोणी वाईट व्यक्ती त्या रिक्षाचालकाच्या जागी असता तर तो ह्या स्थितीचा फायदा देखील उठवू शकला असता.
Bahoot nek kaam Kiya apne Sonu bhai.aap ek imaandar adni hi.mai apko Salam karta hu.
अश्या व्यक्तींना स्वःतःहून बोलून आभार व्यक्त करायचे आहेत.
कृपया नंबर share Kara
NIC JOY HO
युपीच्या लोकांविषयी गैरसमज जास्त आहेत परंतु सोनीने ते खोटे करुन
आपल्या प्रामाणिक हेतुने मनातील सामाजिक बांधिलकी जानुन जे काम केले त्याच्या कार्यास माझा उंच सलाम