घोडा हा खूप सुंदर प्राणी आहे. घोडे फक्त दिसायलाच सुंदर नसतात तर खूप वेगवान आणि चपळ हि असतात. ह्यांना बघून असेच वाटते कि त्यांच्यात खूप ऊर्जा असते. पण तुम्हाला माहित आहे का घोडे दिवसभरात इतकी ऊर्जा खर्च करतात तरीसुद्धा हे झोपताना किंवा आराम करताना दिसत नाही. बाकीचे प्राणी रात्रीच्या वेळी बसून किंवा झोपून चांगल्या प्रकारे आपली झोप पूर्ण करतात. पण घोडे खूप कमी वेळ झोपतात. एवढेच नाही तर त्यांच्यात उभ्या उभ्या झोपण्याची कला असते. अशातच काही जणांच्या मनात प्रश्न येतात कि, अखेर हे घोडे बसून झोपत का नाही? काय आहे यामागचे कारण? या जाणून घेऊया.
एका दिवसात एवढा वेळ झोपतो घोडा
तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल कि घोडे खूप कमी वेळासाठी झोपतात. जर कोणी स्वस्थ घोडा असेल तर तो २४ तासात फक्त ३० मिनिटंच झोपतो. या अर्ध्या तासात तो बसत हि नाही आणि लोळत हि नाही. परंतु घोड्यांच्या स्वास्थनुसार त्यांची झोप असते. सरासरी ३ तास घोड्यांची झोप असते. घोड्याला उभ्या उभ्या दिवसभरात छोटी छोटी डुलकी घेणे पसंद आहे. निसर्गाने हि त्यांच्या पायाची रचना अशी बनवली आहे कि, ते खाली न पडता उभ्या उभ्या झोपू शकतात.
असा घालवतो थकवा
आता तुम्ही म्हणाल कि नेहमी उभे राहून राहून घोडे थकत नाही का ? त्यांचे पाय दुखत नाही का? खरंतर घोड्यांकडे त्याच्या पायाचा थकवा घालवण्याचा एक विशिष्ट मार्ग असतो. घोडाला जेव्हाही थकवा घालवायचा असतो तेव्हा तो त्याचा एक पाय वर उचलतो. या प्रकारे त्याचे पूर्ण वजन तीन पायांवर असते. तो आळीपाळीने असे करून आपल्या सगळ्या पायांचा थकवा घालवतो. यासाठी जर तुम्ही कधी घोड्याला एक पाय उचललेला बघाल तेव्हा त्याला सतवू नका. त्यावेळी तो आराम करत असतो.
घोडा बसून किंवा लोळून का झोपत नाही?
घोडा नेहमी उभाच असतो. झोपतोही दिवसात फक्त ३० मिनिट ते ३ तास. तरीही तो बसून किंवा लोळून झोपत नाही. असे यासाठी कि,त्याच्या शरीराची रचनाच अशी असते कि, तो जास्त वेळ बसू किंवा लोळू शकत नाही. जेव्हा एखादा घोडा बसतो तेव्हा त्याच्या शरीराचे पूर्ण वजन त्याच्या मानेवर आणि पोटातल्या मधल्या भागावर असते. ते केल्याने त्याला श्वास घेण्यास अडचण येते. हवा त्याच्या फुफ्फुसात पोहचत नाही. हेच कारण आहे कि जर घोडा बसला तर लवकरात लवकर उभा होतो. एवढेच नाही जर आपण घोड्याला खूप वेळ बसवून ठेवले तर त्याचा मृ त्यू ही होऊ शकतो. यासाठीच घोड्याला जास्त वेळ बसण्यासाठी जोर देऊ नये.
आता तुम्हाला समजले असेल कि, घोड्याला अखेर बसायला किंवा लोळायला का आवडत नाही. तुम्हाला घोड्याच्या झोपण्याच्या सवयींबद्दल माहिती झाली असेलच. आशा करतो कि, तुम्हाला हि मनोरंजक माहिती नक्कीच आवडली असेल. तुम्ही हे दुसर्यांसोबत शेअर करू शकतात.